प्रभू श्रीरामाचे परम भक्त हनुमान यांना आपल्या हिंदू संस्कृतीमुळे एक वेगळेच स्थान आहे. अर्थात का नसावे? त्यांची महतीच तितकी अगाध आहे. तर अशा या भगवान हनुमानांची गदा नेहमी त्यांच्या सोबत असते आणि म्हणूनच या गदेला सुधा तेवढेच प्राधान्य दिले जाते. पण तुम्हाला माहित आहे का हनुमानाची गदा इतकी लोकप्रिय का आहे? तर त्याचे उत्तर म्हणजे हनुमानाच्या गदेशी भाविकांची मोठी श्रद्धा जोडलेली आहे.

काही लोकं हनुमानाची गदा आपल्या घरी ठेवतात तर काही जण ती आपल्या गळ्यात धारण करतात. असं म्हणतात की छोटी गदा गळ्यात धारण केल्याने आपल्या मनातून क्रोध अहंकार वासना दूर राहतात आणि या सगळ्यावर नियंत्रण मिळवता येते.
तर या गदे संदर्भात गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात असं दाखवलं आहे की पाकिस्तानच्या संसदेत आणि कोर्टात हनुमानाची गदा ठेवलेली आहे. साहजिकच एका इस्लामिक देशात एका हिंदू देवतेला एवढा मान कसा असं आपल्या भारतीयांना वाटणं साहजिकच आहे. शिवाय अनेकांना याबद्दल पाकिस्तानचे कौतुक देखील वाटले. पण या मागचे कारण काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. आहे.
असे काय कारण आहे की हनुमानाची गदा पाकिस्तानच्या कोर्टात जजच्या टेबलवर ठेवली जाते. शिवाय संसदेत देखील या गदेला विषय मान आहे? तर मंडळी याचे एका वाक्यात उत्तर आहे की ती व्हिडीओ पाहून आपल्याला गैरसमज झाला आहे. हो ती गदाच आहे. पण ती गदा हनुमानाच्या अस्त्राचे प्रतिक म्हणून नसून लोकशाही पद्धतीचे प्रतिक आहे.

कन्फ्युज झालात? थांबा अजून सोप्पं करून जाणून घेऊ. केवळ पाकिस्तानच नाही तर जगभरातील प्रजासत्ताक देश जिथे लोकशाही आहे तिथे तिथे संसदेत ही गदा ठेवली जाते.
फरक इतकाच की वेगवेगळ्या देशाप्रमाणे ह्या गदेचा आकार बदलतो. ह्या गदेचा रंग, रूप आणि आकार हा वेगवेगळ्या देशात वेगवेगळा पाहायला मिळतो. खासकरून जी कॉमनवेल्थ राष्ट्रे आहेत आणि जी ब्रिटनच्या अधीन आहेत अशांच्या संसदेत सभापतीच्या टेबलावर गदा ठेवण्याची प्रथा आहे.
जगभरातील इतरही अनेक संसदेत सभापतींच्या टेबलावर गदा ठेवण्याची प्रथा आहे. यामागे असे कारण आहे की गदा ठेवल्याने आपल्यामधला क्रोध आणि अहंकार शाबूत ठेवाका जातो. उत्तम अनुशासन आणि जो अधिकार मिळालेला आहे त्याचा नीट वापर करण्याची आठवण ही गदा सतत करून देते असे सुद्धा मानले जाते.
ही ब्रिटिश परंपरा आहे जी ब्रिटिशांनी भारतात आणि इतर देशात राबवली. भारताला स्वातंत्र्य १९४७ ला मिळाले. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीपासून ही प्रथा चालू होती पण भारतात आता जजच्या टेबलावर आणि संसदेत ही प्रथा बंद केली आहे. मात्र काही देशात अजूनही ही प्रथा तशीच चालू आहे.
0 Comments