४ मार्च २०२२ ची ती संध्याकाळ समस्त क्रिकेट विश्वाला हादरवणारी ठरली कारण जगातील सर्वोत्तम महान फिरकीपटूंपैकी एक शेन वॉर्न अचानक काळाच्या पडद्याआड झाला. मृत्युच्या अगदी १२ तासांपूर्वी त्याने माजी क्रिकेटर रोड मार्श यांच्या निधनाबाबत आदरांजली वाहिली होती आणि देवाचा खेळ सुद्धा किती क्रूर पहा, अगदी काही तासांनी संपूर्ण जग त्याला आदरांजली वाहत होतं.
शेन वॉर्नचा मृत्यू आकस्मिक हृद्यविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले. मृत्यूवेळी तो थायलँड मध्ये होता. शेन वॉर्नचे हे जाण्याचे वय नक्कीच नव्हते. त्याने क्रिकेट विश्वातून पूर्णपणे संन्यास घेतला असे देखील नव्हते. तो विविध क्रिकेट सिरीज्समध्ये सहभागी होत असे, कधी अँकर म्हणून कधी कॉमेंटेटर म्हणून तर कधी कोच म्हणून!
त्यामुळे वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याचे जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले. त्याच्या सोबत खेळलेल्या कित्येक क्रिकेटपटूंसाठी सुद्धा हा मोठा धक्का होता. शेन वॉर्नच्या मृत्यूच्या बातमीप्रमाणे त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घटनाच जणू एक ब्रेकिंग न्यूज होती. त्याचं सर्व आयुष्यच वाद विवाद यांनी भरलेलं होतं. तो नेहमीच कॅमेऱ्याच्या स्पॉटलाईट वर राहिला. तर अशा या शेन वॉर्नबाबत एक गोष्ट फार कमी लोकांना ठावूक आहे ती म्हणजे शेन वॉर्नचा एक डोळा निळा आणि एक डोळा हिरवा होता.
काय विश्वास बसत नाहीये? अहो खरंच आणि यामागचं कारण सुद्धा रंजक आहे. शेन वॉर्नचा जन्म झाला तेव्हाच डॉक्टरांनी सांगितले की या बाळाला Complete Heterochromia आहे. आता हे Complete Heterochromia म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊ.
Complete Heterochromia ही डोळ्यांची ती स्थिती असते ज्यामध्ये दोन्ही डोळ्यांचा रंग हा वेगवेगळा असतो. Heterochromia हे तीन प्रकारचे असतात. Heterochromia ची स्थिती प्राण्यांमध्ये खास करून मांजरींमध्ये दिसून येते.
त्यापैकी पहिला प्रकार म्हणजे Central Heterochromia होय. यामध्ये डोळ्यांच्या मधल्या भागात वेगवेगळे रंग आढळून येतात. दुसरा प्रकार म्हणजे Complete Heterochromia होय, ज्यामध्ये दोन्ही डोळ्यांत वेगवेगळे रंग आढळून येतात आणि तिसरा व शेवटचा प्रकार म्हणजे Sectoral Heterochromia होय. यात डोळ्यांचा एका भागाचा रंग अनु भागांच्या रंगापेक्षा वेगळा असतो.
आता हि Heterochromia ची स्थिती निर्माण का होते बरं? तर आपल्या डोळ्यांमह्द्ये मेलेनीन नामक पिगमेंट मुळे रंगाची उत्पत्ती होते. यामुळे डोळ्यांचा रंग निळा, हिरवा, करडा होऊ शकतो. ज्यांच्या दोन्ही डोळ्यांचे रंग समान असतात त्यांचे डोळे सामान्य मानले जातात.
पण जेव्हा दोन्ही डोळ्यांत स्पष्टपणे वेगवेगळे रंग दिसतात तेव्हा ती Heterochromia ची स्थिती असल्याचे सांगितले जाते. सहसा जन्मत:च बाळामध्ये ही स्थिती दिसून येते. शेन वॉर्नच्या बाबतीत देखील हेच झाले. पण शेन वॉर्नला कधीच या गोष्टीचा त्रास झाला नाही कारण डोळ्यांचे रंग वेगवेगळे असल्याशिवाय त्याला डोळ्यांची कोणतीच समस्या नव्हती. त्यामुळे अशा स्थितीत त्याला यावर पुढे उपचार घेण्याची गरज भासली नाही.
अशा या आगळ्या वेगळ्या महान गोलंदाजाला भावपूर्ण श्रद्धांजली!
0 Comments