तुम्हाला कधी हायवेने प्रवास करताना एक गोष्ट जाणवली आहे का, की वाटेत लागणारे मैलाचे दगड म्हणजेच माईल स्टोन हे वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवलेले असतात आता तुम्ही म्हणाल गुगल मॅपच्या जमान्यात मैलाचे दगड कोण पाहणार? पण तसे अजिबात नाही बरं.. जिथे तुमच्या मोबाईलचे नेटवर्क धोका देऊ शकते, बॅटरीही लो होऊ शकते, ती गुगल मॅपवाली बाई क्वचित चुकूही शकते तेव्हा तुम्हाला हे मैलाचे दगडच उपयोगी पडतील. त्यामुळे पुढील सर्व माहिती लक्षपूर्वक वाचा.

आता भारतातल्या रस्त्यांबाबत सांगायचे झाले तर आपल्या देशात एकूण ५८ लाख ९८ किलोमिटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे. ज्यामध्ये ग्रामीण रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, राजमार्ग त्याचबरोबर एक्सप्रेस रस्त्यांचा समावेश आहे. या सगळ्या रस्त्यांवरच ठराविक अंतरावर मैलाचे दगड दिसतात. मात्र या दगडांचा रंग मात्र वेगवेगळा असतो असे का बरे असावे?
सर्वात आधी हे जाणून घ्या की हे दगड चार रंगामध्येच म्हणजेच नारंगी (Orange) पांढरा दगड, पिवळा (Yellow) पांढरा, काळा/निळा पांढरा आणि हिरवा पांढरा अशा रंगात रंगविलेले असतात. हा प्रत्येक रंग आपल्याला मार्गदर्शन करतो.
नारंगी-पांढरा मैलाचा दगड :

अनेकदा प्रवासाच्या दरम्यान तुम्ही रस्त्याच्या किनाऱ्याला नारंगी-पांढऱ्या रंगात रंगवलेले मैलाचे दगड पाहिले असतीलच. हे दगड ज्या रस्त्यावर तुम्हाला दिसतील, तो रस्ता हा ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजने’ अंतर्गत येतो. याचाच अर्थ असा की तो महामार्ग कोणत्या तरी गावाला जोडला गेला आहे. म्हणजेच तुम्हाला काही मदत हवी असल्यास जवळच गाव आहे.
हिरवा-पांढरा मैलाचा दगड :

रस्त्याच्या किनाऱ्यावर हिरवा-पांढरा दगड दिसला तर समजून जा, की तुम्ही राज्य महामार्गावरुन प्रवास करित आहात. या रस्त्याची देखरेख करण्याची जबाबदारी ही संपूर्णतः राज्य सरकारची असते.
निळा/काळा–पांढरा मैलाचा दगड :

प्रवासादरम्यान तुम्हाला निळा- पांढरा किंवा काळा पांढरा रंगाचा दगड जेव्हा दिसतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही एखाद्या मोठ्या शहराच्या जवळ आहात. हा रस्ता संबंधीत शहराच्या जिल्ह्यांतर्गत असतो.
तर मित्र-मैत्रिणींनो तुम्हाला या मैलाच्या दगडांच्या रंगाचे गुपित तर कळाले असेलच. त्याचबरोबर प्रवासात लागणारे हे मैलाचे दगड किती मोलाचे आहेत हेही तुम्हाला पटले असेल. कारण महामार्गावर प्रवासात काही अडचण आली तर जवळ कुठे मदत मिळेल याचा अचूक अंदाज या मैलाच्या दगडांमुळे आपल्याला घेता येईल. तेही कुठल्याही मोबाईल किंवा गॅजेटशिवाय…!
0 Comments