मित्रांनो आपल्या सर्वांना माहीतचं आहे हल्लीचा जमाना हा सोशल मीडिया चा आहे. मग तो एखादा ट्रेंड असो किव्हा एका सामान्य व्यक्ती ला रातोरात फेमस करणं . बरं पण सोश मीडिया इथवरच मर्यादित नाही हा मित्रांनो ! इथे जितक्या पॉसिटीव्ह गोष्टी घडतात तितकीच नेगेटिव्ह गोष्टी ही घडतात. विशेषतः बोलायचं गेलं तर अफवा. सोशल मीडिया वर reels ज्या वेगाने पसरतात तितकेच अफवा ही. बरं या अफवा फक्त बॉलीवूड विश्वपर्यंतचं मर्यादित नाही हा! आणि या ज्या अफवा सोशल मीडिया मार्फत पसरवल्या जातात त्या काहींसाठी उपयुक्त तर काहींसाठी फार तोट्याच्या ठरतात. या सर्वातून सावरणं, लोकांना समजावणं आणि पुन्हा त्यांचा विश्वास जिंकून घेणं फार कठीण होऊन बसतं.
काही दिवसांपूर्वी नुकताच अश्याच एका परिस्थितीतून भारतातल्या एका मोठ्या ब्रँड ला सामोरे जावे लागले. एक असा ब्रँड जो वर्षानुवर्ष भारतीयांच्या जिभेचे चोचले पुरवत आलेला आहे आणि तो ब्रँड म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता ‘हल्दीराम’. नक्की कुठल्या सोशल संकटातून सामोरे जावे लागले हल्दीरामला हे जाणून घेऊ!
काही दिवसांपूर्वी हल्दीराम ब्रँड ला टार्गेट करत सोशल मीडिया वर एक धमाकेदार चर्चा रंगली. हल्दीरामच्या प्रॉडक्ट्स डिस्क्रिप्शन मध्ये काहीजणांना उर्दू- अरबी भाषा दिसून आली आणि हे दिसताच खाद्यप्रेमींमध्ये एक वेगळाच संताप दिसून आला.
पण या चर्चेची सुरुवात झाली ती मात्र एका TV चॅनेल पासून. त्यांनी हल्दीरामच्या ‘फलाहार मिश्रण’ च्या पॅकेट वर उर्दू भाषेत लिहिलेलं डिस्क्रिप्शन पाहिलं आणि त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. भारतीय ब्रँड असून पॅकेजिंग मध्ये उर्दू भाषेचा वापर का? असं त्यांनी विचारलं.
या सर्व प्रसंगानंतर ट्विटरवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. खरंतर सत्य हे होते की वर्णन उर्दूमध्ये लिहिलेले नव्हते, तर अरबीमध्ये. पण बहुतांश लोकांच्या मनात प्रश्न असा पडला कि, जेव्हा वर्णन हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिले जात असेल, तेव्हा पुन्हा तिसऱ्या भाषेची गरज काय! तेही अरबी भाषेत?
पण केवळ हल्दीरामच नाही तर अनेक ब्रँडस त्यांच्या उत्पादनांवर अरबी भाषा वापरतात पण असे का? हल्दीराम तर्फे सुद्धा असे का केले जाते?
हल्दीराम हा प्रसिद्ध भारतीय ब्रँड आहे, परंतु तो आंतरराष्ट्रीय स्तरावरही आहे. आखाती देशांमध्ये त्याची मोठी बाजारपेठ आहे. आखाती देश म्हणजे अरब देश. यामध्ये बहरीन, इराक, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचा समावेश आहे.
आता ही कंपनी जेव्हा आपली उत्पादने अरबी लोकांना विकते तेव्हा तिला स्थानिक भाषेची काळजी घ्यावी लागते, जेणेकरून ज्यांना हिंदी-इंग्रजी येत नाही त्यांनाही उत्पादनाबद्दल वाचता येईल. इतर भारतीय ब्रँडही असेच करतात.
मध्यपूर्वेमध्ये आपली उत्पादने विकणाऱ्या इतर ब्रँड्समध्ये प्रिगोल्ड, पार्ले, एलनसन, अमीरा, बॉन, क्रेमिका, ड्यूक्स, इंडिया गेट, पार्ले, प्रिगोल्ड, एमटीआर, मदर्स रेसिपी, रामदेव आणि रसना यांचा समावेश आहे. बहुतेक ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांवर अनेक भाषा वापरतात. जेणेकरून उत्पादन मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचवता येईल.
भारतीय दूतावासाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, UAE हे भारताचे दुसरे सर्वात मोठे Export Destinationआहे, ज्याचा व्यापार अंदाजे US$ 41.43 अब्ज इतका आहे आणि यात तेलाचा समावेश नाही बरं का!
याशिवाय, भारताच्या आखाती देशात अन्नधान्य, साखर, फळे आणि भाज्या, चहा, मांस आणि समुद्री खाद्य यांचा समावेश होतो. पोशाख, प्राचीन वस्तू, कलाकृती, विद्युत उपकरणे, सौंदर्य उत्पादने, तृणधान्ये, शूज, घड्याळे आणि रत्ने या भारतीय उत्पादनांना UAE मध्ये जास्त मागणी आहे. शेवटी आपल्या प्रॉडक्ट पॅकजिंग वर वेगवेगळ्या भाषेत डिस्क्रिपशन लिहिणं हे हि एक business स्ट्रॅटेजीचं मित्रांनो.
मग आता समजलं की मित्रांनो, packaging मध्ये जितक्या भाषा तितके ग्राहक आणि तितकीच कमाई. आम्ही अशा करतो कि तुम्हाला आजचं हे interesting माहितीपूर्वक आर्टिकल आवडलं असेल. असे आणखीन बरेच facts आणि मजेशीर गोष्टी जाणून घेण्यासाठी stay tuned!
0 Comments