जगात अशी कोणतीच गोष्ट नाही ज्या मागे कारण नाही. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अस्तित्वात आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की ही काय साधी गोष्ट आहे, असेल अशीच! पण नाही मनुष्यापासून ते अगदी गॅस सिलेंडर असलेल्या होल्स पर्यंत प्रत्येक गोष्टीमागे एक कारण आहे. हो मंडळी, तुमच्या घरात जो गॅस सिलेंडर आहे त्याच्या खालील बाजूस असलेल्या होल्स वर तुमचे लक्ष सुद्धा नक्कीच कधी न कधी गेले असेल.
तर हे होल्स त्याच जागी असण्यामागे एक मोठा अर्थ दडला आहे आणि हा अर्थ आपल्या प्रत्येकालाच माहित असायला हवा. तर गॅस सिलेंडरच्या खालच्या बाजूस असणाऱ्या रिंगवर हे होल्स असतात या मागे एक वैज्ञानिक कारण आहे.
एलपीजी गॅस सिलेंडर हे सध्याच्या काळात जरी आपल्यासाठी जीवनावश्यक झाले असले तरी हा गॅस खूप घातक आहे हे देखील तितकेच खरे! पण हा गॅस घातक कधी ठरतो? तर जेव्हा त्याचे तापमान वाढते. त्यामुळेच जेव्हा गॅस सिलेंडरचा शोध लागला आणि ही सुविधा निर्माण झाली तेव्हा याचे तापमान संतुलित राखण्याचे एक मोठे आवाहन उभे ठाकले आणि त्यावेळीच या होल्सची मुहूर्तमेढ रोवली असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
गॅस सिलेंडर नीट पहिला तर तुमच्या लक्षात येईल की तो संपूर्ण पॅक असतो. म्हणजे ना त्यातून कुठूनही गॅस बाहेर येईल ना बाहेरची हवा त्यात जाईल. मग अशावेळी या गॅस सिलेंडरचे तापमान संतुलित राखण्यासाठी आणि एलपीजी गॅस विध्वंसक ठरू नये म्हणून त्याच्या खालच्या रिंगवर होल्स करण्याची शक्कल लढवण्यात आली.
जेणेकरून या होल्स मधून हवा पास होत राहिल आणि गॅस सिलेंडरच्या तळाची जी बाजू आहे तेथील तापमान थंड राहील. म्हणजे उष्ण तापमानाचा संबंध आतील गॅसशी येणार नाही.
हा झाला या होल्सचा पहिला फायदा, जेव्हा ग्राहकांसाठी गॅस सिलेंडर उपलब्ध करून देण्यात आले तेव्हा साहजिक विविध कंपन्या या सेवेसाठी उतरल्या. त्यांना या होल्सचा खरा अर्थ आणि उपयोग माहित होता. पण त्यांनी अजून एका गोष्टीसाठी या होल्सचा वापर करायचे ठरवले. प्रत्येक गॅस कंपनीने आपल्या कंपनीचे गॅस सिलेंडर लगेच ओळखता यावेत म्हणून विशिष्ट प्रकारचे होल करण्यास सुरुवात केली.
तुम्ही जर भारतगॅस कंपनीचा गॅस सिलेंडर पाहिला तर त्यावर तुम्हाला गोल होल्स दिसतील. एचपी गॅस सिलेंडर पहिला तर त्यावर तुम्हाला आयताकृती होल्स दिसतील. यामुळे केवळ या होल्सकडे पाहून गॅस सिलेंडर कोणत्या कंपनीचा आहे हे लगेच ओळखण्यास मदत मिळते.
कळलं का हे होल्स किती कामाचे आहेत? अहो मग शेअर करा ही माहिती, एकटेच हुशार होऊ नका, इतरांनाही बनवा की!
0 Comments