ग्राहकांना मूर्ख बनवणारे Brands, जे आहेत एकाच कंपनीचे, पण मार्केटिंग करतात वेगवेगळी!

तुम्हाला माहीत आहे का एकमेकांचे दुष्मन वाटणारे काही ब्रॅन्ड प्रोडक्ट खरतरं एकाच कंपनीचे दोन वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. चला तर मग पाहूया असे कोणकोणते ब्रॅन्ड ग्राहकांची दिशाभूल करतात.


सध्या ही दुनिया ब्रॅन्डची दुनिया आहे बॉस. आता तुम्हीच पहा सकाळी उठल्यानंतर वापरण्यात येणाऱ्या टुथपेस्ट पासून ते झोपताना वापरण्यात येणाऱ्या बेडशीटपर्यंत प्रत्येकाचा एखादा ब्रॅन्ड ठरलेला आहे. लोकांपर्यंत आपला ब्रॅन्ड पोहचावा म्हणून तर कंपन्यांमध्ये आपापसात युध्दच चालू असतं. त्यासाठीच तर भरमसाठ जाहिरातींचा भडीमार आपल्यावर होत असतो. पण तुम्हाला माहीत आहे का एकमेकांचे दुष्मन वाटणारे काही ब्रॅन्ड प्रोडक्ट खरतरं एकाच कंपनीचे दोन वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. चला तर मग पाहूया असे कोणकोणते ब्रॅन्ड ग्राहकांची दिशाभूल करतात.

रिस्ट वॉच

रिस्ट वॉच हा तर स्टेटसचा प्रश्न असतो राव. Rado, Omega, Tissot सारखे ब्रॅन्ड वापरण्यासाठी ग्राहकांचीच चढाओढ असते. कारण ही सगळी महागडी घड्याळं लग्झरी सेशनमध्ये येतात. यामधलं नेमकं कोणत्या ब्रॅन्डचं निवडायचं हा प्रश्न बऱ्याचदा आपल्याला सतावतो. पण तुम्हाला सांगते ही सगळी घड्याळं एकाच कंपनीची पिल्लं म्हणजेच प्रोडक्ट आहेत हो. काय म्हणता? धक्काच बसला ना? Swatch Group कंपनीने ही वेगवेगळ्या ब्रॅन्डची घड्याळ बाजारात आणली आहेत. एकूणच काय तर या घड्याळांचे माय-बाप एकच आहेत.

वॉशिंग पावडर

आपल्या सगळ्यांच्याच घरात वॉशिंग पावडर नियमित वापरली जाते. वेगवेगळ्या कंपनीच्या जाहिरातीही आपण नेहमीच टिव्हीवर पाहतो. यात रिन आणि सर्फ एक्सल हे दोन ब्रॅन्ड चक्क नावासह एकमेकांविरोधात जाहिरात करतात. तेव्हा कुठेतरी तुम्हाला ही बाब खटकलीच असेल नाही का? कारण सामान्यतः शक्यतो नावा शिवाय विरोधी ब्रॅन्डच्या प्रोडक्टची रंगसंगती वापरुन जाहिरात केली जाते. मात्र हे दोन प्रोडक्ट थेट एकमेकांविरोधात टिव्हीवर जाहिरात करतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? हे दोन्हीही प्रोडक्ट हिंदूस्तान लिव्हर कंपनीचे आहेत. आणि अशा प्रकारच्या जाहिरातींमधून ते एकमेकांना चांगला पर्याय सुचवतात. म्हणजे ज्यांना परवडतं त्यांनी सर्फ एक्सेल घ्या आणि नाही परवडत त्यांनी रिन.. आहे की नाही भारी स्ट्रॅटेजी?

टूथपेस्ट

Closeup आणि Pepsodent या ब्रॅन्डच्या जाहिराती तर आपण कित्येक दशकं पाहत आलो आहोत. दोन्ही कंपन्यांच्या प्रोडक्टचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आणि त्याच पध्दतीने एकमेकांविरोधात त्यांची जाहिरात केली जाते. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही हे दोन्हीही प्रोडक्ट एकाच कंपनीचे म्हणजे हिंदुस्तान लिव्हरचेच आहेत. काय बसला ना धक्का?

सनग्लास

सनग्लासेस म्हणजेच आपला गॉगल हो.. तर सनग्लासेस म्हटलं की Ray-ban आणि Revo सारखेच ब्रॅन्ड डोळ्यासमोर येतात. हे दोन्ही ब्रॅन्ड बाजारात एकमेकांसमोर दंड थोपटूनच उभे आहेत. पण गंमत म्हणजे या दोन्ही ब्रॅन्डचे प्रोडक्ट बनवणारी कंपनी एकच आहे. Luxottica नामक कंपनी हे प्रोडक्ट बनवते आणि प्रोडक्टचे मार्केटिंग अशाप्रकारे करते की ब्रॅन्डेड सनग्लासेस म्हणजे Ray-ban आणि Revoच. याने होतं काय लोकं याच दोन ब्रॅंन्डचे प्रोडक्ट विकत घेण्याला प्राधान्य देतात आणि फायदा हा एकाच कंपनीचा होतं. ही तर चक्क ग्राहकांच्या डोळ्यात धूळफेकच झाली हो…

शॅम्पू

प्रत्येकाच्या घरात शॅम्पू हा वापरलाच जातो. त्यात डव आणि सनसिल्क सारखे ब्रॅन्डतर प्रत्येकाच्याच घरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. वर वर जरी हे एकमेकांचे दुष्मन दाखवत असले तरी ते युनिलिव्हर नामक एकाच कंपनीच्या छताखाली तयार होतात.

तर मग भावा बहिणींनो… ब्रॅन्ड ब्रॅन्ड करुन प्रोडक्ट विकत घेण्याआधी जरा डोळे उघडून तपासा की कोणती कंपनी तुम्हाला गंडवत तर नाही ना?


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *