आपल्याला बरं वाटत नसलं की सगळं घर अगदी चिंता करायला लागतं. सहाजिकच मग दुखण्यावरती आजीच्या बटव्यातील औषध घेतली जातात. पण जर का दुखणं कमी झालं नाही तर मात्र डॉक्टर शिवाय आपल्याला पर्याय उरत नाही. डॉक्टर सुरुवातीला काही गोळ्या औषध देऊन बघतात आणि त्यातून काहीही झालं नाही तर मात्र इंजेक्शन घ्यायची वेळ येते.
नुसतं इंजेक्शन म्हंटलं तरीसुद्धा आपल्याला कसतरी व्हायला लागतं आणि पहिली डोळ्यासमोर येते ती सुई! पण नाईलाज असतो आणि तोंड वाकडं करून आपण कसं बसं एकदा चे इंजेक्शन घेतो. पण तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की डॉक्टर कधीकधी इंजेक्शन हातावर देतात तर कधीतरी हेच इंजेक्शन आपल्याला कमरेवर घ्यावं लागतं.
याचं कारण म्हणजे इंजेक्शनच्या वेगवेगळ्या प्रकारांप्रमाणे इंजेक्शन शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी टोचून शरीरभर पोहोचवलं जातं.
इंजेक्शन मधून औषध दिलं जातं ते शरीरात कुठे जाताय यावरून कुठला आजार झाला आहे ते ओळखायला मदत होते. म्हणजेच आजाराचे जसे प्रकार तसेच इंजेक्शन देण्याची वेगवेगळी पद्धत. आपल्याला डॉक्टर कधीही घाईघाईत सुद्धा चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन देत नाहीत. म्हणून आपण सुद्धा हे जाणून घेणे गरजेचे आहे की वेगवेगळ्या ठिकाणी इंजेक्शन्स का घेतली जातात.
चला तर आधी इंजेक्शनचे वेगवेगळे प्रकार जाणून घेऊयात. इंजेक्शनचे चार प्रकार असतात. इंट्रा वेनस (Intravenous), इंट्रामस्क्युलर (Intramuscular), सबक्यूटेनियस (Sub- cutaneous) आणि इंट्राडरमल (Intradermal).
इंट्रावेनस इंजेक्शन हे हातावरती दिलं जातं. इंट्रावेनस इंजेक्शन थेट रक्तात मिसळून जातं आणि शरीरात सगळीकडे पसरतं. टिटॅनस किंवा अगदी आत्ताचे इंजेक्शन म्हणजेच कोवीडवरचे इंजेक्शन दंडावरती दिले जाते.
इंट्रामस्क्युलर (Intramuscular) इंजेक्शन हे स्नायूंमध्ये दिलं जातं. स्नायूंमध्ये रक्तपेशी कमी असतात आणि म्हणूनच इंजेक्शन दिलेलं अख्ख्या शरीरात पटकन पसरतं. इंट्रा मस्क्युलर इंजेक्शन साधारणतः कुल्ल्यावर आणि जांघेत घेतात. या इंजेक्शन मध्ये मोडणारे इंजेक्शन म्हणजेच स्टिरॉइड्स आणि अँटिबायोटिक्स इंजेक्शन असतात.
सबक्यूटेनियस इंजेक्शन ( Sub-Cutaneous) हे इंट्रा मस्क्युलर इंजेक्शन पेक्षा वेगळं असतं. हे इंजेक्शन बरोबर त्वचेच्या खाली आणि फॅटी टिशूच्यावरती दिलं जातं. ह्या इंजेक्शन साठी मुद्दामून छोटी सुई वापरली जाते जेणेकरून ती आतपर्यंत रुतू नये. या इंजेक्शनद्वारे इन्सुलिन दिलं जातं किंवा रक्त पातळ करण्यासाठी सुद्धा हे सबक्यूटेनियस इंजेक्शन दिलं जातं.
शेवटी येतो चौथा प्रकार इंट्राडर्मल इंजेक्शन. इंट्राडर्मल इंजेक्शन जेव्हा दिलं जातं तेव्हा त्वचेच्या खाली एक छोटासा ब्लब किंवा वील तयार होते. म्हणजेच एक छोटीशी गाठ तयार होते. अशा प्रकारचे इंजेक्शन हे टीबीमध्ये दिलं जातं. त्याच प्रमाणे एखादी ऍलर्जी असेल तर अशा प्रकारचे इंजेक्शन वापरल जातं. हे इंजेक्शन हातावर जिथे केस कमी असतात त्या भागावर दिलं जातं. त्याच प्रमाणे हाताच्या ज्या भागावर इंजेक्शन दिलं जातं तिथे कुठली इजा तर पोहोचली नाही ना याची शहानिशा केली जाते. कधीकधी अशा प्रकारचे इंजेक्शन मनगटाजवळही दिलं जातं.
बघा तुम्हाला तरी वाटलं होतं का एवढ्याश्या इंजेक्शन देण्याच्या कृतीमागे सुद्धा एवढं मोठं सायन्स आणि लॉजिक असेल ते, चला तर ही माहिती आपल्या मित्रमंडळींपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा!
0 Comments