वूमन्स क्रिकेटची ‘छकडा एक्सप्रेस’ जिच्यासमोर उभं राहायला रथी-महारथीही घाबरतात!

झुलन गोस्वामी म्हणजेच छकडा एक्सप्रेस भारतीय क्रिकेट मधील चमचमता तारा. पण ह्या ताऱ्याला नभात तळपण्यासाठी ध्रुव बाळा इतकेच श्रम करावे लागले होते


प्रवाहा सोबत तर कोणीही पोहू शकतं पण प्रवाहा विरुद्ध जे पोहतात तेच खरे चॅम्पियन असतात. एक बॅट एक बॉल आणि त्याच्यामागे अब्जावधी वेडे. त्याच अब्जावधी वेड्यांमधील एक झुलन गोस्वामी. पण जेव्हा तिने हि बॅट-बॉल उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला सांगितले गेले कि हा तर मुलांचा खेळ आहे आणि तू मुलगी आहेस? पण झुलनने ह्या हलक्या टोमण्यांकडे लक्ष नाही दिले कारण, प्रवाहा सोबत तर कोणीही पोहू शकतं पण प्रवाहा विरुद्ध जे पोहतात तेच खरे चॅम्पियन असतात.

झुलन गोस्वामी म्हणजेच छकडा एक्सप्रेस भारतीय क्रिकेट मधील चमचमता तारा. पण ह्या ताऱ्याला नभात तळपण्यासाठी ध्रुव बाळा इतकेच श्रम करावे लागले होते. झुलन पश्चिम बंगाल मधील नादिया जिल्ह्यातील छकडा ह्या गावची. मध्यम वर्गीय फुटबॉल वेडे कुटुंब. झुलन सुद्धा लहानपणी फुटबॉलचीच फॅन होती. पण जेव्हा तिने १९९२ च्या मेन्स क्रिकेट वर्ल्ड कपचे सामने टीव्ही वर पाहिले तेव्हा तिला क्रिकेट मध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि ती आपल्या भावंडांसोबत टेनिस बॉलने क्रिकेट खेळू लागली.

Source: navbharattimes.indiatimes.com

१९९७ मध्ये १५ वर्षाची असताना झुलन ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड ODI मध्ये बॉल गर्ल म्हणून हजर होती. सामना संपल्यावर ऑस्ट्रेलिया च्या बेलिंडा क्लार्कच्या व्हिक्टरी लॅप ने झुलन इन्स्पायर्ड झाली आणि इंटरेस्ट चे रूपांतर पॅशन मध्ये झाले.

पण दिल्ली अभी दूर थी. छकडा ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा प्रवास इतका सोपा नव्हता. छकडा मध्ये क्रिकेट साठी योग्य सुविधा नव्हत्या म्हणून झुलनला कोलकात्याला जावं लागे. ती सकाळी लवकर उठून कोलकात्याला जाण्यासाठी पहाटे ५ ची ट्रेन पकडत असे. ७:३० ते ९:३० प्रॅक्टिस केल्या नंतर पुन्हा ८० किमी चा उलटा प्रवास करून तिला तिच्या गावात शाळेत हजेरी लावावी लागत असे. पण ह्या प्रवासाने झुलन थकली नाही तर आणखी कणखर बनली. क्रिकेट तर मस्त सुरु झाले होते पण झुलन अभ्यासात मागे पडू लागली.

एका मध्यम वर्गीय कुटुंबासाठी हि चिंतेची बाब होती. तिचे क्रिकेट थांबणार कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण तिचे मेंटॉर आणि कोच श्री स्वपन साधू ह्यांनी तिच्या घरच्यांना समजावले. ह्या नंतर झुलनचा खेळ कोणी थांबवू शकले नाही. छकडा एक्सप्रेस आता सुटली होती. तिने फेकलेला चेंडू कोलकाता क्रिकेट बोर्डाच्या दारावर जाऊन आदळला आणि तिला कोलकाता वूमेन्स टीम साठी बोलावणे आले.

Source : navjivanindia.com

झुलनने वयाच्या १९ व्या वर्षी ६ जानेवारी २००२ ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले.  ती इंग्लड विरुद्ध आपली पहिली ODI चेन्नई मध्ये खेळली. आणि १४ जानेवारी २००२ मध्ये टेस्ट पदार्पण केले इंग्लड विरुद्ध लखनौ मध्ये. ह्या नंतर झुलनच्या परफॉर्मन्सचा आलेख उंच उंच चढू लागला. २००६-०७ मध्ये इंग्लड विरुद्ध च्या टेस्ट सिरीस मध्ये झुलनच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय टीमने इंग्लंडला पहिल्यांदा हरवले. त्यात झुलनने नाईट वाचमन म्हणुन बॅटिंग करत ५० रन केले आणि १०/७८ आणि ५/३३ अशी कामगिरी करत भन्नाट बॉलिंग सुद्धा केली.

झुलनने २००८ मध्ये मिताली कडून कॅप्टनसीची सूत्रे आपल्या हातात घेतली आणि २०११ पर्यंत तिने नेत्तृत्व केले. फेब्रुवारी २०१८ मध्ये झुलन २०० विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटर बनली तर सप्टेंबर २०१८ मध्ये झुलन ३०० विकेट घेणारी पहिली महिला क्रिकेटर होती.

Source : scroll.in

झुलन चे पराक्रम इथेच संपले नाहीत. तिच्या मैदांवरच्या कामगिरीमुळे तिला अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले. २००७ मध्ये ICC Women’s Cricketer of the year,  २०१० मध्ये अर्जुन अवॉर्ड, २०१२ मध्ये पदमश्री. ह्या सर्वावर जणु मानाचा तुरा म्हणजे भारतीय पोस्ट विभागाने झुलनच्या नावाने तिकीट काढले. लवकरच झुलन च्या जीवनावर आधारित एक हिंदी सिनेमा बनत आहे. 

झुलन आज सुद्धा भारतीय संघात खेळतेय आणि ती आणखी नवनवीन पराक्रम तिच्या नावावर नोंदवत जाईल. म्हणून Guys कधीही असा विचार करू नका कि पोरगी पोरांचा खेळ खेळू शकत नाही. कारण पोरगी पोरांचे खेळ तर खेळू शकतेच आणि त्यांना त्या खेळात हरवू पण शकते.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Sushant Tambe