साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये अल्लू अर्जुन याला कोण ओळखत नाही? त्याचं नाव सुपरस्टार्स मध्ये गणलं जातं. त्याचे लुक्स आणि त्याचा नृत्य आविष्कार ह्यामुळे त्याच्या फॅन्स मध्ये तो अत्यंत लोकप्रिय झालेला आहे. २०२१ मध्ये अत्यंत लोकप्रिय ठरलेला त्याचा चित्रपट ‘पुष्पा: द राईज’ पासून तर त्याची लोकप्रियता आता जगभरात उंचावली आहे.

ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वर तब्बल ३८८ कोटी रुपयांचा धंदा करून दिला. अल्लू अर्जुनचा जन्म ८ एप्रिल १९८३ साली झाला. त्याचा आईकडचा काका म्हणजे अजून एक सुपरस्टार ‘चिरंजीवी’ होय. वयाच्या तिसऱ्या वर्षीच अल्लू अर्जुनने त्याच्या काकांच्या म्हणजेच चिरंजीवीच्या ‘विजेता’ चित्रपटात काम केले. विजेता हा त्याचा सगळ्यात पहिला चित्रपट होता आणि ह्या चित्रपटाने त्याला अभिनयाची गोडी लावली.
अल्लू अर्जुन चे वडील फिल्म प्रोडूसर अल्लू अरविंद आहेत तर त्याच्या आईचे नाव निर्मला आहे. २०१३ सालच्या गंगोत्री हा चित्रपटामधून अल्लू अर्जुनने टॉलिवूडमध्ये आपले पदार्पण केले. अल्लू अर्जुन हा एक उत्तम डान्सर सुद्धा आहे. खास त्याच्या डान्सचा एक वेगळा चाहतावर्ग आहे बरं का! चला तर मग बघुया की अल्लू अर्जुन त्याच्या फॅन्समध्ये एवढा फेमस का आहे?
अल्लू अर्जुनची स्टाईल आणि त्याचा स्क्रीन प्रेसेन्स याला टक्कर देणारा स्टार कोणीच नाही असे म्हणतात. अल्लू अर्जुनचा एखादा चित्रपट सांग असा प्रश्न जरी तुम्ही कोणाला विचारला तरी पहिलं नाव येतं आर्या! या आर्या चित्रपटात त्याने जे काही पात्र पकडलंय आणि असा काही तो स्क्रीन वर वावरलाय की क्षणात आपण त्याचे चाहते होऊन जातो. याच आर्या चित्रपटासाठी त्याला तेलुगु फिल्म इंडस्ट्री मधला अत्यंत मानाचा असा नंदी अवॉर्ड सुद्धा मिळाला. पुढे त्याच वर्षी त्याला आर्यासाठी फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाले.

त्याचा हाच चार्म त्याच्या इतर चित्रपटात सुद्धा हमखास दिसून येतो आणि म्हणूनच स्टायलिश स्टार म्हणून तो नावारूपाला आला. हेच कारण आहे की अनेक फिल्म प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्स अल्लूच्या डेट्स साठी अडून बसतात. अल्लू खूप जास्त फेमस आहे याचे अजून एक कारण म्हणजे त्याची रियल लाईफ मधली सुद्धा स्टाईल!
अल्लूला कॉपी करणारा, त्याच्या स्टाईल वर फिदा असणारा एक खास चाहतावर्ग आहे. यात तरुणींची सुद्धा कमी नाही बरं का! साउथ मधला स्टाईल आयकॉन म्हणजे अल्लू अर्जुन असे एके जणू समीकरणच आहे.
हिरो म्हणून प्रेक्षकांना अल्लूच का आवडतो याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे त्याचा डान्स! साउथ इंडस्ट्रीमध्ये जेवढे स्टार मोठे झाले आहेत ते त्यांच्या डान्समुळेच! शरीर असं काही गदागदा आणि वाकडं तिकडं हलवायचं की टाळ्या आणि शिट्ट्या पडल्याच पाहिजेत. पण हो अशा डान्स मध्ये एक तालबद्धता सुद्धा असते. अल्लू या डान्स मध्ये माहीर आहे. युट्युबला त्याच्या गाण्यांनाच सर्वाधिक हिट्स आहेत आणि हीच तो सगळ्यांचा सर्वात आवडता डान्सर असल्याची साक्ष आहे.
हे तर झालं त्याच्या चित्रपटाबद्दल, पण तो टॉलिवूडमध्ये एक फॅमिली मॅन म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. त्याचे कधीच कोणते अफेअर समोर आले नाही. त्याने आपली गर्लफ्रेंड स्नेहा रेड्डीशी लग्न केले आणि तिच्याशी तो सुखाने संसार करतो आहे. शिवाय प्रत्येक स्त्रीशी, तरुणीशी तो नेहमी आदराने वागतो. स्टार जेवढा पडद्यावरून आपल्या चाहत्यांना इन्फ्लुयन्स करतो तेवढाच तो खऱ्या आयुष्यातून सुद्धा करू शकतो ही गोष्ट अल्लू अर्जुन कडे पाहून कळते.

अल्लूचा नुकताच रिलीज झालेल्या ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने काय धुमाकूळ घातला आहे हे तुम्ही सुद्धा जाणताच! गेल्या काही वर्षात अल्लूचे जेवढे चित्रपट आले ते बहुतांश प्रेम, कुटुंब अशा कथांभोवती फिरणारे होते. पण त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती त्याच्या मेगा एक्शनपटाची आणि ती इच्छा पूर्ण केली ‘पुष्पा: द राईज’ ह्या चित्रपटाने! यामध्ये अल्लूने जी काही एक्शन केली आहे त्यातून पुन्हा एकदा जुना अल्लू अर्जुन परत आल्याचे दिसले. मंडळी हेच आहे अल्लू अर्जुन सर्वात प्रसिद्ध असण्याचे शेवटचे कारण! त्याच्या एक्शनला अजिबात तोड नाही. तो वन टेक देतो आणि एक्शन करताना त्याला पाहणे हा दिल खुश करणारा अनुभव असल्याचे त्याचे चाहते म्हणतात.
‘पुष्पा: द राईज’ च्या निमित्ताने अल्लू आता फक्त साउथचाच नाही तर अख्ख्या भारतातील सर्वात फेमस हिरो झाला आहे यात शंकाच नाही!
0 Comments