ही गोष्ट आहे एका यशस्वी उद्योजकाची, Coditas ह्या कंपनीच्या मालकाची. अर्थात मितुल बीड नावाच्या तरुणाची! मितुल बीड चा जन्म केनिया मधला होय. त्याच्या जन्माच्या आधीच मितूलचे आई वडील केनिया या देशात गेले. वयाच्या १९ वर्षी मितूल भारतात आयआयटी मुंबईमध्ये पुढचं शिक्षण घ्यायला आला. पण आयआयटीमधून बी.टेक करणे एवढं सोपं नव्हतं.
मितूलला हे शिक्षण पूर्ण करणं अवघड जाऊ लागलं. केनियामध्ये असताना तो शिक्षणात अव्वल नंबर काढत असे. तांत्रिकी शिक्षण संपल्यानंतर मितूलने तब्बल दहा वर्षे वेगवेगळ्या आयटी कंपन्यांमध्ये नोकरी केली.
नोकरी करत असतानाच त्याने छोटे छोटे धंदेही केले. पण ते अयशस्वी ठरले. अखेर २०१४ मध्ये त्याने ‘कोडीटास’ नावाची कंपनी फक्त एक लाख रुपये गुंतून उभी केली. पुण्याच्या विमान नगर स्थित ह्या कंपनीचे आजचे मूल्य आहे तब्बल १२० कोटी रुपये! गेल्या सात वर्षात कोडीटासने १५० कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आपली प्रगती सुरु ठेवली आहे. विमान नगर स्थित ही कंपनी एवढी मोठी झाली आहे की दोन मोठ्या इमारतींमधून मितुलला व्यवसायाचा डोलारा सांभाळावा लागतो.
मितूल म्हणतो, “आम्हाला आमचे कर्मचारी जास्त प्रिय आहेत आणि म्हणूनच आम्ही त्यांना जपतो. २०२० सालच्या लॉक डाऊन मध्ये मितूलकडे फक्त सहा महिन्याचे रिझर्व फंड्स होते पण त्याने कोणाच्याही पगारावर गदा येऊ दिली नाही. या काळात त्याने कुठल्याही कर्मचाऱ्याला काढलं सुद्धा नाही.
म्हणूनच की काय आज त्याच्या कंपनीत ६०० कर्मचारी कामाला आहेत. क्लीन कोड हि ह्या कंपनीची संकल्पना आहे आणि म्हणूनच आज कोडीटासने प्रसिद्धी कमावली आहे. आज कोडीटास आपल्या गुणवत्ते करता जगप्रसिद्ध ठरली आहे.
मितुलला कम्प्युटर्स आवडायचे नाहीत आणि म्हणूनच त्याने स्वत: कोडींग कधी केलं नाही पण नोकरीत असताना त्याच्या अधिकाऱ्यांनी हे जाणलं आणि त्याला कोडींग वर टाकलं. हळूहळू त्याला कोडींगचं काम आवडू लागलं आणि त्याच क्षेत्रात त्याने प्रगती केली. ह्यापुढे त्याने टॅलेंटटीका आणि जेम्स स्टोन सिस्टम अशा दोन कंपन्यांमध्ये नोकरी केली.
२००९ सालात मितूलला कंपनी मधून काढण्यात आले. कारण होतं रिसेशन. यानंतर त्याने राइजस्मार्ट या कंपनीत थोड्यावेळ नोकरी धरली आणि मग ओमनीसंट कंपनीत चार वर्ष काम करून, नोकरीला कंटाळून कोडीटास ही स्वत:ची कंपनी स्थापन केली.
मितूलने नोकरी करत असताना बरेच जोडधंदे केले पण ते यशस्वी ठरले नाहीत. त्याने पुण्यात जायका नावाने गुजराती थाळीचे हॉटेल सुद्धा सुरु करुन बघितले. हेसुद्धा चालले नाही. त्याने सोफा फॅक्टरी सुद्धा उभी करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला खूप नुकसान झाले. शेवटी एक लाख रुपये हाताशी घेऊन त्याने कोडीटास कंपनी स्थापन केली. ह्यात सहभागी होती ती त्याची पत्नी प्रीती. प्रीती कंपनीचं एच आर आणि ओव्हरसीज ऑपरेशन डिपार्टमेंट सांभाळते.
मितूल आज पुण्यात आपल्या पत्नीबरोबर आणि दोन मुलींबरोबर राहतो. त्याच प्रमाणे त्याचे आई वडील सुद्धा त्याच्याबरोबर हातात. यशस्वी उद्योजकाची ही कहाणी.
0 Comments