भारतातील सिंधी म्हणजे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील लोकांचे वंशज होय. तिथून ते लोक इकड आले आणि स्थायिक झाले. १९४७ मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये विभाजन झाले तेव्हा लाखो सिंधींनी भारताची निवड केली. सिंधी लोकांना व्यापारात खूप महत्वाचे स्थान आहे. भारतात गुजराती, मारवाडी लोकही व्यापार करतात परंतु सिंधी लोकांचा व्यापारात कोणीही हात धरू शकत नाही.
सिंधी लोक त्यांच्या व्यापारातील सिक्रेट्स आणि व्यापार करण्याची पद्धत कोणालाच सांगत नाहीत. त्यांना त्यांच्या व्यापारातील गोष्टी गुप्त ठेवण्यातच समाधान वाटते. पाकिस्तानात आपले घरदार सोडून आलेले सिंधी पुढच्या २०-३० वर्षातच पुन्हा श्रीमंत झाले. आपण आजपर्यंत पाहिले आहे इतर व्यापाऱ्यांपेक्षा सिंधी लोक यशस्वी आणि मोठे व्यापारी असतात. ते कशाप्रकारे त्यांचे व्यवसाय सांभाळतात; पैसा आणि वेळेची कशी व्यवस्था करतात? तसेच, त्यांचे बिसनेस एवढे मोठे होण्यामागची कारणे जाणून घेऊया.

दुसऱ्यांची मदत नेहमी करा पण आपल्या व्यवसायातील गोष्टी (सिक्रेट्स) कोणालाही सांगू नये.
स्वतःच्या व्यवसायातील गोष्टी दुसऱ्यांना सांगून आपण आपल्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतो असे त्यांचे मत आहे. दुसऱ्यांची मदत जरूर करा पण त्यासाठी स्वतःच्या व्यवसायातील गोष्टी दुसऱ्यांना सांगू नका. कारण, जेव्हा तुम्ही असे करता तुम्ही स्वतःच तुमच्या व्यवसायासाठी दुसऱ्यांचे अडथळे निर्माण करत असता. त्यामुळेच, कोणताही सिंधी दुकानदार त्याच्या दुकानात असलेले सामान कोणाकडून आणतो अथवा विकत घेतो हे कधीही तुम्हाला सांगणार नाही.
धंद्यात मोठे नाही जास्त पैसा कमवायचा विचार करा. जेणेकरून तुमचा धंदा वाढेल आणि कमाईसुद्धा वाढेल.
जर एकाच ग्राहकाकडून जास्त पैसे कमवायचा विचार व्यापाऱ्याने केला तर हळू हळू त्या व्यापाऱ्याचे ग्राहक कमी होऊ लागतात. परंतु, तेच व्यापाऱ्याने कमी आणि परवडणाऱ्या दरात वस्तू विकल्या तर त्यामुळे ग्राहकही खुश होतात आणि पैसेही येतात. त्यासाठी असे म्हटले जाते की, ‘सिंधी लोक चाराण्यात (२५ पैसे) पण धंदा करू शकतात.’ फायदा कुठल्या मार्गाने होतो आहे ते बघू नका, फायदा होतो आहे यातच खुश रहा असेही सिंधी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

धंद्यात पैसा कमावण्यासाठी दुसरे मार्ग वापरले तरी चालतील पण ग्राहकांना फसवून काहीच करू नये.
ग्राहकाला धंद्यात देवासमान मान असतो. कधीही ग्राहकांना धोका देऊ नये कारण ग्राहकाला याबद्दल कळले तर त्याचे नुकसान देखील व्यापाऱ्यालाच भरावे लागते. ग्राहक नाराज झाले की समजायचे तुमच्या धंद्यात काहीतरी चुकीचे घडले आहे. ग्राहकांना नाराज करून तुम्ही तुमच्या धंद्यात कधीच प्रगती करू शकत नाही.
खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करा तुम्हाला उपाय मिळेलच.
व्यापारात स्वतःचा खर्च कसा वाचतो याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. व्यापारात फायद्यापेक्षा खर्चच जर जास्त झाला तर त्याचा काहीही उपयोग नाही. याउलट, व्यापारात नुकसानच मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.
व्यापार करतेवेळी आपली घमेंड कधीही मध्ये आणू नये.
व्यापाऱ्याने जर धंद्यामध्ये आपली घमेंड आणली तर तो व्यापारी कधीच यशस्वी होऊ शकत नाही. कारण, व्यापाऱ्याच्या घमेंडीमुळे नेहमी त्याची ग्राहकासोबत भांडणे होत राहणार आणि त्यामुळे धंद्यात नुकसान होण्याची शक्यता वाढते. यामुळे बरेचसे ग्राहक तुम्हाला सोडून जातील आणि नवीन ग्राहकदेखील जोडले जाणार नाहीत. त्यामुळे, कोणताही धंदा करताना घमेंड मध्ये नाही आली पाहिजे.

नेहमी व्यापारात स्वतःच्या कामाशी काम ठेवावे.
कोणताच सिंधी दुकानदार कधीच दुसऱ्या दुकानदारांची निंदा करताना आपल्याला दिसणार नाही. ते नेहमीच स्वतःच्या कामाशी काम ठेवतात. त्यामुळे, हे त्यांच्या धंद्यातील यशामागचे खूप मोठे कारण आहे. स्वतःचे लक्ष ग्राहकांना खुश करण्यावरच ठेवा.
या आणि अश्या काही तत्वांमुळे सिंधी व्यापारी इतर व्यापाऱ्यांपेक्षा धंद्यात यशस्वी असतात आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमावतात.
0 Comments