जगभरातल्या श्रीमतांच्या यादीत नेहमी टॉपला असणारे उद्योजक म्हणजे सुप्रसिध्द बिझनेसमन मुकेश अंबानी. अर्थातच त्यांची जीवन शैली कुठल्याही राजा-महाराजांना शोभेल अशीच असणार ना? तुम्हाला माहीत आहे का? त्यांचे मुंबईतले घर, ‘अंटीलिया’ हे जगभरातल्या रॉयल रेसिडेंसीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतं. पहिल्या क्रमांकावर लंडनचे बंकिघम पॅलेस आहे, त्यानंतर आपल्या अंबानींचे घर म्हणजे ते कसलं रॉयल असेल याची तुम्हाला कल्पना आलीच असेल.
वाचा: अंबानी घरच्या कचऱ्याचं काय करतात हे वाचून तुम्हीच ठरवा अंबानी कंजूष आहेत की हुशार!
एंटीलियाची किंमत १५ हजार कोटी इतकी असून जगभरातल्या श्रीमंताची घर या एका घरापुढे किस झाड की पत्ती!? इतकं मोठं घरदार म्हटल्यावर नोकर-चाकर आलेच. तर अंबानींच्या या घरात तब्बल ६०० नोकर २४ तास काम करतात.
बरं इतक्या भारी ठिकाणी काम करणारे नोकर साधे सुधे थोडीच असणारेत? इथे काम करणारे नोकरही ऐशो-आरामात जगतात बरं. शेवटी ते द ग्रेट अंबानींचे नोकर आहेत. आता हे वाचल्यावर तुमच्यातल्या बऱ्याच जणांच्या मनात विचार चमकून गेला असेल, की चला सगळं सोडून अंबानींच्या दारी चाकरी पत्करुया. पण इतकं सोपं नाही बरं ते…!
अंबानींच्या एंटीलियामध्ये नोकरी मिळण्यासाठी ओळख-बिळख कामाची नाही बरं. त्यासाठी तुम्हाला चक्क अवघड परिक्षा द्यावी लागते. सहाजिकच आहे म्हणा, तुम्हीच पहा एंटीलिया मुंबईच्या सगळ्यात महागड्या एरिआतले २७ मजली घर आहे. त्यामध्ये मोठ्या मंदिरापासून ते हेल्थ स्पा, सलॉन, बॉलरुम, ३ स्विमिंग पूल, योग आणि डान्स स्टूडियो इतकचं नाही तर, आइसक्रीम पार्लर आणि एक प्रायव्हेट थिएटरसुध्दा आहे बरं.
या महालाच्या सहाव्या मजल्यावर कार पार्किंगची व्यवस्था केली आहे. तिथे डोळ्यांचे पारणं फेडणाऱ्या तब्बल १६८ कार्स थाटात उभ्या आहेत. आता २७ मजली ५७० फुट उंच महल म्हटल्यावर लिफ्ट्स तर पाहिजेच ना? तर थोड्या थोडक्या नाही एंटीलियाला ९ लिफ्ट्सची प्रोव्हीजन आहे. इतका सगळा डोलारा साध्या सुध्या नोकरांना थोडी सांभाळता येणार म्हणूनच चोखंदळ मुकेश भाई नोकर निवडताना देखिल कसून परिक्षा घेतात.
तर अंबानींना नोकर हवे असल्यास ते रितसर वृत्तपत्रात तशी जाहिरात छापतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीला व्हेकंसी फॉर्म भरुन एक लेखी परिक्षा द्यावी लागते. या परिक्षेत हॉटेल मॅनेजमेंटपासून ते सामान्य ज्ञानापर्यंत कोणतेही प्रश्न विचारले जातात. जो या परिक्षेत अपयशी होतो त्याला थेट बाहेरचा दरवाजा दाखविला जातो. पण जो या परिक्षेत यशस्वी होतो त्याचे आयुष्यच बदलून जाते राव!
अंबानींकडे शेकडो गाड्या आहेत. त्या साठी वेगवेगळे ड्रायव्हर अपॉईंट केले आहेत. आता साक्षात अंबानी यांची गाडी चालवायची म्हटल्यावर ही नोकरी मिळणं सोपं थोडीच असणार? ड्रायव्हर नेमण्यासाठी वेगवेगळ्या कंपनींना कॉट्रॅक्ट दिले जाते.
त्यांचे रितसर टेंडर निघते. त्यात निवडलेल्या कंपनींच्या ड्रायव्हर्ससाठी व्हेकंसी निघते. त्यातल्या निवडक ड्रायव्हर्सची अंतिम परिक्षा घेतली जाते. त्या परिक्षेत त्यांना गाडी चालविण्याचा अनुभव किती, त्याचबरोबर त्या ड्रायव्हरची आकलन आणि सहनशक्ती किती हेही पारखून घेतले जाते. मग परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या ड्रायव्हर्सला संबंधित कंपनी ट्रेनिंग देते. त्यानंतर त्यांच्या योग्यतेवर त्यांची सॅलेरी ठरवली जाते.
अंबानींच्या ड्रायव्हर्सची सॅलरी महिना प्रत्येकी २ लाखांच्या वर आहे बरं. पण अर्थातच काम तितकेच जोखमीचे आहे.
0 Comments