आपलं भारतीय संविधान ‘सेक्युलर’ असल्याचा दावा आहे खोटा, खरा इतिहास आज जाणून घ्या!

इतिहासात प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असते असे नाही. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या आपण आजवर आंधळेपाने खऱ्या मानत आलो. पण त्या खऱ्या आहेत का?


इतिहास ही अशी गोष्ट आहे जी जशी दिसते तशी आपण खरी मानतो. पण ही गोष्ट देखील नाकारता येत नाही की इतिहासासारखी बेभरवश्याची दुसरी गोष्ट नाही. ज्या प्रसंगाला वा इतिहासाला पुरावे उपलब्ध आहेत त्याची गोष्ट निराळी, जो इतिहास केवळ लिहून ठेवला आहे, त्याबाबतीत पुरावे नाहीत, वा पुरावे असून सुद्धा ते खरे मानले जात नाहीत. असा इतिहास फसवाच असतो. नक्कीच हे जे काही सांगितलं ते थोडंफार तुमच्या डोक्यावरून गेलं असेल. सांगायचं तात्पर्य हे आहे की इतिहासात प्रत्येक गोष्ट दिसते तशीच असते असे नाही. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या आपण आजवर आंधळेपाने खऱ्या मानत आलो. पण त्या खऱ्या आहेत का?

  • भारताचा राष्ट्रीय खेळ काय असे विचारल्यावर तुम्ही लगेच म्हणाल की, ‘हॉकी’! पण मंडळी हे सुद्धा खोटे आहे. हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा कधीच देण्यात आलेला नाही आणि हे आम्ही नाही तर खुद्द क्रीडा मंत्रालयाने मान्य केले आहे. २०१२ साली ऐश्वर्या पाराशर नावाच्या मुलीने पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकाराखाली याबाबत विचारणा केली. तेव्हा तिला क्रीडा मंत्रालयाकडून अशी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले गेले.
  • १९३४ मध्ये कर्नल रोबर्ट विल्सन याने एक छायाचित्र काढले होते. तेव्हा त्या छायाचित्राने खळबळ माजवली होती आणि आज सुद्धा ते छायाचित्र खरे मानले जाते. हे छायाचित्र होते नेसी नामक महाकाय प्राण्याचे, जो विदेशातील दंतकथांमध्ये आढळणारा एक राक्षस आहे. ह्या प्राण्याचे अस्तित्व शोधण्याचे आजवर अनेक प्रयत्न केले गेले पण सर्व प्रयत्न फोल ठरले. त्या छायाचित्राची सत्यता पडताळली तेव्हा लक्षात आले की ते एक सबमरीन रुपी खेळणे होते आणि तेथील एका स्थानिकाने गंमत म्हणून ते पाण्यात सोडले होते.
  • ग्रेट वॉल ऑफ चायना अर्थात चीनची भिंत ही जगातील सर्वात लांबीची मानवनिर्मित भिंत आहे हे जरी खरे असले तरी चीनच्या शाळांमध्ये खूप वर्षांपासून ही गोष्ट शिकवली जात आहे की ही भिंत अवकाशातून सुद्धा दिसते. तुम्हाला सुद्धा कधी ना कधी अशी फसवी माहिती मिळाली असेल. पण हे खरे नाही. नासाने स्वत: या गोष्टीला नकार दिला आहे. पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यावर चीनची भिंती इंचभर सुद्धा दिसत नाही हे नासाने कबूल केले आहे. त्यामुळे चीनचा हा दावा खोटा ठरतो.
Source : tosshub.com
  • “An eye for an eye only ends up making the whole world blind” हे प्रसिद्ध वाक्य तुमच्या देखील कानी पडलं असेल. या वाक्याचा अर्थ असा की कोणी तुमच्या डोळ्याला दुखापत केली आणि त्याचा बदला म्हणून तुम्ही सुद्धा तसेच केले तर हळूहळू पूर्ण जग आंधळे होईल. हे वाक्य महात्मा गांधींच्या नावे खपवले जाते. पण मंडळी गांधीजी असं कधी म्हणालेच नाहीत. गांधींच्या कोणत्याही पुस्तकामध्ये त्यांनी स्वत:हून हे वाक्य उच्चारल्याचे आढळत नाही. ना तसा कोणता ठोस पुरावा आजवर सापडला आहे.
  • भारताबाबत क्रीडाक्षेत्रामध्ये एक मोठे खोटे आजही प्रचलित आहे की १९५० साली भारतीय फुटबॉल टीमने फिफासाठी क्वालिफाय केले होते. पण खेळाडूंकडे पायात घालण्यासाठी बूट नसल्याने त्यांनी माघार घेतली. पण खरी गोष्ट ही आहे की तत्कालीन  ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन टीम सिलेक्शनने नाखुश होती. शिवाय तयारी साठी सुद्धा कमी वेळ दिला गेला होता. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या नजरेत तेव्हा फिफापेक्षा ऑलम्पिकला जास्त महत्त्व होते. म्हणून शेवटी फेडरेशननेच आपले नाव मागे घेतले.
  • भारतीय रेल्वे मध्ये जगात सर्वाधिक कर्मचारी काम करतात असे आपल्याला नेहमी सांगण्यात येते. पण ही गोष्ट खरी नाही. २०१५ साली करण्यात आलेल्या एका सर्वेमध्ये हे दिसून आले की कर्मचारी संख्येमध्ये भारतीय रेल्वे ८ व्या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त कर्मचारी अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.
  • आता आम्ही जे सांगणार आहोत ते वाचून तुम्हीच कपाळाला हात मारून घ्याल. आपण जे भारताचे राष्ट्रीय गीत गातो त्यात एक शब्द असा आहे जो आपण चुकीचा बोलतो. फार कमी लोकांना ही गोष्ट ठावूक आहे. पंजाब सिंध गुजरात मराठा ही ती लाईन असून, ही खरी लाईन पंजाब सिंधू गुजरात मराठा अशी आहे. जानेवारी १९५० सालीच सिंध हा शब्द बदलून सिंधू असा करण्यात आला आहे. कारण सिंध हा आता पाकिस्तानमधला प्रांत आहे. तर मग मंडळी यापुढे राष्ट्रगीत बोलताना योग्य पद्धतीनेच बोला.
  • संविधानाची निर्मिती झाली तेव्हा त्यात सेक्युलरीझम हा शब्द जोडण्यात आला आणि मग भारत सार्वभौम असल्याचे जाहीर करण्यात आले असा एक दावा केला जातो. पण हा दावा साफ खोटा आहे. संविधानात १९७६ पर्यंत कुठेच सेक्युलर हा शब्द नव्हता. १९७६ मध्ये करण्यात आलेल्या ४२ व्या घटना दुरुस्ती मध्ये सेक्ल्युर हा शब्द जोडण्यात आला आणि तेव्हा पहिल्यांदा अधिकृत नोंद झाली.
  • इजिप्तचे पिरामिड्स हे अगदी मोजक्या लोकांनी मिळून तयार केले असे म्हटले जाते. पण ही गोष्ट खरी नाही, ना याबाबत कोणता पुरावा सापडला आहे. जाणकारांनी तर ही अशक्य गोष्ट असल्याचे म्हटले आहे. केवळ आपली वाहवा व्हावी म्हणून ही खोटी नोंद केली असल्याचेही त्यांनी सांगितले. हे पिरामिड्स उभारण्यासाठी अगणित लोकांनी हातभार लावल्याचा अंदाज आहे.

तर मंडळी असा असतो इतिहास, त्यामुळे तुम्ही स्वत: तुमच्या मनातील खरी उत्तरे शोधा आणि खऱ्या इतिहासावरच विश्वास ठेवा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal