तुम्हीही इथे राहायला जाऊ शकता, मात्र अट अशी की इथे ‘मरण्याची परवानगी नाही’

Survive करण्यासाठी मनुष्याला काय काय करावं लागतं याचं हे विचित्र उदाहरण आहे


‘मृत्यू’ म्हणजे अशी गोष्ट त्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. काय सांगावं तुमची वेळ कधी येईल आणि तुम्हाला मृत्यू येईल. पण कोणत्याही गोष्टीवर बंदी घालण्याची आवड असणाऱ्या मनुष्याने या मृत्यूवर सुद्धा बंदी घातली आहे. हो मंडळी, एक असा देश आहे जेथील एका विशिष्ट प्रदेशात लोकांना मरण्यास परवानगी नाही. आश्चर्य म्हणजे गेल्या ७० पेक्षा जास्त वर्षांपासून इथे कोणाचा मृत्यू झालेला नाही. थांबा, थांबा जास्त कन्फ्युज होऊ नका. मवाली आहे ना तुम्हाला अगदी सोप्प्या भाषेत सगळं समजावून सांगायला!

Source : bbci.co.uk

ज्या देशात ही जागा आहे त्या देशाचे नाव म्हणजे नॉर्वे! नॉर्वे देशाला मिडनाईट सन कंट्री असे सुद्धा म्हणतात. म्हणजे या देशात सामान्यत: मे पासून जुलै पर्यंत सूर्य अस्ताला जात नाही. सोप्प्या भाषेत सांगायचे तर इथे या काळात अर्थात तब्बल ७६ दिवस रात्र होतच नाही. सूर्याचा प्रकाश लख्ख असतो.

तर अशा या अद्भुत देशामध्ये अत्यंत उत्तर टोकाला स्वालबार्ड नावाचा एक प्रदेश आहे आणि याच प्रदेशात ती जागा आहे जेथील प्रशासनाने नागरिकांच्या मृत्यूवर चक्क बंदी घातली आहे. लॉंग इयरबेन नावाची ही जागा पृथ्वीच्या अगदी उत्तर टोकाला आहे. आणि येथील लोकसंख्या सुद्धा अंदाजे १००० इतकीच आहे.

जगातील सर्वात थंड प्रदेशांपैकी एक जागा म्हणून सुद्धा लॉंग इयरबेनचा समावेश केला जातो. इथे वर्षभर कडाक्याची थंडी पडलेली असते. पण या थंडीमूळे होतंय काय की या जागेत कोणी मनुष्य मृत्यू पावला तर त्याची बॉडी सडत नाही आणि त्याचे विघटन होत नाही.

Source : worldbybike.com

आता तिथे सगळे ख्रिश्चन त्यामुळे आपल्या हिंदू धर्मासारखी बॉडी जाळण्याची प्रथा तर तिथे नाही. ते आपल्या परंपरेनुसार माणूस मेला की त्याचे दफन करतात. पण लॉंग इयरबेन मधील तापमान इतके कमी आहे की ते बॉडीचे विघटन करण्याऐवजी बॉडी आहे तशीच ठेवते. हेच कारण आहे की येथील प्रशासनाने नियम बनवला की लॉंग इयरबेन मध्ये कोणी मृत्यू पावणार नाही.

याच नियमामुळे गेल्या ७० वर्षांत इथे कोणाचाच मृत्यू झालेला नाही. या गोष्टीवर तुमचा सुद्धा विश्वास बसत नसेल ना? पण यासाठी तुम्हाला हा नियम नीट समजून घ्यावा लागेल. या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला आजार झाला वा तो व्यक्ती मारायला टेकला तर त्याला तत्काळ दुसऱ्या जागी हलवले जाते. जेथे त्याच्यावर योग्य अंतिम संस्कार केले जातात.

लॉंग इयरबेन मध्ये हा नियम लागू करण्याचे कारण सुद्धा रंजक आहे. झाले असे की १९१७ साली एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तो एनफ्ल्यूएंजा आजाराने ग्रस्त होता. तेव्हा त्या व्यक्तीचे शव हे लॉंग इयरबेन मध्येच दफन करण्यात आले. पण समस्या अशी झाली की त्या व्यक्तीच्या बॉडीचे विघटन झाले नाही आणि त्याच्या शरीरातील एनफ्ल्यूएंजा वायरस सुद्धा सक्रीय राहिला. यामुळे लॉंग इयरबेन मध्ये महामारी पसरण्याचा धोका निर्माण झाला.

Source : wordpress.com

बस्स हेच कारण आहे की प्रशासनाने नवीन नियम काढला ज्यानुसार कोणालाही इथे मरण्याची परवानगी नाही. आजारपणात त्या व्यक्तीला दुसऱ्या ठिकाणी प्लेनने पाठवले जाते. जरी कोणा व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झालाच तर त्या व्यक्तीचे शव लॉंग इयरबेन मध्ये दफन न करता दूर ठिकाणी दफन केले जाते, जिथे बॉडीचे योग्य विघटन होऊ शकेल.

Survive करण्यासाठी मनुष्याला काय काय करावं लागतं याचं हे विचित्र उदाहरण आहे, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला नक्की कळवा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal