देशातले सुप्रसिध्द उद्योगपती रतन टाटा सर्वांनाच माहिती आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी देशाचे नाव उंचावले. असं असले तरी ‘साधी राहणी उच्च विचार सरणी’ या वाक्प्रचाराची अनुभूती रतन टाटांकडे पाहिल्यानंतर सर्वांनाच येते. त्यांच्या उद्योगाइतकेच त्यांचे मनही खुप मोठे आहे. कित्येकांना त्यांनी घडविले. आता हेच पहा ना, शंतनू नायडू सोबतचे फोटो आणि त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दलच्या पोस्ट किती व्हायरल झाल्या.
वाचा : आपल्या सोबत सावली सारख्या असणाऱ्या ‘ह्या’ मुलाला रतन टाटा देतात ‘एवढा’ पगार!
शंतनू मधली हुशारी ओळखून टाटांनी त्याला नामी संधी दिली आणि त्यानेही या संधीचे सोने करत बिझनेस इंडस्ट्रीमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं. असो आजचा विषय काही वेगळाच आहे. तुम्हाला माहीत आहे का रतन टाटांना एक लहान भाऊ आहे? आज त्यांच्या भावाबद्दल आपण जाणून घेऊ या.
रतन टाटांच्या या लहान भावाचे नाव आहे जिमी टाटा. जिमी टाटा हे मुंबईतील कुलाबा इथे राहतात. मात्र त्यांच्याबाबत फारसे कोणालाच ठाऊक नाही. ते कायम माध्यमांपासून दूर राहणं पसंत करतात. जिमी कुलाब्याच्या 2BHK घरामध्ये अगदी साधारण आयुष्य व्यतीत करत आहेत.
जिमी टाटा हे रतन टाटांचे लहान बंधू आहेत तर नोएल टाटा हे त्यांचे सावत्र बंधू. जिमी टाटा हे रतन टाटांच्याच अनेक कंपन्यामध्ये काम करायचे. ९० च्या दशकात ते रिटायर्ड झाले. टाटा ग्रुप कंपन्यांमध्ये अजूनही त्यांचे शेअर आहेत. त्याचबरोबर सर रतन टाटा ट्रस्टचे ते ट्रस्टी देखील आहेत. मात्र असे असूनही जिमी टाटा यांना माध्यमांपासून दूर राहायला आवडते. इतकंच नाही तर त्यांच्याकडे साधा मोबाईल फोनसुध्दा नाही. त्यांचे राहाणीमान अतिशय सामान्य आहे.
जिमी टाटा यांनीही आपल्या भावाच्या पावलावर पाऊल ठेवत, ब्रम्हचारी राहायचे ठरवले. मात्र रतन टाटांसारखे बिझनेसमध्ये ते फार रमले नाहीत.
तुम्ही म्हणाल हे अचानक का बरं जिमी टाटा तुम्हाला आठवले? तर त्याला कारणही तसंच आहे. सुप्रसिध्द उद्योगपती हर्ष गोयंका यांना जिमी टाटांची आठवण आली आणि त्यांनी रतन टाटांच्या या अज्ञात भावाचा फोटो ट्वीट करत माहिती दिली होती.
त्याचबरोबर त्यांनी जिमी टाटांची एक आठवणही सांगितली. ‘‘ तुम्हाला रतन टाटांच्या लहान भाऊ जिमी टाटांबद्दल काही माहिती आहे? ते मुंबईच्या कुलाब्यामध्ये दोन खोल्यांच्या घरात राहतात. जिमी टाटा यांना बिझनेस पेक्षा स्क्वॅश खेळण्यात जास्त रुची होती. ते खूप चांगले खेळाडू होते आणि नेहमीच मला हरवायचे.’’
अनेकांनी असे अंदाज लावले होते की रतन टाटा आणि त्यांच्या भावात काही कलह आहेत आणि म्हणून त्यांचे नाते फारसे घट्ट नाही. हा अंदाज खरा सुद्धा असू शकतो. पण तो कलह इतका मोठा सुद्धा नक्कीच नाही की रतन टाटा आपल्या भावाची अजिबात काळजी घेत नाहीत.
वाचा : तब्बल ७४ वर्षांनी भेटलेल्या भावांची डोळ्यात पाणी आणणारी गोष्ट!
रतन टाटांना स्वत:ला पैश्याचा मोह नाही आणि त्यांच्या भावाला सुद्धा नाही. खरंच निस्वार्थपणा हा टाटा फॅमिलीच्या रक्तातच आहे.
0 Comments