असावे घरटे अपुले छान! अशी अनिवार इच्छा मनात बाळगून त्यासाठी घाम गाळणाऱ्या माझ्या दोस्तांनो विचार कसला करताय? आपलं स्वप्नातलं घर घ्यावं की नाही याचा? की आता घ्यावं की नंतर घ्यावं याचा? की स्वतःचं घर घ्यावं की भाड्याच्या घरी रहावं याचा? चिंता करू नका. मी इथे तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देणार आहे.
भाड्याने एखाद्या घरात राहायचं की आपलं स्वत:च घर घ्यायचं? या दोन्ही पर्यायांचे आपआपले फायदे तोटे आहेत. त्यामुळे ते जाणून घेऊनच योग्य तो निर्णय तुम्ही घ्यावा.
१. घर विकत घेतले की जवळपास २० ते ३० वर्षांसाठी एक ठराविक रक्कम घरासाठी खर्च होत असते. म्हणजे आपले निम्मे आयुष्य घेतलेले Home Loan फेडण्यातच जाते. अशावेळी आर्थिक शिस्त व प्रेरणा महत्त्वाची असते. याउलट, भाड्याने राहताना खर्च कमी होतो आणि तो लवचिकही असू शकतो, तुम्ही पाहिजे तेव्हा वास्तव्याचे ठिकाण बदलूही शकता. पण हो घर बदलताना होणारा त्रासही सहन करावा लागतो.
२. गेल्या वर्षभरात गृहकर्जावरील व्याजदर झपाट्याने घटला आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत, गृहकर्जावरील EMI २० वर्षांच्या कालावधीसह रू. १ लाख किमतीच्या कर्जासाठी दरमहा रु. १००० इतका होता. आता हे दर महिन्याला ७५० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. यामुळे स्वत:चे घर घेणे तुलनेने सुलभ झाले आहे.
३. घर खरेदी करताना आपल्याला Margin Money किंवा कर्जाचे डाउन पेमेंट करणेही आवश्यक असते. बहुतेक बँका घरासाठी कर्जदारांच्या Equity Contribution म्हणून २०% डाउन पेमेंट मागतात, तरीही काही कर्जदारांसाठी Margin Money ५ टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. डाउन पेमेंटची रक्कम जितकी जास्त तितका तुमचा EMI आउटगो कमी होईल. ५० लाखांच्या घरासाठी तुम्हाला सुमारे १० लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. म्हणजेच घर खरेदी करण्याचा निर्णय घेण्याच्या काही वर्षे आधी बचत करणे किंवा PF निधीसारखा आपला Retirement Fund खर्च करणे किंवा कुटुंबाची मदत घेणे किंवा या सर्वच गोष्टी जुळवून आणणे आवश्यक असते.
४. घरमालक म्हणून तुम्हाला देखभाल व Property Tax आणि अधूनमधून दुरुस्ती तसेच Renovation साठी पैसे खर्च करावे लागतील. देखभालीचा खर्च सामान्य सुविधा पुरविणाऱ्या गृहनिर्माण संस्थेकडून आकारला जातो, तर महापालिका संस्थांकडून Property Tax आकारला जातो. ही किंमत ३-४ टक्के वार्षिक दराने वाढू शकते. त्यामुळे वर्षांनुसार खर्च सुद्धा वाढत जाईल.
५. दुसरीकडे भाडेकरूला फक्त मासिक खर्चापुरते कमावून चालते व इतर सर्व काळजी आपल्या घरमालकावर सोडता येते. याशिवाय, बहुतांश शहरांमध्ये अपार्टमेंटसाठीचे भाडे अजूनही EMI पेक्षा खूपच कमी आहे. उदाहरणार्थ, सध्याच्या Home Loan च्या सुमारे ७ टक्के व्याजदरावर, रु. ५० लाख किंमतीच्या घरासाठी सुमारे रु. ३१,००० EMI म्हणून २० टक्के डाउन पेमेंट गृहीत धरावे लागेल. त्या तुलनेत, त्याच अपार्टमेंटचे महिन्याचे भाडे सुमारे १५,००० रुपये असू शकते. मात्र, कर्जाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात निश्चित केलेल्या EMI च्या उलटे, भाडे दरवर्षी ८-१० टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा असते.
६. भाडेकरू म्हणून, आपल्या Margin Money च्या संभाव्य डाउन पेमेंटची गुंतवणूक Equity Mutual Funds, FD किंवा PF यांसारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणे सुद्धा चांगला ऑप्शन आहे. Equity Mutual Funds मध्ये जर १० लाख रुपयांची सुरुवातीला गुंतवणूक तुम्ही केली तर २० वर्षांनी १० टक्के वार्षिक परतावा धरून सुमारे रू. ६१ लाख इतकी रक्कम तुम्हाला मिळू शकते. गेल्या पाच वर्षांत, Mutual Funds चा पर्याय सरस ठरला असून यात गुंतवणूक करणाऱ्यांना सरासरी ११ टक्के वार्षिक रिटर्न्स मिळाले आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करता घर खरेदी करण्यापेक्षा भाड्याने राहणे हे अधिक सुलभ, व्यवहार्य आणि श्रेयस्कर असते. तुम्हाला काय वाटतं?
0 Comments