OLA आणि Uber यांचं बिझनेस मॉडेल काय आहे? ह्या कंपन्या ‘असे’ पैसे कमवतात!

उबरने ‘एग्रीगेटर बिझनेस मॉडेल’ ची संकल्पना जगासमोर आणली. यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप करून पार्टनर्स स्वतःच्या ऑफरची निर्मिती करण्याऐवजी तुमच्या ब्रँड अंतर्गत काम करू शकतात.


तुम्हाला नेहमी कुठेही जायचे असताना रस्त्यावर अनेक तास उभे राहून रिक्षा किंवा कॅबसाठी वाट बघावी लागली आहे? कधी तुम्हाला एक टॅक्सी किंवा रिक्षा मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले आहेत? किंवा उन्हातान्हात खूप चालावं लागलं आहे? अशावेळी वाटते की एखादी एसीवाली टॅक्सी पुढ्यात येऊन उभी राहावी आणि आपण मस्त निवांत त्यात बसून आपल्याला आपल्या ऐच्छिक ठिकाणी पोहोचवावी.

अशावेळीच Uber आणि Ola आपल्या कामी येतात. Uber आणि Ola हे कॅब आणि रिक्षाशी संबंधित अशा सर्व समस्यांचे समाधान करतात. Uber ला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, हे एक असे स्मार्टफोन अँप आहे जे त्याच्या युजर्सना मागणीनुसार कॅब आणि रिक्षाची सेवा पुरवते. यात खूप सोप्या पद्धतीने आपण कॅब किंवा रिक्षा बूक करू शकतो. याची एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे जिथे नोंदणीकृत Uber युजर्सना अँपवर विनंती करून टॅक्सी चालकाशी जोडले जाते. त्यांनतर युजर्सना त्यांच्या इच्छूक ठिकाणी पोहोचवले जाते.

२००९ मध्ये स्थापन झालेली Uber सेवा सध्या ६५ देशांमधील ६०० शहरांमध्ये उपलब्ध आहे. आज कंपनीचे जगभरात जवळजवळ १०० दशलक्षहून अधिक मासिक सक्रिय युजर्स आहेत. कंपनीचे मूल्य ६० अब्ज डॉलर एवढे आहे आणि ती परवडणाऱ्या किमतीत बाईक्स, स्कूटर्स, कार्स आणि Uber Air या सेवा पुरवते.

Uber चा यूएसपी पारंपरिक टॅक्सी व्यवसाय सोडून टॅक्सी चालकांना सोप्या पद्धतीने प्रवाशांकडे जोडून त्यातून स्वतःचा देखील फायदा करण्याचा आहे. सर्वांनाच या गोष्टीचे कुतूहल आहे की Uber कसे काम करते आणि सगळ्यात महत्वाचे ते पैसे कसे कमावते. इतर टॅक्सीपेक्षा कमी किंमतीत आणि कोणतीही अतिरिक्त टीप न देता Uber चालवणाऱ्या चालकांना आज कंपनीला हा व्यवसाय कसा फायदा करुन देतो हे पाहूया.

Uber बिझनेस मॉडेल

उबरने ‘एग्रीगेटर बिझनेस मॉडेल’ ची संकल्पना जगासमोर आणली. यामध्ये तुम्हाला पार्टनरशिप करून पार्टनर्स स्वतःच्या ऑफरची निर्मिती करण्याऐवजी तुमच्या ब्रँड अंतर्गत काम करू शकतात. म्हणजेच, Uber कडे कोणतीही स्वतःची कार नाही. हे स्वतःच्या कॅब चालवणाऱ्या चालकांना एकत्रित करते आणि Uber ब्रँडच्या नावाखाली काम करायला लावते. यात वास्तविक सेवा पार्टनर्सकडून केली जाते फक्त उबर ती सेवा व्यवस्थित पार पडते आहे का याची खात्री करून घेते. कॅब वेळेवर पोहोचतात, स्वच्छ असतात, योग्य मार्ग घेतात आणि ग्राहकांच्या सुरक्षेची काळजी घेणे याची उबर खात्री करते.

Uber कसे काम करते?

उबर दोन प्रकारच्या ऑपरेटिंग मॉडेलवर काम करते. एक बाजू अधिकाधिक टॅक्सी चालकांना एकत्र करून ऑनबोर्ड घेऊन ग्राहकांना सर्वाधिक चांगला अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करते. तर, दुसरी बाजू ग्राहकांसाठी एक उत्तम राईड करण्यासाठी उबर अँपचे सर्वाधिक मार्केटिंग करण्यावर लक्ष केंद्रित करते. उबर अँपद्वारे स्मार्टफोनवरून काही क्लिक्सवर कॅब बुक केली जाऊ शकते.

ऍप्लिकेशन ही पहिली पायरी आहे जिथे ग्राहक त्याला जायचे असलेले ठिकाण आणि जिथून जायचे आहे ते ठिकाण यांचा तपशील टाकतो. त्यावर ऍप वाहनाचा आकार, किंमत, अंदाजे ग्राहकाने टाकलेल्या अंतिम स्थानी पोचण्यासाठी लागणारा वेळ आणि राईड पर्याय दाखवतात. ग्राहकांच्या मागणीनुसार पर्याय निवडते आणि पीकअपची व्यवस्था करतो.

ऍप्लिकेशन अल्गोरिदम जवळपास उपलब्ध असलेल्या सर्व चालकांना ग्राहकाने केलेल्या विनंतीबद्दल माहिती देते जे नंतर चालक स्वतःच्या इच्छेनुसार स्वीकारू किंवा नाकारू शकतात. कोणतीही गैरसोय न होण्यासाठी उबर चालकांना राईड स्वीकारण्यापूर्वी गंतव्यस्थानाची माहिती देत नाही. चालकाने विनंती स्वीकारल्यानंतर, ग्राहकाला ड्रायव्हरबद्दल सूचित केले जाते आणि ड्रायव्हरला ग्राहकाच्या लोकेशनपर्यंत पोचण्यासाठी लागणारा वेळ दाखवला जातो.

ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी ग्राहकाला एक चार अंकी पिन दिला जातो जो राईड सुरू होण्यापूर्वी ग्राहकाने चालकाला सांगायचा असतो. तसेच, आलिशान राईड्समध्ये ग्राहकांना त्यांच्या राईड दरम्यान मनोरंजन यंत्रणा आणि वायफाय वापरता येते. हे उबरला ब्रँड बिल्डिंगमध्ये मदत करते. याचसोबत, आणखी सुरक्षेसाठी उबर ड्रायव्हरचे बॅकग्राउंड चेक करते आणि तसेच ग्राहकांना देखील त्यांचे उबर अकाउंट फोन नंबर किंवा सोशल मीडिया अकाउंटशी जोडून पडताळणी करावी लागते.

Uber वर विविध पेमेंट पॉलिसी आहेत. राईड पूर्ण झाल्यावर ग्राहक कॅश, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ई-बँकिंग आणि वाँलेटच्या स्वरूपात पेमेंट करू शकतात. तसेच, ग्राहकाला ड्रायव्हरला रेट करण्याचा पर्याय देखील असतो ज्यामध्ये ग्राहक राईडविषयी व ड्रायव्हरविषयी अभिप्राय देऊ शकतात.

Uber पैसे कसे कमावते?

उबरचे रेव्हेन्यू मॉडेल हे कमिशनवर आधारित मॉडेल आहे जिथे ते ड्रायव्हरद्वारे स्वतःचा ब्रँड आणि सेवा वापरण्यासाठी सर्व राईड्सवर २०-२५% शुल्क आकारते. Uber ग्राहकांना ड्रायव्हरपर्यंत आणते, त्यांना पेमेंट पर्याय, नकाशे, ETA सह एक चांगला अनुभव देते आणि त्यासाठी राईड फीच्या २०-२५% आणि इतर फी (सुरक्षित राईड फी, बुकिंग फी, इ.) आकारते. राईडसाठी किती शुल्क आकारायचे हे ड्रायव्हर्सनी न ठरवता Uber वेगवेगळ्या श्रेणीच्या राईड्ससाठी प्रति किलोमीटर किंमत आकारते. उबर राईडची किंमत मूळ भाडे, राईडला लागणारा वेळ, अंतर, बुकिंग  यांच्यावर अवलंबून असते.

हीच सिस्टम भारतातील अजून एक प्रसिद्ध कंपनी OLA सुद्धा वापरते आणि Uber च्या बिझनेस मॉडेल मध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा करून Uber ला चांगली टक्कर देत आहे.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Gayatri Gurav