‘अरे बिअरने काय नाय होत रे’ असं म्हणणाऱ्यांनी एकदा ‘हे’ वाचाच!

साधारणतः अल्कहॉलिक ड्रिंक्समध्ये प्रतिग्रॅम ४ ते ७ कॅलेजरी असते. म्हणजेच १०० ग्रॅम बिअर घेतली तर त्यात ४३ टक्के कॅलरीज् असतात तर बिअर शिवाय इतर मादक द्रव्यांमध्ये २९५ पर्यंत कॅलेरिजचं प्रमाण असतं.


आजकाल लठ्ठपणा किंवा अशक्तपणा अशा दोन समस्या लोकांना भेडसावतात. वजन कमी करण्यासाठी किंवा वाढविण्यासाठी लोक काय काय नाही करत? पण बदललेल्या जीवनशैलीचे परिणाम शरिरावर दिसून येतात. त्यात तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी तुमच्या शरिरावर परिणामकारक ठरतात. त्यात फास्टफुड आणि बिअर, दारू जर तुमच्या नियमित सेवनात असेल तर तुमच्या तब्येतीच तंत्र बिघडलंच म्हणून समजा. वारंवार दारुचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढतोच त्याच बरोबर तुम्हाला यकृताच्या समस्याही उद्भवू लागतात.

Source : gqindia.com

दारु आरोग्यासाठी घातक

दारु खरंतर विषच आहे. आपण त्याला स्लो पॉयझन म्हणू शकतो. मात्र दारुंच्या अनेक प्रकारांपैकी एक म्हणजे द्राक्षापासून बनवलेली वाईन काही प्रमाणात आरोग्यासाठी हितकारक ठरते. रेड वाईनचं सेवन हे पचनशक्तीही मजबूत करतं. मर्यादित प्रमाणात रेड वाईनचं सेवन केल्यास पोटातील बॅक्टेरिया नाश पावतात आणि पोटांचा अल्सरही कमी होतो. ब्लड क्लॉटींग म्हणजेच रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या समस्येवरही रेड वाईन गुणकारी आहे. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि पल्मनरी एम्बोलिज्मचा धोकाही कमी होतो. मात्र म्हणून तुम्ही दररोज रेड वाईन प्यायलात तर मात्र ती शरिरासाठी घातकच ठरते.

अति दारु सेवनामुळे तुमचे कॅलेस्ट्रॉल वाढणे, रक्तदाब वाढण्यासारखे लाईफस्टाईल डिसॉर्डस् तुम्हाला होऊ लागतात. मेंदू पासून तुमच्या मसल्सपर्यंत सगळ्यावर दारुचा परिणाम होतो. मात्र सर्वात जास्त दुष्परिणाम तुमच्या किडनीवर अर्थात मूत्रपिंडावर होत असतो.

दारू प्यायल्याने जास्त मूत्र निर्माण होते, परिणामी मूत्रपिंडावर जास्त दबाव येतो. दारुच्या सततच्या सेवनाने मूत्रपिंड त्याचा भार झेलू शकत नाही आणि कालांतराने अधिक दबावामुळे मूत्रपिंड निकामी होत जाते.

Source : ixstatic.com

बिअर ही दारूच असते

आजकाल तरुणांमध्ये बिअर पिण्याचे प्रमाण तर खूप वाढले आहे. तरुण बिअर अगदी कोल्ड ड्रिंक प्यायल्या प्रमाणे पितात. नव्हे ते बिअरला दारु समजतच नाहीत. तुम्हीही जर नियमित बिअर पीत असाल आणि तुमचे बेली फॅट वाढायला लागले की दारूचे तुमच्यावर दुष्परिणाम होण्यास सुरुवात झालीच आहे म्हणून समजा. बरं बिअर प्रत्येकवेळी तुमचे बेली फॅटच वाढेल असही नाही, तर एकूणच बिअरमुळे तुमची जाडी वाढू शकते. कारण बिअरमध्ये माल्टोज किंवा माल्टोडेक्सट्रिनच्या स्वरुपात साखरच असते. या साखरेमुळेच तुमच्या शरिरातले फॅट्स वाढतात.

एक सोप्प गणित आहे. साधारणतः अल्कहॉलिक ड्रिंक्समध्ये प्रतिग्रॅम ४ ते ७ कॅलेजरी असते. म्हणजेच १०० ग्रॅम बिअर घेतली तर त्यात ४३ टक्के कॅलरीज् असतात तर बिअर शिवाय इतर मादक द्रव्यांमध्ये २९५ पर्यंत कॅलेरिजचं प्रमाण असतं.

जर तुम्ही कॉकटेल पित असाल तर अजूनच कॅलेरिज् वाढतात. कारण त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या ज्युसमध्ये अतिरिक्त प्रमाणात साखर व इतर केमिकल असतात. अर्थातच त्यामुळे तुम्हाला मधुमेहासारखे रोग जडू शकतात. कारण ड्रिंक्स घेणारा कोणताही माणूस एक ड्रिंक घेऊन थांबत नाहीच… मग त्याचे वजन वाढायचे थांबेलच कसे?

निद्रानाश

हो तुम्ही नियमित अल्कहोलचे सेवन केले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या झोपेवरही होतो असं संशोधनातून निष्पन्न झालं आहे. खरं तर बरेच लोक झोप नीट येण्यासाठी म्हणून दारुचे सेवन करतात. त्याने होतं काय, की त्यांची नैसर्गिक झोप येण्याच्या प्रक्रियेलाच खिळ बसतो आणि निद्रानाशेच्या गर्ततेत तुम्ही अडकत जाता.

शरिरातील मेलाटोनिनवर अल्कोहोलचे न्यूरोटॉक्सिक परिणाम होतात. त्यामुळे तुमच्या झोपेच्या वेळांमध्ये गडबड होण्यास सुरुवात होते. झोप लागली तरी वारंवार विचित्र स्वप्न पडू लागतात आणि झोपेचं खोबरंच होतं. परिणामी तुमच्या पचनसंस्थेवरही याचा असर जाणवायला लागतो. आणि तुमच्या हार्मोन्सवरही.

वजन कमी करू इच्छित असाल तर आजच दारूला बाय म्हणा

तुम्ही वाचलं असेलच.. दारु तुमच्या प्रत्येक अवयवाला निकामी करत जाते. तुमचं वजन वाढवून तुम्हाला बेढब करते. दारुमुळे तुमच शरीरच नाही तर संपूर्ण आयुष्यच बेढब होते.. तुम्हीच पहा आता पाच पन्नास रुपयांची (माहीत आहे महाग असते ते) दारू आपल्याला निसर्गाने दिलेल्या सुंदर शरिराची दशा करते.

काही क्षणांच्या धुंदीसाठी तुम्ही आयुष्य पणाला लावता. त्यापेक्षा भरपूर पाणी प्या आणि निरोगी जीवन जगा. आणि धुंदी, नशा हवीच असेल तर संगीत,कला किंवा पुस्तकांमध्ये शोधा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *