आज-काल आपण जिथे बघू तिथे वेगवेगळ्या प्रकारची चिन्हे दिसतात; काही चिन्हे ही ठराविक कंपन्यांशी निगडित असतात. ह्या चिन्हांवरून आपण सहज ओळखू शकतो की कुठली कंपनी आहे. ह्याच चिन्हाला बोलीभाषेत लोगो असे म्हणतात. लोगो असा तयार केला जातो की त्याने कंपनीची ओळख पटकन होईल.
लोगो खूप मोठा नसतो. एक छोटासं चिन्ह कंपनी दर्शवते. लोगो मुळे आपण पटकन एखादी कंपनी ओळखू शकतो. लोगो मुळे आपल्याला कंपनी लक्षात ठेवायला मदत होते.
त्याचप्रमाणे त्या कंपनीशी असलेल्या आपल्या चांगल्या आठवणी लोगोमुळे पटकन उफाळून येतात, जे कदाचित नुसत्या कंपनीच्या नावाने होऊ शकत नाही. प्रत्येक लोगो हा दुसऱ्या लोगो पेक्षा वेगळा असतो. जशी कुठलीही दोन माणसं एक सारखी नसतात. लोगो हा प्रत्येक कंपनीचा चेहरा असतो त्यामुळे लोगो सगळ्यात चांगला असणे फार गरजेचे असते.
कुठल्याही कंपनीचा लोगो भरपूर काही सांगून जातो. ह्यामुळेच की काय कंपनीचे Founders जेव्हा लोगो तयार होत असतो तेव्हा खूप भावूक होतात कारण एकदा लोगो बनला की तो परत री डिझाईन करता येत नाही. खूप आंबट गोड आठवणी या कंपनीशी आणि लोगोशी जोडलेल्या असतात.
जर का नीट निरीक्षण केलं असेल तर तुम्हाला असं आढळलं असेल की बऱ्याचशा कंपन्यांचे लोगो हे निळ्या रंगात आहेत. याचं कारण माहिती आहे का? चला तर आज यामागचं कारण जाणून घेऊया.
निळा रंग हा विश्वास आणि सुरक्षिततेचा प्रतीक आहे. हा असा रंग आहे जो एखाद्याला अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त करतो. शिवाय निळा एक असा रंग आहे जो डोळ्यांना लगेच आकर्षित करतो पण त्रासदायक वाटत नाही. यामुळे पहिल्याच नजरेत त्या कंपनीबद्दल मनात विश्वास निर्माण करण्यास निळा रंग मदत करतो असे व्यवसाय क्षेत्रात मानले जाते.
हेच कारण आहे म्हणून अनेकदा बरेचसे लोगो निळ्या रंगात आपल्याला दिसून येतात. आपल्या देशातील काही मोठ्या आणि प्रसिद्ध कंपन्यांचे लोगो देखील निळ्याच रंगात आहेत. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे तो म्हणजे TATA चा लोगो. ह्या लोगोने नुसत्या देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा लोकांची मनं जिंकली आहेत. कुठेही TATA चा लोगो दिसला की लोक डोळे बंद करून या कंपनीवर विश्वास ठेवतात.
दुसरी कंपनी जी चा लोगो निळ्या रंगात आहे ती म्हणजे हिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड. ही एक ब्रिटिश मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी टूथपेस्ट पासून वॉटर प्युरिफायर पर्यंत सगळं काही मॅन्युफॅक्चर करते.
बँकांमध्ये तीन बँका अशा आहेत की ज्यांचा लोगो हा निळा आहे. पहिली म्हणजे येस बँक. ही बँक एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे जी एका कॉर्पोरेट हाऊस सारखी काम करते. या बँकेची स्थापना राणा कपूर यांनी २००४ मध्ये केली होती. स्टेट बँक ऑफ इंडिया बद्दल काय सांगायचं? ही बँक तर सगळ्यांनाच माहित आहे. ही नॅशनलाईज बँक आहे आणि देशातील सगळ्यात मोठी बँक आहे. राजधानी मुंबई येथे त्याचे मुख्यालय आहे. एच डी एफ सी बँक ही पण एक प्रायव्हेट सेक्टर बँक आहे आणि सर्वेनुसार देशातील अधिकतम सॅलरी अकाऊंट ह्या बँकेत आहेत.
पुढची कंपनी तिचा लोगो निळा आहे ती म्हणजे एच सी एल कंपनी. या कंपनीचं हेड क्वार्टर नोएडा उत्तर प्रदेश या राज्यात आहे. ही कंपनी आता कन्सल्टन्सी मध्ये सुद्धा उतरली आहे. बजाज कंपनीचा लोगो सुद्धा निळ्या रंगात आहे. बरोबर ओळखलंत ही बजाज कंपनी म्हणजेच हमारा बजाज हे गाणं वाजायचं तीच. बजाज कंपनी ही दुचाकी आणि तीन चाकी वाहनांचे उत्पादन करते. बजाज कंपनी ही १९४०या साली जमनालाल बजाज यांनी स्थापित केली.
आय टी कंपनी इन्फोसिस कोणाला माहिती नाही. इन्फोसिस आणि नारायण मूर्ती ही नावं नेहमी एकत्र घेतली जातात. ह्या कंपनीचा लोगो सुद्धा निळाच आहे. ही एक मोठी आयटी कंपनी असून तिचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. इन्फोसिसच कार्य आणि कामकाज खूप मोठं आहे.
तर ही होती निळा लोगो असलेली वेगवेगळ्या कंपन्यांची कहाणी. हे वाचून आपल्या मित्रमंडळींमध्ये नक्की शेअर करा.
0 Comments