KGF 2 मागची खरी कहाणी; कोण आहे ‘रावडी थंगम’ ज्याचं पात्र साकारतोय मेगा स्टार यश!

थंगमचं त्याच्या आई पॉलीवर जीवापाड प्रेम होता, तो तिला त्याचं प्रेरणास्रोत मानायचा, याच कारणाने त्याने त्याच्या गॅंगचं नाव सुद्धा पॉलीगॅंग असं ठेवलं होतं.


मित्रांनो, IPL ची मज्जा घेताय ना? बरं मी काय म्हणतेय थोडी excitement शिल्लक ठेवा हा कारण आमच्याकडे एक खुशखबर आहे. हो, आणि ते ही खास करून आपल्या सिनेमावेड्या प्रेक्षकांसाठी! २०१९ मध्ये सर्वांना वेडं करणारी साऊथची ब्लॉकबस्टर फिल्म KGF याचे दुसरे पर्व पुढच्या महिन्यात रिलीज होणार आहे. Yes guys, पहिल्या पर्वातले सारे रहस्य या भागात उलगडतील अशी आम्हाला तरी अपेक्षा आहे, बाकी तुम्हाला काय वाटतं?

तसं तुम्हाला तर माहीतचं आहे आपण सिनेमावेडी मंडळी आधीच आपले डिटेक्टिव्ह गॉगल्स घालत फिल्म रिलिज व्हायच्या आधीच ट्रेलर बघून त्याची स्टोरी शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कसं …फिल्म बघण्यात आणखीन मज्जा येते ना राव! बरं आम्हीही त्यात मागे नाही हा! आम्हीही आमच्या परीने काही गोष्टी शोधून काढायचा प्रयत्न केला आहे, मग तुम्हालाही त्या पटतात की नाही हे आम्हाला नक्की कळवा.

Kgf चा दुसरा पर्व आता रिलीज होण्याच्या मार्गावर आला आहे पण एक गोष्ट मात्र confuse करण्यासारखी आहे ती म्हणजे ही नवीन कथा, हा नवीन पर्व नक्की कुणावर आणि कशावर आधारित आहे? डायरेक्टर ने फुल्ल गेम केला आहे ना राव. पण आपणही काही मागे हटलो नाही पुन्हा डिटेक्टिव्ह गॉगल्सच्या आधारे हे ही आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बरं मित्रांनो फिल्म चं पोस्टर पहिलं की हे आपल्याला कळतं की ही कथा सत्य घटनेवर आधारित आहे पण नक्की कोणाच्या? हे कळण्यात मार्ग नाही. बरं एक secret सांगू का तुम्हाला? बघा हा कुणाला सांगू नका! मला असं कळलंय की ही कथा रावडी थंगम नावाच्या व्यक्तीवर आधारित आहे.

पण हा व्यक्ती नेमका आहे तरी कोण आणि त्याच्या कहाणीत इतकं काय खास आहे? आहे मित्रांनो…. नक्कीच आहे! कारण हा रावडी थंगम हा कुणी साधासुधा माणूस नाही तर ९०च्या दशकातला साऊथ मधला अत्यंत चर्चेत असलेला गुंड आहे. फुल डॅशिंग personality ना राव!

बरं इतकं शोधून काढल्यानंतरही या फिल्मचे डायरेक्टर हे मंजूर करायला तयार नाही की ही कथा याच व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. मग ही बातमी किती खरी आहे?

आम्हाला नुकतेच हे कळाले आहे की थंगम यांची आई पॉली यांनी कोर्टात ही याचिका दाखल केली आहे की या पिक्चरचे रिलीज होल्डवर ठेवावे कारण तिच्या मते KGF पिक्चरच्या पहिल्या भागात तिच्या मुलाची कहाणी ही negative भूमिकेत दाखण्यात आली.

इतकंच नाही, याहून ही interesting बाब म्हणजे या आधीही थंगमच्या जीवनावर आधारित एक फिल्म बनवली गेलेली होती त्याचं नाव कोलारा असे आहे. ही फिल्म बनवणाऱ्यांनीही डायरेक्टर नील यांना विनंती केली होती की थंगमच्या जीवनावर त्यांनी कुठली फिल्म बनवू नये कारण त्या स्टोरी वरचे सर्व अधिकार त्यांच्याकडे आहेत. बरं ही भानगड खूप मोठी आहे पण anyways KGF फिल्म आणि थंगमचं आयुष्य या कहाणी मध्ये काही साम्य हमखास दिसून येतात, तुम्हलाही त्या आढळतात का?

  • थंगमचं त्याच्या आई पॉलीवर जीवापाड प्रेम होता, तो तिला त्याचं प्रेरणास्रोत मानायचा, याच कारणाने त्याने त्याच्या गॅंगचं नाव सुद्धा पॉलीगॅंग असं ठेवलं होतं.
  • तसं पाहायला गेलं तर लूटमार- चोऱ्या या सहसा रात्री काळकुट्ट अंधारात केल्या जातात पण थंगमची गॅंग ही इतकी साहसी होती की ते दिवसाढवळा सोनारांच्या दुकानावर छापे टाकायचे.
  • थंगमचे बालपणातले दिवस हे खूप हालकीचे होते, त्याने फार गरिबीत आपले दिवस काढले याची जाणीव त्याला वारंवार व्हायची. Kgf मध्ये राहणाऱ्या खाण कामगारांचे हाल त्याला बघवायचे नाही करण ही लोकं खूप कठीण परिस्थितीत आपले दिवस काढायचे, खूप कमी पैश्यांमध्ये दिवसभर उन्हात काम करायचे. थंगम त्यांना नेहमी मदत करायला पुढे असायचा, त्याने लुटलेल्या पैश्यांमधला काही वाटा तो या कामगारांना द्यायचा.
  • साऊथ मधला सर्वात मोठा डॉन वेरप्पम या नंतर जर कोणाचं नाव असलं तर ते थंगमचेचं. त्याच्या मृत्यू आधीही त्याच्याविरोधात ४०हुन अधिक खटले त्याच्या विरोधात दाखल होते.
  • त्याच्या मृत्यूच्या आदल्याच दिवशी त्याने तब्बल दिड लाख रुपयांचा छापा एका सोन्याच्या दुकानात टाकला, ती चोरी इतकी मोठी होती की तिने आख्या पोलीस दलाला शरमेने मान खाली करायला लावली.
  • थंगम फक्त २५ वर्षांचा होता जेव्हा त्याचं encounter पोलिसांने २७ डिसेंबर १९९७ रोजी केलं. त्याचदिवशी त्याच्यासोबत त्याच्या ३ भावंडांचा सुद्धा त्या encounter मध्ये मृत्यू झाला.
  • Kgf च्या पहिल्या फिल्म मध्ये दाखवण्यात आलेल्या मात्र दोन घटना या सत्य घटनांपेक्षा विपरीत आहेत एक म्हणजे फिल्म मध्ये असे दाखवण्यात आले होते की त्याची आई पॉली ही मृत पावली पण सत्य परीस्थित त्या अजूनही जिवंत आहे. दुसरं म्हणजे थंगम एकटा काम करायचा पण खरं तर तो एका गॅंग चा सदस्य होता.

मग काय म्हणता? आहे ही नाही ही स्टोरी interesting? आणि KGF Part 2 बघायला जाणार ना मग? जात आसल तर एकत्र जाऊ ना राव!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *