Hey guys, जगातील सर्वांत उंच शिखर कोणते? हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही लगेच उत्तर द्याल कि माऊंट एवरेस्ट. पण जर मी सांगितले कि हे उत्तर चुकीचे आहे, माउंट एव्हरेस्ट हे जगातील उंच शिखर नाही आहे, तुम्हाला आजवर खोटेच सांगितले गेले आहे, तर? हो नक्कीच तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही शाळेत शिकलेल्या भूगोलावरचा तुमचा विश्वास उडेल. तुम्हाला वाटेल कि ते भूगोलाचे पुस्तक शोधून स्वाहा करावे.
पण Guys, थांबा! टेन्शन घेऊ नका. खरे तर माऊंट एवरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. आता तुम्ही म्हणाल हे कसे? तर हे असे….! जेव्हा पृथ्वीवर एखाद्या वस्तूची उंची मोजली जाते तेव्हा ती वस्तू समुद्र सपाटी पासून किती उंच आहे हे मोजले जाते. म्हणजे आपली मुंबई समुद्र सपाटी पासून फक्त ५ मीटर उंच आहे. सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचा statue of unity पुतळा १९३ मीटर, महाबळेश्वर १३५० मीटर, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई १६४६ मीटर उंच आहे. ह्या measuring system नुसार माऊंट एवरेस्ट हे शिखर समुद्र सपाटीपासून ८८४८.८६ मीटर उंच आहे आणि म्हणूनच माऊंट एव्हरटेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर मानले जाते.
माऊंट एव्हरेस्ट हे हिमालय पर्वत रांगांतील जो भाग नेपाळ मध्ये आहे तिथे स्थित आहे. माऊंट एव्हरेस्ट हे नाव ब्रिटिशकालीन भारतातील Surveyor General of India, Sir George Everest ह्यांचा नावावरून ठेवले गेले आहे.
अभिमानाची गोष्ट ही कि एव्हरेस्टची उंची मोजण्याचे श्रेय जाते भारतीय गणितज्ञ श्री. राधानाथ श्रीकर यांना. श्री. राधानाथ श्रीकर यांनी त्याकाळच्या Surveyor General of India, Andrew Scott waugh ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतातील सर्वात उंच शिखर शोधून काढले आणि मग Andrew Scott waugh ह्यांच्या सूचनेनुसार ह्या पर्वताचे नाव माऊंट एवरेस्ट ठेवण्यात आले. २९ मे १९५२ ह्या दिवशी नेपाळी शेर्पा तेनसिंग नॉरगे आणि न्यूझीलंडचे गिर्यारोहक Sir Edmund Hilary ह्या दोन पठ्ठयांनी माऊंट एवरेस्ट हे शिखर सर्वात प्रथम सर केले. त्यानंतर आता पर्यंत जगभरातील जवळ जवळ ४००० गिर्यारोहकांनी माऊंट एवरेस्ट सर केले आहे.
आता पाहूया कि माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर कसे नाही. मौना केया आणि चिम्बोराझो हि २ शिखरे माऊंट एवरेस्ट पेक्षा उंच आहेत असे आढळून येते, पण कसं काय? तर दोन भिन्न measuring system मुळे! मौना केया हा अमेरिकेतील हवाई बेटांवरचा एक ज्वालामुखीय पर्वत आहे. खरंतर तो एक मृत ज्वालामुखीच आहे.
सामान्यपणे पर्वतांची उंची समुद्र सपाटी पासून शिखरापर्यंत मोजली जाते पण जर पर्वताची उंची त्याच्या पायथ्यापासून शिखरापर्यंत मोजली तर मौना केया जगातील सर्वात उंच शिखर मानले जाईल.
मौना केयाची समुद्र सपाटी पासूनची उंची आहे ४२०० मीटर आणि पर्वताचा अर्ध्या पेक्षा जास्त भाग म्हणजे ६००० मीटर समुद्राखाली बुडालेला आहे. म्हणजे मौना केया पर्वताची पायथ्या पासून (समुद्रतळा पासून) शिखरापर्यंत एकूण उंची होते १०२०० मीटर जी माऊंट एव्हरेस्ट पेक्षा १३५२ मीटर ने जास्त आहे. म्हणूनच मौना केया माऊंट एवरेस्ट पेक्षा उंच पर्वत आहे.
हे झाले मौना केया चे आता पाहुया चिम्बोराझो पर्वताचे काय म्हणणे आहे. चिम्बोराझो हा उत्तर अमेरिका खंडातील इक्वाडोर ह्या देशातील अँडीस पर्वतरांगा मधील एक पर्वत आहे. चिम्बोराझो ची समुद्र सपाटी पासून उंची आहे ६२६८ मीटर. आपण इथे चिम्बोराझो ची उंची तिसऱ्या measuring system नुसार मोजुया. तिसऱ्या measuring system मध्ये पर्वताची उंची पृथ्वीच्या केंद्रबिंदू पासून त्याच्या शिखरापर्यंत मोजली जाते.
पृथ्वीगोल हा अंडाकृती आहे. उत्तर व दक्षिण ध्रुवापासून मध्यभागी विषुववृत्ताकडे फुगीर होत गेला आहे. अँडीस पर्वतरांगा विषुववृत्तावर वसलेल्या आहेत. माऊंट एवरेस्ट हा उत्तर गोलार्धावर स्थित आहे. ह्या measuring system नुसार पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या शिखरापर्यंत माऊंट एवरेस्ट ची उंची आहे ६३८३ किलोमीटर. दुसऱ्या बाजूला पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून त्याच्या शिखरापर्यंत चिम्बोराझोची उंची आहे ६३८४ किलोमीटर. म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रबिंदूपासून जर मोजले तर चिम्बोराझो हे शिखर माऊंट एवरेस्ट पेक्षा दूर आहे आणि म्हणूनच उंच आहे.
Guys, म्हणजेच दोन भिन्न measuring system प्रमाणे मोजणी केली तर ह्या पृथ्वीवर माऊंट एवरेस्ट पेक्षा हि उंच इतर दोन शिखरे आहेत, मौना केया आणि चिम्बोराझो. माऊंट एवरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर असले-नसले तरी ते असंख्य गिर्यारोहकांचे all time favourite राहील आणि त्याचे तिबेटियन नाव चोमोलुंग्मा म्हणजेच ‘जगाची देवीमाता’ बनून राहील.
0 Comments