मशिदीवरचे भोंगे हा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. सध्या राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने हा मुद्दा उचलुन हे मशिदींवरचे भोंगे बंद करा नाहीतर परिणामांना सामोरे जा असा थेट इशाराच दिला आहे.
मुस्लीम धर्मात दिवसातून ५ वेळा नमाज पठन केले जाते आणि मुस्लीम म्हणून जन्माला येणाऱ्या प्रत्येकाने नमाज हा पढलाच पाहिजे असे इस्लाम सांगतो. त्यामुळे लोकांना याची आठवण करून देण्यासाठी मशिदिंवरून दिवसातून ५ वेळा अजान म्हटली जाते. याचा उद्देश आता नमाजाची वेळ झाली आहे हे सांगण्याचा असतो.
एक धार्मिक कारण म्हणून याला एक बाजू असली तरी या भोंग्यांचा आवाज खूप जास्त असतो त्यामुळे अन्य धर्मियांना त्रास होतो ही त्याची दुसरी बाजू! अर्थात काहींना तो होतो आणि काहींना होत नाही हा भाग वेगळा!
असो, पण मुख्य प्रश्न हा आहे की खरंच मशिदींवरचे भोंगे हटवता येतील का? अन्य कोणत्या देशांमध्ये या विषयी कायदे आहेत का? असा कोणता देश आहे का जिथे भोंगे लागून अजान म्हणण्यास बंदी आहे? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला सुद्धा पडले असतील.
तर मंडळी याचे उत्तर आहे. हो अनेक देशांमध्ये मशिदींवरच्या भोंग्यांबाबत नियम आहेत आणि इस्लामिक देशांमध्ये तर विशेष नियम आहेत. यापैकी एक इस्लामिक देश तर असा आहे जिथे चक्क लाउडस्पीकर वर अजान म्हणण्यालाच बंदी आहे. विश्वास बसत नाहीये? चला जाणून घेऊया.
हा देश म्हणजे सौदी अरेबिया होय. हो तोच देश जिथे इस्लाम सर्वाधिक कट्टरपणे पाळला जातो आणि तिथेच लाउडस्पीकर वा भोंगे लावून अजान म्हणण्यावर बंदी आहे. शरिया कायद्याच्या आधारेच सौदी अरेबियाने सर्व अरब राज्याने मशिदींमध्ये लाऊडस्पीकर वापरण्यास निर्बंध लादले आहेत.
शेख मुहम्मद बिन सालेह अल-उथैमीन आणि सालेह बिन फवझान अल-फवाझान यांच्या फतव्यानुसार अजान (नमाजासाठी येण्याचे आवाहन) आणि इकामत (जे दुसऱ्यांदा येण्याचे आवाहन आहे) याव्यतिरिक्त कुठल्याही हेतूंसाठी लाउडस्पीकर वापरू नये असे घोषित करण्यात आले आहे. मशिदींमधून सतत येणाऱ्या मोठ्या आवाजाचा त्रास अन्य नागरिकांना होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.
एवढेच नाही तर आवाज एका मर्यादीत क्षमतेपर्यंतच असावा असा सुद्धा नियम असून नियम मोडणाऱ्या मशिदींवर सौदी अबेरीया मध्ये दंडात्मक कारवाई केली जाते.
इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने असं नमूद केलं आहे की मशिदीत प्रार्थनेसाठी इमामचा आवाज केवळ संवाद साधण्यासाठी आत असलेल्या लोकांपुरता मर्यादित असावा. ते पुढे असेही म्हणतात कि, लाऊडस्पीकरचा वापर करून जेव्हा कोणी कुराणाचे मोठमोठ्याने पठण करतं आणि कोणी ते ऐकत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात तेव्हा त्या कुराणाचा अनादर होतो.
मंत्रालयाने लाऊडस्पीकरच्या वापराबद्दल चिंता व्यक्त करताना हे सुद्धा म्हटले की लाऊडस्पीकरमुळे झोपमोड होते खास करून लहान मुलांची आणि त्यामुळे पालकांच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येतात.
मुस्लिम-बहुल राष्ट्र असलेल्या सौदी अरेबियामध्ये मक्कामधील भव्य मशिदी आणि मदिना येथील पैगंबर मशिदीसह 98,800 हून अधिक मशिदी आहेत. तरी त्यांनी इतका पुरोगामी निर्णय घेतल्याने त्यांचे जगभर कातुक होत आहे.
सरकारी TV वर दाखविलेल्या व्हिडिओमध्ये बोलताना शेख म्हणाले की, ज्यांना प्रार्थना करायची आहे त्यांनी इमामच्या प्रार्थनेसाठी Loudspeaker वरच्या सूचनेच्या आवाजाची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांनी आधीच मशिदीत असावे. अर्थात या निर्णयाला विरोध सुद्धा मोठ्या प्रमाणावर झाला. पण तिकडे कायदाच सर्वश्रेष्ठ मानला जात असल्याने त्या विरोधाला महत्त्व उरले नाही आणि लाउडस्पीकरवर बंदी घातली गेली!
0 Comments