इतिहास्त अशा अनेक वीरांगना होऊन गेल्या ज्यांनी आपल्या मागे खुप मोठा प्रेरांदायी इतिहास सोडला. पण दुर्दैव हे कि त्यांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचलाच नाही. अशीच एक शूर स्त्री म्हणजे राणी दुर्गावती होय. त्या इतक्या शूर होत्या की त्यांनी शेवटपर्यंत एकटीने आपले राज्य राखले आणि त्यासाठी सर्वस्व अर्पण केले. पण नक्की कोण होत्या राणी दुर्गावती?

राणी दुर्गावती यांचा जन्म ५ ऑक्टोबर १५२४ साली महोबाच्या किल्ल्यात झाला. राणी दुर्गावतींचे वडील पृथ्वी सिंह चंडेल हे गढमंडल राज्याचे राजा होते. दुर्गावती राणी या त्यांच्या एकमेव संतान होत्या. राणी दुर्गावती नुसत्या दिसायलाच सुंदर नव्हत्या तर त्या साहसी आणि शूर वीर होत्या. म्हणूनच त्या अख्ख्या देशात प्रसिद्ध झाल्या होत्या. लहानपणापासूनच त्यांना तलवार, धनुष्यबाण आणि बंदूका यांचे प्रचंड आकर्षण होते. तारुण्यात पदार्पण करेपर्यंत त्यांनी या सगळ्या कला आत्मसात केल्या आणि एक कुशल योद्धा बनल्या.
राणी दुर्गावती यांचे लग्न गोंडवाना राज्याचे राजे संग्राम शहा यांच्या मुलाशी म्हणजेच दलपत शहा मडावी यांच्याशी झालं. पण लग्नाच्या चार वर्षानंतर त्यांच्या पतीचा आकस्मिक मृत्यू झाला आणि राणी दुर्गावती देवी या विधवा झाल्या.
आपल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर राणी दुर्गावतींनी आपला मुलगा वीर नारायण याला सिंहासनावर बसवून राज्याच्या संरक्षक म्हणून त्या राज्य सांभाळू लागल्या. त्यांनी अनेक मठ, विहिरी, धर्मशाळा, बावड्या बांधल्या आणि त्यांच्या शासना आपल्या राज्याची त्यांनी खूप प्रगती सुद्धा केली. मुघल सम्राट अकबराचा सेनापती आसिफ खान याची दुर्गावती देवींच्या राज्यावर नजर होती. त्यामुळे अनेकदा दोन्ही सैन्य आमने सामने सुद्धा आले पण आसिफ खानचा मनसुबा कधीच सफल झाला नाही.

एका युद्धात राणी दुर्गावती यांनी इतके असीम शौर्य गाजवले की त्यांचे युद्धकौशल्य बघून आसिफ खान सुद्धा चक्रावला आणि त्याने तिथून काढता पाय घेतला. त्याने अकबराला जाऊन सांगितले सुद्धा की, “एखादी स्त्री एवढी शूर असू शकते यावर माझा आज विश्वास बसला.”
राणी दुर्गावती कडून झालेल्या पराभवाने आसिफ खान चांगलाच हादरून गेला होता. पण तो देखील स्वस्थ बसणाऱ्यांतला नव्हता. त्याने परत युद्धात उतरण्याची परत तयारी केली आणि या वेळेला मात्र दहा हजार सैनिक, सशस्त्र सेना आणि तोफखाने घेऊन परत गोंडवाना राज्यावर हल्लाबोल केला. पण दुर्गावती राणीचे शौर्य इतके अगाध की तिने मुघलांची पाळता भुई थोडी केली.
राणी दुर्गावती देवीकडून दोनदा हार पत्करावी लागल्यामुळे सम्राट अकबर चांगलेच हादरून गेले होते. आता काय करायचे या विवंचनेत असतानाच त्यांनी राणी दुर्गावती देवींचा पांढरा हत्ती सरमन आणि राज्याचे विश्वस्त प्रधान आधार सिंग यांना भेटी च्या रूपात आपल्या मंडळात बोलावले. पण राणी दुर्गावती यांनी तसं होऊ दिलं नाही. त्यांनी अकबर भेटीची ही परवानगी नाकारली.

यावर अकबर बादशाह चिडला आणि त्याने स्वत:हून गोंडवाना राज्यावर चालून जायचे ठरवले. अकबराने तिसऱ्यांदा गोंडवाना राज्यावर पूर्ण ताकद लावून २३ जून १५६४ ला तिसरा हल्ला केला. अकबर बादशहाचे सेनापती आसिफ खान सुद्धा यावेळी स्वत:च्या फौजेसह सामील झाला. मुघल फौज अफाट होती.
मात्र राणी दुर्गावती देवींकडे पुरेसे सैन्य नव्हतं. पण त्या घाबरल्या नाहीत. या युद्धात केवळ दोन हजार सैनिकांना घेऊन राणी दुर्गावती देवीने अकबर बादशहाचे तीन हजार सैनिक ठार मारले. पण मुघलांची राखीव तुकडी आली आणि इथे सगळा खेळ फिरला. अकबराने पुन्हा आपल्या सैन्याला एकवटून एकत्र हल्ला केला. आता मात्र राणी दुर्गावतींचे सैन्य मुघलांपुढे टिकले नाही. राणी दुर्गावती देवी सुद्धा घायाळ झाल्या होत्या आणि एकट्या पडल्या होत्या. आपल्या अंतिम समयी त्यांनी आपली कट्यार आपल्याच शरीरावर भोसकून आत्मबलिदान केले. यावेळी त्यांचे वय होते अवघे ३९ वर्षे!
जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या गोंडवाना राज्याकरिता झगडत राहिल्या. ही होती कहाणी एका वीरांगणेची, भारताच्या शूर मुलीची, राणी दुर्गावती देवी यांची.
0 Comments