गंगाजल हे हिंदू संस्कृती मध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. कोणत्याही शुभकार्यामध्ये गंगाजलाचा वापर केल्याने ते कार्य मंगलरित्या संपन्न होते असे म्हणतात. पण गंगाजलाला इतके महत्त्व का आहे? तर गंगाजल हे अत्यंत शुद्ध मानले जाते. गंगाजल मध्ये एका टक्केही अशुद्धी नसते आणि या पाण्यात कधीच किडे पडत नाही असे म्हणतात. पण असे का असा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का? इतर कोणत्याही नदीपेक्षा गंगा नदीचे पाणी इतके शुद्ध कसे? आज याच प्रश्नाचा मागोवा आपण घेऊया.
ह्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याआधी तुम्हाला गंगा नदीच्या उगमाबद्दल माहित असणे गरजेचे आहे कारण त्यातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे.
गंगा नदीचा उगम कुठे होतो? हा प्रश्न विचारल्यावर अनेकांचे उत्तर असेल की उत्तराखंड मधील गंगोत्री येथून, पण मंडळी हे पूर्ण सत्य नाही असे म्हटले तर?
हो, एक अर्धसत्य आहे. मुळात गंगा नदी उगम पावत नाही ती अनेक नद्यांचा संगम एकत्र होऊन उत्तराखंड मधील देवप्रयाग येथून व्हायला सुरुवात करते.
देवप्रयाग येथे गंगोत्री येथून उगम पावणारी भागीरथी नदी आणि बद्रीनाथ जवळून वाहत येणारी अलकनंदा नदी यांचा संगम होतो. येथे या नद्यांचा संगम होतो म्हणून या जागेला देवप्रयाग म्हणतात आणि इथून एकच नदी पुढे वाहत जाते. ज्या नदीला पुढील सर्व प्रदेशांत गंगा असे संबोधतात.
पण भारतीय शास्त्रानुसार आणि उत्तराखंड मधील लोकांच्या मान्यतेनुसार भागीरथी नदीच गंगेचा उगम आहे आणि म्हणून हिंदू धर्मीय गंगोत्रीला अवश्य भेट देतात.
उत्तराखंडच्या ज्या ज्या भागातून गंगा नदीला देवप्रयाग येथे येऊन मिळणाऱ्या जेवढ्या नद्या निघतात त्या त्या भागत मानवी वस्ती अत्यंत विरळ आहे. हे सर्व भाग उत्तराखंड मधील दुर्गम भाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे या पाण्यात प्रदूषण अजिबात नसते. हे सर्व पाणी नितळ आणि स्वच्छ असते. शिवाय ही नदी ज्या भागातून वाहते तेथील काही विशिष्ट खडकांमुळे या पाण्याची एक जैविक संरचना तयार होते. या संरचनेमुळे या पाण्यात विषाणू अजिबात तग धरत नाहीत. हे पाणी त्या विषाणूंसाठी अजिबात पूरक नसते.
आता तुम्ही विचाराल की गंगेच्या पाण्यात विषाणूच नसतात का? तर असतात पण त्यांना गुड बॅक्टेरिया म्हणतात जे शरीरासाठी चांगले समजले जातात. हे विषाणू घातक विषाणूंची वाढ होऊ देत नाहीत. म्हणूनच गंगाजल वा गंगेचे पाणी हे खराब होत नाही. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार या पाण्यात गंधक, सल्फर आणि खनिज पदार्थांची मात्रा मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे सुद्धा गंगाजल हे लवकर खराब होत नाही.
पण हे शुद्ध पाणी केवळ देवप्रयाग आणि पुढील प्रदेशांपर्यंतच असते. जस जशी गंगा मानवी वस्तीत शिरते तस तसे तिच्यावर प्रदुषणाचे अत्याचार होत जातात आणि अत्यंत शुद्ध असलेली गंगा अशुद्ध म्हणून ओळखली जाते.
0 Comments