चंगेज खान इतिहासातील क्रूर पण त्याच्या लोकांच्या दृष्टीने अत्यंत महान असा राजा. सगळी पृथ्वी काबीज करायची त्याची इच्छा होती. पण त्याने कधीच भारतावर हल्ला केला नाही. इतिहास जाणून घेताना हा प्रश्न सर्वांनाच आवर्जून पडतो. चला आज एक रंजक इतिहास जाणून घेऊया. हा इतिहास कळण्यासाठी चंगेझ खानाची थोडी पार्श्वभूमी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
साधारण ११५८ साली, मंगोलिया या देशात चंगेज खान याचा जन्म झाला. त्याचं पाळण्यातलं नाव तेमुजीन होतं. त्याचे वडील येसूगेइ, ते बोरजेजीन जमातीचे एक ताकदवान आणि श्रीमंत व्यक्तिमत्व होते. ११५८ च्या काळात मंगोलिया मध्ये अनेक जमाती होत्या. त्यांचे एकत्रीकरण तेमुजीन म्हणजेच चंगेज खानने केले. पण त्या काळात ह्या सगळ्या जमाती एकमेकांशी सतत लढत असत. आताचं जे चीन हे राष्ट्र आहे ते या जमातींमध्ये भांडण लावून देत असे. म्हणजे बघा या चीन्यांची कुरापती करण्याची परंपरा किती जुनी आहे ती! कोणीही भांडणे सोडवायचा प्रयत्न केला तर चीनी सैन्य थेट त्याला संपवत असे. मंगोलियन लोकांची एकजूट आपल्याला भारी ठरू शकते हे चीनला माहित होते. अशाप्रकारे चीनने मंगोलियन जमातीत अनेक शतकं भांडण सुरूच ठेवलं. ह्यामुळे मंगोलिया कधीच एकसंध राष्ट्र म्हणून निर्माण होऊ शकलं नाही.
जेव्हा तेमुजीन म्हणजेच चंगेज खान बारा तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचा तूर्क जमाती कडून खून करण्यात आला. चंगेज खान ज्या जमातीतून होता त्या जमातीने त्याला टाकून दिले आणि त्याचं कुटुंब उघड्यावर आलं.
तुम्हाला तर माहीतच आहे की मंगोलिया देश कसा आहे. बरसाचा भाग असा राकट आणि वैराण वाळवंटासारखा आहे. रस्त्यावर आल्यावर त्याचं कुटुंब कसंतरी करून बचावलं आणि चंगेज खान याच्यातून एक धडा शिकला, की आपल्याकडे सत्ता असेल तर पैसा सहज येतो पण सत्ता पैशातून विकत घेऊ शकत नाही. हे कालातीत शहाणपण तो वयाच्या बारा-तेराव्या वर्षी शिकला आणि तेव्हापासून सूडाच्या भावनेने सगळ्यांशी युद्ध करू लागला.
हेतू एकच की युद्ध जिंकायचे. कमावलेला पैसा त्याने कधीच स्वत:जवळ ठेवला नाही ना त्या पैशाची त्याला हाव होती. कमावलेला पैसा तो आपल्या सैन्यातील लोकांना वाटत असे. अशा तऱ्हेने चंगेझ खानने मंगोलिया हे राष्ट्र उभे केले. त्याच्या महत्त्वकांक्षीपणामुळे मंगोलियाकडे गरजेपेक्षा जास्त पट पैसा जमा होऊ लागला. अख्खं आयुष्य चंगेझ खानने एकच गोष्ट डोक्यात ठेवली ती म्हणजे सत्ता.
१२०६ साली त्याने मंगोलियातील सर्व जमातीं विरुद्ध युद्ध केले व त्यांना नमवून तो त्यांचा अनभिषिक्त सम्राट झाला. त्यानंतर त्याने मंगोलियातील सर्व जमातींना एकत्र आणले आणि मंगोलिया हा देश स्थापित केला. याच काळात तेमुजीनला चंगेझ खान अर्थात ‘सार्वत्रिक शासक’ म्हणजेच ‘युनिवर्सल रुलर’ असा किताब त्याच्या देशवासीयांनी दिला.
चीन विरुद्ध चंगेझ खानच्या मनात नेहमी राग असे कारण चीन मुळेच मंगोलियातल्या जमाती एकमेकांशी भांडत असत. आपल्या हातात सत्ता आल्यावर चंगेज खानने मनाशी खूणगाठ बांधली की चीनशी युद्ध करून तो देश सुद्धा आपल्या पायाखाली लोळवायचा. त्याप्रमाणे १२१०-१२१५ या कालखंडात चंगेझ खानने चीनवर आपली सत्ता स्थापन करत बीजिंगला पूर्णपणे एकटे पाडले. एक एक पाऊल पुढे टाकत टाकत चंगेज खान पार तुर्कमेनिस्तान, उज्बेकिस्तान, आतचे इराण, अफगानिस्थान, आताचा पाकिस्तान आणि भारतीय उत्तर पश्चिम विभाग म्हणजेच वायव्य पर्यंत येऊन पोहोचला.
एवढ्या जवळ येऊन सुद्धा भारतावर आक्रमण मात्र त्याने केले नाही. तो सिंधू नदीच्या भागात येऊन थांबला आणि भारताशी युद्ध करण्याऐवजी परत फिरला. भारत देश तेव्हा इस्लामिक सत्तेखाली होता. त्यांना हरवणे त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. पण तरी चंगेझ खानने तसं केलं नाही. सिंधू नदीच्या पल्याड असणारा तेव्हाचा भारत हा अत्यंत संपन्न होता. तेथील एवढी संपत्ती आपल्या खजिन्यात जमा करावी असेही त्याला वाटले नाही.
तो परत माघारी फिरला. पण असे का? तर इतिहास नीट चाळल्यावर काही कारणे समोर येतात. चंगेज खानहा सर्वधर्मसमभाव मानणारा होता. त्याला कोणत्याही धर्माविषयी आकस नव्हता. त्याचा सगळ्यात मोठा शत्रू चीन होता. त्याचे ते ध्येय पूर्ण झाले होते. भारतातील हिंदुत्व संपवण्याची गरज त्याला वाटली नाही. तुम्हाला सुद्धा माहितच असेल की मंगोलियन देशात बुद्धिझम प्रचलित आहे. म्हणजेच मंगोलिया हे ‘बुद्धिस्ट राष्ट्र’ आहे.
चंगेज खानला ‘बुद्धीजम’ आणि ‘हिंदुत्व’ यात समानता जाणवली आणि म्हणूनच त्याने भारत देशावर कधीही हल्ला केला नाही. भारताबद्दल तो खूप ऐकून होता आणि अशा पावन भूमीवर रक्त सांडवण्याची गरज त्याला वाटली नाही.
हे तर झालं इतिहासातील कारण, पण त्याने भारतावर हल्ला का केला नाही याद्दल एक छोटीशी गोष्ट सुद्धा प्रचलित आहे बरं का! तर झालं असं की सिंधू नदीच्या तटावर एक ‘काल्पनिक एकश्रुंगी घोडा’ त्याला दिसला. ह्या घोड्याने म्हणजेच ‘युनिकॉर्न’ ने त्याला भारत देशावर हल्ला करण्यापासून थांबवले. असे सुद्धा म्हटले जाते. अशा अजून अनेक दंतकथा आहेत. पण इराण, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि अफगानिस्तान ह्या राष्ट्रांवर सत्ता गाजवून चंगेझ खानने तिथे बौद्ध धर्म स्थापन केला.
भारताकडे तो अजिबातच फिरकला नाही याचे खरे कारण तोच जाणो, पण इतिहासातील नोंदी पाहता त्याला भारतावर आक्रमण करणे योग्य वाटले नाही, तसा त्याचा कोणताही विचार नव्हता तेच दाखवतात.
0 Comments