पोलिसांच्या युनिफॉर्म वरील बॅच सांगतात त्या त्या पोलिसाचा हुद्दा, चला जाणून घ्या!

पोलीस युनिफॉर्म मधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्यावर असणारे बॅचेस!


आर्मी, नेव्ही, एअर फॉर्स याबरोबरच एक महत्त्वाचा घटक आपल्या समाजात आहे तो म्हणजे पोलीस. पोलिसांना बघितलं की सुरक्षिततेची एक भावना मनात निर्माण होते. आपल्या संरक्षणाकरता कोणतरी सतत आहे या जाणिवेने रात्रीची सुखकर झोप देखील लागते. अशा या पोलीस खात्याचा युनिफॉर्म म्हणजे तुमच्या आमच्या सामान्य माणसांसाठी एक अप्रूप वाटणारी गोष्ट! या युनिफॉर्म मधील सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे त्यावर असणारे बॅचेस!

तुम्ही कधी विचार केला आहे का की या बॅचेसचा नेमका अर्थ काय असतो, चला आज याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया.

भारतीय पोलीस खात्यामध्ये सगळ्यात खालचा हुद्दा किंवा पद हे पोलिस कॉन्स्टेबलचं असतं. कॉन्स्टेबलच्या युनिफॉर्म वर कोणताच बॅच नसतो. कॉन्स्टेबल फक्त युनिफॉर्म घालतात. त्यामुळे त्यांना ओळखणे खूप सोपं जातं. याच्यावरची पोस्ट म्हणजे सीनियर कॉन्स्टेबलची असते.

सीनियर कॉन्स्टेबलच्या युनिफॉर्म वर दोन लाल पट्ट्या असतात. हीच त्यांची ओळख. सिनियर कॉन्स्टेबलच्या वरती असते हेड कॉन्स्टेबल ची पोस्ट. हेड कॉन्स्टेबलच्या बाहीवरती तीन लाल कलरच्या पट्ट्या असतात. युनिफॉर्म वर तीन लाल कलरच्या पट्ट्या दिसल्या तर समजुन जा की पोलीस युनिफॉर्म मधली असलेली व्यक्ती हेड कॉन्स्टेबल आहे.

हेड कॉन्स्टेबलच्या वरची पोस्ट असते असिस्टंट सब इंस्पेक्टर. असिस्टंट सब इन्स्पेक्टरच्या युनिफॉर्म वर एक स्टार असतो आणि त्याच्याखाली एक अर्धा इंची पट्टी असते त्याच्यावर एक लाल पट्टी व एक निळ्या रंगाची पट्टी असते. असिस्टंट सब-इन्स्पेक्टर च्या वरची पोस्ट असते सब इन्स्पेक्टर म्हणजेच एस.आय.ची!

Source : blogspot.com

सब इन्स्पेक्टरच्या युनिफॉर्म वर दोन स्टार्स असतात. हे स्टार्स सब इन्स्पेक्टरच्या बाही वरती असतात. त्याच प्रमाणे असिस्टंट सब-इन्स्पेक्टरच्या प्रमाणे दोन स्टार्सच्या खाली लाल आणि निळी रंगाची पट्टी असते. सब इंस्पेक्टर च्या वरची पोस्ट म्हणजे इन्स्पेक्टरची असते. ही पोस्ट पोलीस ठाण्यांमध्ये सगळ्यात मोठी पोस्ट असते. इन्स्पेक्टरच्या बाहीवरती तीन स्टार्स दिलेले असतात आणि ह्याच बरोबर लाल रंगाची पट्टी आणि निळ्या रंगाची पट्टी पण असते.

लाल रंगाची पट्टी आणि निळ्या रंगाची पट्टी ही असिस्टंट सब इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टरआणि इन्स्पेक्टर या तिघांच्याही युनिफॉर्म वरती दिसून येते.

इन्स्पेक्टरच्या वरची पोस्ट असते ती म्हणजे डी.एस.पी. ची! डी.एस.पी. अधिकाऱ्याच्या युनिफॉर्मवर फक्त तीन स्टार्स असतात. इथे लाल रंगाची आणि निळ्या रंगाची पट्टी बघायला मिळत नाही. ए.एस.पी म्हणजेच ॲडिशनल सुपरिटेंडेंट पोलीस ही पोस्ट डी.एस. पी. च्या वरची पोस्ट असते. ए.एस.पी च्या युनिफॉर्म वर एक अशोक स्तंभ असतं. याव्यतिरिक्त त्या कुठल्याही रंगाच्या पट्ट्या नसतात.

Source : blogspot.com

त्या वरची पोस्ट असते ती म्हणजे एस.पी ची! एस.पी. च्या युनिफॉर्म वर एक स्टार आणि एक अशोक स्तंभ असतं. ह्या वरची पोस्ट म्हणजे एस. एस. पी.

एस.एस.पी. च्या युनिफॉर्म वर एक अशोक स्तंभ आणि दोन स्टार्स असतात. डेप्युटी इन्स्पेक्टर जनरलच्या युनिफॉर्म वर एक अशोक स्तंभ आणि तीन स्टार्स असतात. पोलीस कमिशनर (स्टेट) यांच्या युनिफॉर्म वर एक अशोक स्तंभ एक स्टार आणि एक तलवार असते. या व्यतिरिक्त खाली आय.पी.एस. पण लिहिलेलं असतं.

तर मंडळी आता जेव्हा तुम्ही कुठल्याही पोलीसांना बघाल तेव्हा तुम्हाला त्यांची पोस्ट सहज कळून येईल. चला तर आपल्या मित्र मंडळींसोबत सुद्धा हा लेख नक्की शेअर करा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *