काय म्हणता? तुम्हाला माहित नाही? कधी पाहिलं नाही? अहो काय राव तुम्ही! जर तुमच्याकडे दोन हजारांची नोट असेल तर आताच पहा. त्यात तुम्हाला नोटेच्या पुढे आणि मागे काही पांढरे ठिपके दिसतील. बरं आता तुम्ही म्हणाल हे असेल काहीतरी डिजाईन! पण नाही थांबा, तुम्ही चुकताय. आठवतंय ना, कोणत्याही गोष्टीमागे कारण असतं! जगात कोणतीच गोष्ट उगाच होत नसते. त्याच प्रकारे या ठिपक्यांमागे सुद्धा एक कारण आहे. चला आज ते डिकोड करुया!
तुम्ही दोन हजारांची कोणतीही नोट नीट पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की नोटेच्या पुढील बाजूस म्हणजे जिथे महात्मा गांधींचा फोटो असतो त्या बाजूस खालच्या भागात काही ठिपके दिसतील. मग वरच्या भागात सुद्धा काही ठिपके दिसतील. आता मागच्या बाजूस आलात तर तुम्हाला उजव्या भागात काही ठिपके दिसतील.
म्हणजे एकाच नोटेवर तीन ठिकाणी ठिपके!
ही डिजाईन तर नक्कीच नाही. हे ठिपके सांकेतिक आहे. आता एक काम करा नोट पुन्हा सरळ करा आणि पुढील बाजूस दोन ठिकाणी जे ठिपके आहेत ते मोजा. सर्वात आधी खालच्या बाजूचे ठिपके मोजा. या ठिपक्यांची संख्या आहे ९. आता वरच्या भागात असणारे ठिपके मोजलेत तर तुम्हाला मिळणारी संख्या असेल ११. आता मागच्या बाजूस जा आणि तेथील ठीपके मोजा. या ठिपक्यांची एकूण संख्या आहे १६.
९.११,१६. हा क्रमांक पाहून काही आठवतंय का? अहो हाच तर तो दिवस आहे ज्या दिवशी आपले लाडके (काहींचे असतील म्हणून) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटा बॅन करून २००० ची नवी नोट चलनात आणली होती. तर त्याच दिवसाचा संकेत २००० च्या नोटेवरील हे पांढरे ठिपके देत असतात.
आता काही जण म्हणतील आपली कामगिरी लक्षात राहावी म्हणून मोदींनी ही ठिपके पाडण्याची पद्धत सुरु केली. पण नाही, असा समज अजिबात करून घेऊ नका. कारण ही पद्धत तुम्हाला प्रत्येक नोटेवर दिसेल. तुम्ही भारतीय चलनाची कोणतीही नोट घ्या. त्यावर तुम्हाला असेच पांढरे ठिपके दिसतील. ते वरील क्रमाने मोजलेत की तुम्हाला ती दिनांक मिळेल ज्या दिवशी ती नोट चलनात आली होती. फक्त जुन्या नोटांमधील हे ठिपके एकसमान रंगसंगतीमुळे सहज दिसून यायचे नाहीत. २००० च्या नोटेवरील ठिपके हे गडद असल्याने लगेच नजरेस पडतात.
बघा सगळ्या गोष्टीत लॉजिक असतं ही गोष्ट पुन्हा सिद्ध झाली की नाही? असेच अनेक भन्नाट लॉजिक्स मवालीने उलगडले आहेत. ते जाणून घ्या आणि अजून हुशार व्हा!
0 Comments