The Kashmir Files : एका हिंदू शिक्षिकेवर बलात्कार करून तिचे पोट फाडले, का झाला हा नरसंहार?

तेव्हा त्यांनी फतवा काढला की काश्मीर मध्ये फक्त मुसलमान राहतील. हिंदू नाही. जर राहायचे असेल तर इस्लाम कबुल करा नाहीतर मरा.


द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट आला आणि लगेच वादात अडकला. अर्थात त्याला कारणीभूत ठरली चित्रपटाची कथा आणि चित्रपट ज्या घटनेवर बेतला आहे ती कथा! १९९० साली काश्मीर मधील पंडितांना काही समाजकंटक मुस्लिमांनी खूप त्रास दिला होता, त्यांचा खूप मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. कित्येक काश्मीरींचे प्राणही त्यात गेले, अनेकांची कुटुंबे नष्ट झाली. हि एक अशी सत्य घटना आहे ज्यावर आजही काश्मीरचं आणि कधी कधी अख्ख्या भारताचं राजकारण सुद्धा चालतं!

Source: jagran.com

हा चित्रपट काश्मीरच्या रक्तरंजित इतिहासाचा वेध तर घेतोच पण या घटनेत ज्यांनी खूप काही गमावलं आहे त्यांच्या काळजाला देखील हात घालतो. चित्रपट सत्य घटनेवर असला तरी कथा ही काहीशी रंगवलेली आणि काल्पनिक आहे. हा चित्रपट पुष्कर नाथ पंडित यांच्या कुटुंबाभोवती बनवला आहे. पुष्कर नाथ पंडित यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आहेत. यात त्यांच्या मुलाचे नाव हिटलिस्ट मध्ये येते आणि नंतर दहशतवाद्यांकडून त्याची हत्या होते. तसेच, त्यांची सून आणि नातू यांच्याही डोक्यात गोळ्या झाडल्या जातात.

चित्रपटात दाखवलेल्या वेदना पाहून प्रेक्षकांना प्रश्न पाडतात की धर्माच्या नावाखाली माणूस इतर माणसासोबत इतका क्रूर कसा वागू शकतो. पण वास्तवात नक्की घडलं काय होतं? हे आपण जाणून घेऊया.

३२ वर्षे झाली तरी तेथील निर्वासित काश्मिरी पंडितांच्या जखमा भरलेल्या नाहीत. त्यांनी अजूनही त्यांच्या मायदेशी परतण्याची आशा सोडलेली नाही. अल्पसंख्याक असलेले हिंदू काश्मिरी पंडितांचे तेथून निर्गमन होऊन साधारण ३० वर्षे झाली आहेत. जानेवारी ते मार्च १९९० च्या दरम्यान त्यांच्या निघून जाण्याची परिस्थिती, संख्या आणि त्यांच्या परतीचा मुद्दा ही काश्मीरच्या वास्तवाची एक महत्वाची बाजू आहे. यामुळे भारतातील हिंदू-मुस्लिम वादाला खतपाणी घातले जात असल्याचा सुद्धा दूर पाहायला मिळतो.

२० जानेवारी १९९० रोजी ‘गावकडल’ येथे शांततापूर्ण मिरवणुकीत सीआरपीएफ मशीनगन ने ५० हून अधिक काश्मिरी मुसलमानांना मारले आणि त्याचबरोबर अनेकजण जखमी झाले. २१ जानेवारी ही तारीख काश्मिरी मुसलमान ‘नरसंहाराची सुरुवात’ – ‘पहिले हत्याकांड’ म्हणून लक्षात ठेवतात. तेव्हा त्यांनी फतवा काढला की काश्मीर मध्ये फक्त मुसलमान राहतील. हिंदू नाही. जर राहायचे असेल तर इस्लाम कबुल करा नाहीतर मरा.

पंडित राजकीय कार्यकर्ते, टिकलाल टपलू यांची सप्टेंबर १९९० मध्ये त्यांच्या निवासस्थानाबाहेर सशस्त्र लोकांनी गोळ्या झाडून हत्या केली. १९९० साली खोऱ्यातील मशिदींमध्ये जनसमुदाय जमून भारतविरोधी आणि पंडितांविरोधी घोषणा देऊन शेकडो निरपराध पंडितांवर अत्याचार, हत्या आणि बलात्कार झाले. वर्षाअखेरीस, सुमारे ३,५०,००० पंडितांनी खोऱ्यातून पळ काढला आणि जम्मु येथे आश्रय घेतला.

२ फेब्रुवारी १९९० रोजी सतीश टिकू या तरुण हिंदू समाजसेवकाची हब्बा कडल, श्रीनगर येथील निवासस्थानी हत्या करण्यात आली. १३ फेब्रुवारी १९९० रोजी ज्येष्ठ काश्मिरी कवी सर्वानंद कौल प्रेमी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. जानेवारी महिन्यात अनेक गुप्तचर अधिकाऱ्यांची हत्या करण्यात आली. ४ जून १९९० रोजी गिरीजा टिकू या काश्मिरी हिंदू शिक्षिकेवर दहशतवाद्यांनी सामूहिक बलात्कार केला होता, ज्यात त्यांनी ती जिवंत असतानाच तिचे पोट फाडले आणि तिच्या शरीराचे दोन तुकडे केले होते.

डिसेंबर १९९२ मध्ये कामगार संघटनेचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते हृदय नाथ वांचू यांची हत्या करण्यात आली आणि काश्मीर फुटीरतावादी आशिक हुसेन फक्टू यांना या हत्येसाठी  दोषी ठरवण्यात आले. वंधामा गावात महिला आणि मुलांसह २३ काश्मिरी पंडितांना जानेवारी १९९८ मध्ये गोळ्या घातल्या. हजारो पंडित अजूनही ८ बाय ८ च्या निर्वासित वसाहतींमध्ये आहेत. दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही काश्मिरी पंडित समाज अजूनही त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर अजून येऊ शकलेला नाही.

Source: firstpost.com

हिंदू काश्मीर पंडितांवर अनंत काळापासून सुरू असलेले अत्याचार आणि त्यांचे कटू सत्य ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये दाखवण्यात आले आहेत. या क्रूर हिंसाचाराला उघडकीस यायला जवळपास ३२ वर्षे लागली. काश्मीर नरसंहारातील पहिल्या पिढीतील काश्मिरी पंडितांच्या व्हिडीओ मुलाखतींवर आधारित हा चित्रपट वादातीत असला तरी २०२२ चा सर्वात यशस्वी चित्रपट म्हणून नावाजला गेला आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav