सतत चर्चेचा विषय असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत. सध्या महाराष्ट्रात वारंवार ईडीच्या कारवाया सुरू आहेत. अनेक मोठमोठ्या नेत्यांवर ईडीची कारवाई सुरू आहे. दिग्गज आणि बडे नेते वेगवेगळ्या प्रकारणांमुळे ईडीच्या नजरेत येतायत.
काही जमीन व्यवहारांशी संबंधित मनी लॉंड्रिंगच्या तपासात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी आणि दोन सहकारी यांची ११.१५ कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता ईडीने तात्पुरती जप्त केली आहे. मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने ही कारवाई केली आहे. त्यांची मुंबई आणि अलिबाग येथील मालमत्ता देखील जप्त करण्यात आली. या घटनेत संजय राऊतांचे खास समजले जाणारे प्रविण राऊत सुउद्ध ईडीच्या निशाण्यावर आले.जाणून घेऊयात.
२००६ या वर्षी गुरू आशिष बिल्डरने जॉईंट व्हेंचरमार्फत गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. २००८ मध्ये या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात देखील झाली होती. परंतु, सुरू झालेल्या या प्रकल्पाचा पुढच्या दहा वर्षांनंतरही पुनर्विकास झालेला काही दिसून आला नाही.
अवघ्या दहा वर्षांनीसुद्धा त्या जागेवर नवीन बिल्डिंग बनली नाही. तिथे राहणाऱ्या मूळच्या ६७८ रहिवाश्यांचे डोक्यावरचे छप्पर काढून घेऊन बिल्डरने म्हाडाच्या घरांना देखील चुना लावल्याची माहिती समोर आली. बिल्डरने या प्रकरणात म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला होता. या प्रकल्पातील विकण्यासाठी असलेले क्षेत्र बिल्डरने सात वेगळ्याच डेव्हलपर्सना विकल्याचा आरोप या बिल्डरवर लावला गेला. याच गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान हे आहेत.
संजय राऊत यांचे जवळचे समजले जाणारे प्रविण राऊत यांचे संचालक राकेश वाधवान यांच्यासोबत खूप जवळचे संबंध होते. राकेश वाधवानसोबत मिळून प्रविण यांनी पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा केला आहे, असा संशय ईडीला आला होता. त्यामुळे प्रविण राऊत यांना ईडीकडून थेट अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सुटकाही झाली.
या प्रकरणात २ फेब्रुवारी २०२२ मध्ये प्रविण राऊतांना पुन्हा एकदा अटक करण्यात आली. या सर्व घोटाळ्यात संजय राऊत त्यांचे जवळचे नातेवाईक असल्यामुळे संजय राऊतांच्या आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या संपत्तीवर गदा आली.
याच घोटाळ्यातील पैसा या लोकांनी आपली संपत्ती घेण्यासाठी वापरला असावा असा ईडीने दावा केला आहे.
गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे माजी संचालक प्रविण राऊत यांच्या पालघर आणि ठाणे येथील जमिनी, संजय राऊतांच्या पत्नी वर्ष राऊत यांचा मुंबईच्या उपनगरातील दादरमधील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहिमजवळील आठ प्लॉटस एवढी मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
याशिवाय, प्रविण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये ट्रान्सफर केले गेले होते. हे पैसे दहा वर्षांनंतर त्यांना परत करण्यात आले होते. हे पैसे कुठल्याही घोटाळ्यामधले नसून ते कर्जाच्या स्वरूपात उसने घेतले होते असा संजय राऊतांच्या पत्नीने दावा केला आहे.
या सर्व प्रकारानंतर संजय राऊत यांचादेखील या घोटाळ्यात हात आहे असा ईडीला संशय आला आहे. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या मालमत्तेवर आणि कुटुंबीयांवर रेड टाकली होती. याच घोटाळ्यात ईडीने संजय राऊत यांची सर्व मालमत्ता जप्त केली.
तर असे आहे संजय राउत आणि पत्राचाळ घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन!
0 Comments