PAN CARD वर असणाऱ्या क्रमांकामागे दडलंय ‘हे’ खास लॉजिक!

महत्त्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड नसेल तर तुमच्या कामाचे घोडे पुढे जाऊच शकत नाही.


आधार कार्ड असो वा पॅन कार्ड भारतातल्या प्रत्येकासाठीच ते फार महत्त्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक आहे. प्रत्येक सरकारी, निमसरकारी कामासाठी पॅन कार्डची गरज तर भासते. विशेषतः नोकरी किंवा धंदा करायचा म्हटलं तर त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटपैकी एक म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड नसेल तर तुमच्या कामाचे घोडे पुढे जाऊच शकत नाही. अगदी बॅंकेपासून ते तुमच्या ऑफिसपर्यत पॅनकार्ड हे अनिवार्य आहे. आता याच पॅन कार्ड बद्दल आपण माहिती जाणून घेऊया.

Source : dnaindia.com

सगळ्यात आधी तुम्हाला PAN Card चा फुलफॉर्म माहीत आहे का? Permanent Account Number Card हा पॅन कार्डचा फुल फॉर्म. याचाच अर्थ तुमच्या पॅन कार्डवर जो क्रमांक तुम्हाला दिला जातो तो कायम म्हणजेच पर्मनंट नंबर असतो. तो कोणत्याही कारणाने बदलता येत नाही.

तुम्हा सगळ्यांनाच माहीत आहे आपला पॅन कार्ड नंबर १० आकडी असतो ज्यामध्ये इंग्रजी वर्णमालेमधली काही अक्षरे समाविष्ट केलेली असतात. या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही संबंधित व्यक्तीची बरीच माहिती मिळवू शकता. हे कसं काय शक्य होते, आणि या १० आकडी क्रमांकाचा अर्थ काय हे सुद्धा जाणून घेऊ या.

पॅन कार्डवरचा १० अंकी क्रमांक म्हणजे फक्त साधेसुधे अंक आणि अक्षरं यांची जुळवाजुळव नसते. तर त्या अंकामध्ये तुमच्या संबंधीची बरीचशी महत्त्वाची माहिती समाविष्ट असते. आयकर विभागातर्फे जेव्हा पॅनकार्ड जारी केले जाते, तेव्हा प्रत्येकाचा पॅन क्रमांक तयार करण्यासाठी एक विशिष्ट्य पध्दत अवलंबली जाते. तुम्ही कधी निरखून पाहिल तर तुम्हाला कळेल की प्रत्येकाच्या पॅनकार्ड क्रमांकात पहिली ५ इंग्रजी अक्षरं असतात त्यानंतर ४ अंक असतात आणि शेवटी परत एक इंग्रजी अक्षर असते.

आता आपल्या परमनंट अकाऊंट नंबर मध्ये इंग्रजी मुळाक्षरे का बरी वापरली जातात?. ही अक्षरे वापरण्यामागे आयकर विभागाचा नेमका काय हेतू असावा? सगळ्याच इंग्रजी मुळाक्षरांचा वापर पॅन कार्ड नंबर तयार करताना होतो का? आता असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील नाही? चला तर मग आपण जाणून घेऊया या परमनंट अकाऊंट नंबरचा अर्थ.

Source : apupdates.org

पॅन कार्डच्या क्रमांकाची सरुवात म्हणजे तीन इंग्रजी अक्षरांची सिरिज असते. ही तीन अक्षरे AAA ते ZZZ पर्यंत कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये असू शकतात.

मध्ये जे चार अंक असतात ते ०००१ ते ९९९९ पर्यंतची कोणतीही संख्या असते. तर कार्डवर असलेले चौथे इंग्रजी अक्षर हे पॅन कार्ड धारकाचे स्टेटस दर्शवते. हे स्टेटस म्हणजे नेमके काय? ती अक्षरे नेमकं काय दर्शवितात ते पाहू.

A- असोसिएशन ऑफ पर्सन म्हणजेच ती व्यक्ती कुठल्या गटात समाविष्ट आहे
B- बॉडी ऑफ इंडिव्हीजूअल
C- त्याच्या कंपनीबाबत
F- त्या व्यक्तीच्या फर्मबाबत
G- अनडिव्हायडेड हिंदू फॅमिलीज्
J- आर्टिकल ज्युडिशीअल पर्सन
L- लोकल अथॉरिटी
P- त्या व्यक्तीबाबत
T- असोसिएशन ऑफ पर्सनस् फॉर ट्रस्ट

तर मंडळी आता तुम्हाला कळलंच असेल हा १० अंकी पॅनकार्ड क्रमांक आयकर विभागाला तुमच्याबद्दल इत्यंभूत माहिती देऊ शकतो, म्हणूनच तो तसा तयार करण्यात आला आहे.!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *