जय भीम चित्रपटाने आपल्या मनात सामाजिक विषमतेबाबतचे अनेक प्रश्न उभे केले. पण सोबतच या चित्रपटातील पोलीस आणि वकील यांच्यातील द्वंद्व पाहून हा प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच आला असेल की खऱ्या आयुष्यात आणि कायद्यानुसार पोलीस जास्त पावरफुल असतात की वकील?
आता चित्रपटात तर अनेक ठिकाणी वकिलाचे पात्र निभावणारा सूर्याच पोलिसांवर वरचढ होताना दाखवला आहे. शिवाय एका प्रसंगात तर वकिलाला धक्काबुक्की केली म्हणून सूर्या आणि त्याचे वकील सहकारी आंदोलन करतानाचा सुद्धा प्रसंग आहे आणि त्यांचे हे आंदोलन पोलीस खात्याला महागात पडू शकते असे सुद्धा दाखवले आहे. चला आज आपण या लेखातून जाणकारांसोबत केलेल्या चर्चेतून मिळालेले खरे उत्तर जाणून घेऊया.
पोलीस अधिकारी म्हणजे तो व्यक्ती ज्याला कायद्याने समजतील कायदा व सुव्यवस्था संतुलित राखण्यासाठी काम करण्याचे अधिकार दिलेले असतात. पोलीस विविध कलमांच्या आधारावर कोणाचीही चौकशी करू शकतात, त्याच्यावर गुन्हा दाखल करू शकतात, संशयित म्हणून अटक करू शकतात. ही गोष्ट ते कोणत्याही व्यक्तीसोबत करू शकतात. मग तो व्यक्ती कितीही उच्च पदावर बसलेला का असेना. ही झाली पोलिसांची पॉवर!
वकील म्हणजे तो व्यक्ती ज्याने कायद्याचा अभ्यास केलेला असतो आणि त्याला कायद्यानुसार न्यायालयात कोणत्याही व्यक्तीची बाजू ठेवण्याचा वा त्या व्यक्ती विरुद्ध लढण्याचा अधिकार असतो. इथे वकील सुद्धा कोणत्याही व्यक्तीची केस लढू शकतो, त्याला त्याबाबतीत बंधन नाही. मुख्य म्हणजे वकिलाला कायद्याचे सखोल ज्ञान असते. त्यामुळे ही झाली वकिलांची पॉवर!
आता तुम्ही असा प्रश्न केला की एखादा सामान्य वकील पोलीस कमिशनरला आव्हान देऊ शकतो का? तर अर्थातच ते शक्य नाही. त्या प्रमाणेच एक साधा पोलीस कॉन्स्टेबल उच्च न्यायालयातील वकिलाशी पंगा घेऊ शकत नाही. जर आपण पोलीस आणि वकील यांच्यात पावरफुल कोण या प्रश्नाचे उत्तर शोधत असू तर आपल्याला एक पोलीस आणि एक वकील समान हुद्द्यावर आहेत हे समजून मागोवा घ्यावा लागेल.
आपण असं गृहीत धरूया की एक इन्स्पेक्टर आहे आणि एक उच्च न्यायालयातील वकील आहे तर यांच्यापैकी पावरफुल कोण? जर इन्स्पेक्टर बद्दल बोलाल तर इन्स्पेक्टर हा त्याच्या अधिकारक्षेत्रातील भागात नक्कीच पॉवारफुल असतो. त्या भागातील एखाद्या व्यक्तीला तुम्ही विचारलं की पोलीस आधी वकील यांच्यापैकी सगळ्यात शक्तिशाली तुम्हाला कोण वाटतं? तर तो व्यक्ती सुद्धा म्हणेल की पोलिसच जास्त शक्तिशाली आहे.
पण जेव्हा गोष्ट न्यायालयाची येते तेव्हा मात्र तिथे वकीलाचं राज्य असतं. शिवाय कायद्याचा सखोल अभ्यास त्यांनी केलेला असल्याने अनेक छुपे अधिकार आणि नियम हे वकिलांना तोंडपाठ असतात. वकील कधी एखादा कोणालाही माहित नसलेला कायदा आणि नियम बाहेर काढतील आणि वरचढ ठरतील याचा काही नेम नसतो. हेच कारण आहे की अनेक पोलीस वकिलाच्या वाट्याला जात नाहीत.
आपल्या उदाहरणातील इन्स्पेक्टर सुद्धा मुद्दाम वकिलाशी कधीच पंगा घेणार नाही. कारण पोलिसांना कायद्याचे जास्त ज्ञान नसते. कायद्याचा अभ्यास करणारे पोलीस अधिकारी फार कमी आढळतात. त्यामुळे तुम्हाला वकिलांसमोर पोलीस कधीच कायदा मोडून काम करताना दिसणार नाहीत.आता तुम्हाला बऱ्यापैकी चित्र स्पष्ट झाले असेल. वकील आणि पोलीस दोन्ही कायद्याचे मुख्य घटक आहेत. दोघांचे अधिकार आणि कर्तव्ये वेगवेगेळी आहेत. यामूळ दोघांपैकी कोण पॉवरफुल ते नेमकं आपण ठामपणे सांगू शकत नाहीत. जसे त्यांचे हुद्दे, तशी त्यांच्या हातातील शक्ती जास्त!
पण एक सामान्य नागरिक म्हणून आपण एवढीच अपेक्षा करू शकतो की पोलीस असो व अधिकारी त्यांनी आपल्या शक्तीचा योग्य वापर करून कायद्याचे रक्य अबाधित राखण्यासाठी झटणे महत्त्वाचे आहे.
0 Comments