सर्वात मोठे हिंदू मंदिर असलेला, पण एकही हिंदू राहत नाही असा देश!

नागराजाच्या मायावी शक्तीमुळे येथे असणाऱ्या जंगली प्रदेशांचे रूपांतर एका सुशोभित राज्यात झाले.


कूठल्याही मंदिरात गेलं की आपल्याला प्रसन्न वाटतं आणि आपला देश तर मंदिरांचा देश आहे, कारण आपला देश घडलाच आहे हिंदू संस्कृतीमधून, त्यामुळे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतात खूप सुंदर सुंदर मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. पण इतकं असून देखील जगातील सगळ्यात मोठं हिंदू मंदिर मात्र भारतात नाही. अहो खरंच, ते आहे एका दुसऱ्याच देशात पण त्या देशात हिंदूच नाहीत ही आहे शोकांतिका!

Source : wikimedia.org

तर तो देश म्हणजे कंबोडिया होय आणि या कंबोडीया देशात आहे जगातील सगळ्यात मोठं हिंदू मंदिर! कंबोडीया देशामध्ये सुद्धा हे मंदिर एक ऐतिहासिक स्मारक आणि अमुल्य वारसा म्हणून जपलं गेलंय हे विशेष! या देशाच्या झेंड्यावर सुद्धा याच मंदिराची प्रतिमा पहायला मिळते.

या मंदिराचं नाव आहे ‘अंकोरवाट मंदिर’. हे मंदिर जगातलं सगळ्यात मोठं धार्मिक स्मारक सुद्धा मानलं जातं. कंबोडिया देशात अंकोर सिमरीप नावाचे एक शहर आहे. ह्या शहरात मिकांग नावाची नदी आहे. याच नदीच्या किनाऱ्यावर हे भव्यदिव्य मंदिर बनवलेलं आहे. हे मंदिर विष्णू देवाला समर्पित आहे. इथे सर्वात आधी भगवान शंकराची खूप मोठी मोठी देऊळे स्थापन करण्यात आली आणि मग शेवटी हे सगळ्यात मोठं देऊळ भगवान विष्णूच्या आराधनेसाठी बनवले गेले.

अंकोर शहराचं पूर्वीच नाव यशोधपूर होतं. सन् १११२-११५६ या काळात हे भव्य दिव्य मंदिर निर्माण करण्यात आलं. तेव्हा राजा सूर्यवर्मन द्वितीय हा तिकडे राज्य करत असे. अख्या जगातील सगळ्यात प्रसिद्ध पर्यटन क्षेत्रांपैकी एक म्हणून अंगकोर वाट मंदिराचा बोलबाला आहे. युनेस्कोने सुद्धा जागतिक वारसा म्हणून हे स्थळ घोषित केले आहे. ही तर झाली मंदिराची माहिती पण तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल की कंबोडिया देशात जगातील सगळ्यात मोठं हिंदू मंदिर आहे, पण मग हिंदू धर्मीय तिथे का नाहीत?

ऐतिहासिक नोंदीनुसार इथे जे पूर्वी हिंदू धर्मीय राहत होते त्यांचे धर्म परिवर्तन झाले. त्यामुळेच हिंदू संस्कृतीची पाळेमुळे ज्या देशात रुजली त्या देशात दुर्दैवाने एकही हिंदू आढळत नाही.

दक्षिण पूर्व आशियामधील महत्त्वाचा देश म्हणजे कंबोडिया आणि ह्या देशाची लोकसंख्या साधारणपणे १.७ कोटी एवढी आहे. येथे करण्यात आलेल्या अनेक संशोधनांमधून हिंदू संस्कृतीच्या खुणा दिसून आल्या आहेत. शिवाय अनेक ग्रंथांमध्ये, प्राचीन नोंदींमध्ये सुद्धा कंबोडिया देशात हिंदू राजा राज्य करत होते हे सिद्ध झाले आहे. प्राचीन वैभवशाली संस्कृतीची झलक कंबोडियामधील अनेक मंदिरांमध्ये दिसून येते.

कंबोडिया या देश रहस्यांनी भरलेला देश सुद्धा आहे त्यामुळे इतिहास प्रेमींनी इथे मोठ्या प्रमाणावर संशोधन केले आणि त्या संशोधनातून हे सिद्ध झाले की कंबोडिया हे राष्ट्र देश एक हिंदू राष्ट्र होते. या राष्ट्राचे पहिले संस्कृत नाव कंबुज किंवा कंबोज असं होतं. राजा कंबू यांनी आपल्या या राज्याला हे नाव दिलं होतं. भगवान शंकरांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांनी दृष्टांत दिल्याने राजा कंबू या देशात आले असे सांगितले जाते. महादेवांच्या आशीर्वादानेच कंबू राजाने हे राष्ट्र स्थापित केले.

या मागची आख्यायिका अशी की जेव्हा राजा कंबू या नगरीत आले तेव्हा येथील नागराजाशी त्यांची भेट झाली. नागराजाच्या मायावी शक्तीमुळे येथे असणाऱ्या जंगली प्रदेशांचे रूपांतर एका सुशोभित राज्यात झाले. संपूर्ण राष्ट्र हे हिरव्यागार अशा सुंदर वनात रूपांतरित झाले. नंतर कंबू राजाने नागराजाच्याच कन्येशी लग्न केले आणि आपले राज्य स्थापित केले.

मात्र ह्या सुंदर राष्ट्रावर बाहेरील शत्रूशी नजर पडली आणि त्यांनी या सोन्यासारख्या स्वर्गाची नासधूस केली. प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. पुढे अजून एक महत्त्वकांक्षी राजांनी या राष्ट्रावर राज्य केले. अखेर १३ व्या शतकात कंबोडिया मध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला व तेव्हापासून शांतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बहुतांश जनतेने बुद्धाचा मार्ग स्वीकारला.

हळूहळू तिथे जी हिंदू मंदिरे होती तेथे सुद्धा बुद्धांच्या शिकवणीनुसार उपासना सुरु झाली आणि बौद्ध धर्म अजून वाढला. म्हणूनच या देशात जरी जगातील सर्वात मोठे हिंदु मंदिर असले तरी हिंदू नगण्य आहेत.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *