आपला देश का क्रिकेटवेडा आहे हे सांगायला कोण्या जाणकाराची सुद्धा गरज नाही, पण एक चांगली गोष्ट म्हणजे गेल्या काही वर्षांपासून हे चित्र बदलत असल्याच दिसून येतंय. इतरही अनेक खेळांमध्ये लोकांना रस येऊ लागला आहे. त्या खेळांमधील खेळाडूंना प्रसिद्धी मिळते आहे. क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांकडे सुद्धा आता करियर म्हणून पाहिलं जातंय हे एक आशादायी चित्र आहे. तर अशाच खेळांपैकी गेल्या काही वर्षांत अधिक जास्त प्रसिद्ध झालेला खेळ म्हणजे बॅडमिंटन होय!
१९८० मध्ये ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धा आले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांनी जिंकली आणि त्याच वर्षी ते जगातले नंबर वन बॅडमिंटन प्लेयर ठरले. तेव्हापासून खऱ्या अर्थाने बॅडमिंटन हा खेळ भारतात रुजायला सुरुवात झाली.
या खेळातील नामवंत भारतीय खेळाडूंची नावे सांगायची झाली तर ती आहेत पी. गोपीचंद, श्रीकांत किदांबी, सायना नेहवाल, पी व्ही सिंधू! सायना नेहवाल तर भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का या सर्व खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील एक नाव नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. कारण ती आतापासूनच ज्युनियर फुलराणी म्हणून आपली ओळख कमवते आहे. तिच नाव म्हणजे नागपूरची पोरगी मालविका बनसोड!
तर याच ज्युनियर फुलराणीने चक्क सिनियर फुलराणीला हरवून सगळ्यांनाच आपल्यातली कुवत दाखवून दिली आहे. तिने सायना नेहवालला सरळ दोन सेटमध्ये हरवलं. सायना नेहवालला पराभूत करून नागपूरच्या या मुलीने इतिहास घडवला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. मालविका ने इंडियन ओपन बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये सायना नेहवाल २१-१७ आणि २१-०९ अशा सरळ दोन सेटमध्ये हरवले.
जागतिक क्रमवारीत सायना २५ तर मालविका १११ क्रमांकावर आहे. विश्वराज ग्रुपचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी सगळ्यात आधी मालविकाच्या खेळाची दखल घेतली आणि मालविकाला ते २०१९ सालापासून मदत करत आहेत.
मालविका चे यश जरी मोठे असले तरी ते अनपेक्षित मुळीच नाही. यामागे तिची अपार मेहनत दिसून येते. मोठमोठ्या स्पर्धा जिंकून येण्याची तिच्यात क्षमता आहे आणि म्हणूनच तिचे भविष्यही उज्ज्वल आहे. मालविका चे आई वडील आणि तिचे प्रशिक्षक श्री संजय मिश्रा यांच्यामुळे ती आज या यशापर्यंत पोहोचली आहे. मालविकाने अंडर -१३ आणि अंडर -१७ अशा स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा होत्या.
त्याचप्रमाणे मालविकाने साऊथ एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत सुद्धा विजय मिळवला होता. हा विजय तिने २०१८ साली मिळवला तर २०१९ साली मालविका ऑल इंडियन सिनियर रँकिंग स्पर्धा जिंकली. याच वर्षात म्हणजे २०१९ साली तिने मालदीव्ज आंतरराष्ट्रीय फ्युचर सिरीज जिंकली. अ
से नवनवीन खेळाडू आणि त्यांची कामगिरी बघितली की ऊर भरून येतो. मालविका सारख्या खेळाडूंचा नेहमीच आपल्या सगळ्यांना गर्व वाटेल. आम्ही अशाच नवनवीन खेळाडूंबद्दल माहिती घेऊन तुमच्या समोर असेच येत राहू तोवर छोटासा विराम.
0 Comments