प्रत्येक न्यूजपेपरवर हे 4 रंगीत ठिपके दिसतात, काय आहे त्यामागचं रहस्य?

तुम्हाला माहीतच असेल की आपल्याकडल्या प्रिंटिंग प्रेस या रात्री काम करत असतात आणि वर्तमानपत्र छापत असतात.


लहानपणापासून आपण वर्तमानपत्र बघत आलो आहोत. आताच्या काळात ह्या वर्तमानपत्राची जागा सोशल मिडीयाने घेतली आहे. पण वर्तमानपत्र घेऊन सकाळी सकाळी चहाचे घोट घेत पेपर वाचत बसणे याहून मोठा आनंद कुठलाच नाही.

भारतात पहिलं वर्तमानपत्र हे सन १७८० मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यांनी हिकीज् बेंगॉल गॅझेट या नावाने छापले. तेव्हापासून भारतात वर्तमानपत्रांची परंपरा सुरु झाली जी आजतागायत सुरु आहे. वर्तमानपत्र आपल्याला सकाळी सकाळी वेगवेगळ्या बातम्या पुरवतं. खरं सांगायचं झालं तर सकाळी जर का वर्तमानपत्र वाचलं नाही तर दिवस सुरू झाला आहे असं वाटतच नाही.

कोरोना महामारीत वर्तमान पत्र वाचण्याची सवय थोडी मोडली होती पण आता जसजसं आयुष्य पूर्ववत होऊ लागलंय त्याचप्रमाणे वर्तमानपत्र सुद्धा आपल्या आयुष्यात परत आलं आहे. ही गोष्ट खूप चांगली घडली आहे की परत आपल्याला वर्तमानपत्र वाचायला मिळत आहेत. आपण सगळेच अगदी वर्तमानपत्रातली बातमी न् बातमी वाचतो पण कधी हा विचार केला आहे का की वर्तमानपत्राच्या काही पानांवर पानाच्या शेवटी चार रंगीबिरंगी ठिपके दिसतात. हे ठिपके दररोज असेच छापून आलेले दिसतात. हे ठिपके नक्की का छापले जातात आणि त्यांचा नेमका अर्थ काय? चला तर मग ही माहिती आज जाणून घेऊया.

वर्तमान पत्रावरील हे चार रंगीत ठिपके प्रिंटिंगशी निगडीत आहेत. हे चार रंगीत ठिपके आपल्याला सांगतात की वर्तमानपत्र कुठल्या प्रिंटिंगमधून छापलं गेलं आहे.

वर्तमानपत्राच्या प्रिंटिंगला CMYK प्रिंटिंग म्हणतात. CMYK मधील C म्हणजे सीयान हा रंग आहे. M म्हणजे मजेंटा. Y म्हणजे पिवळा (yellow) आणि बी म्हणजे ब्लॅक. कुठलेही चित्र जर का वर्तमानपत्रात छापायचं असेल तर ह्या रंगाच्या प्लेट्स एक एक करून एका पानावर ठेवल्या जातात आणि मग हे चित्र वर्तमानपत्रावर छापलं जातं. जर का छपाईच्या वेळेला चित्र फिकट छापली जात असतील तर ह्याचा अर्थ असा आहे की या चारी रंगाच्या प्लेट्स बरोबर लागल्या गेल्या नाहीयेत. म्हणूनच CMYK च्या प्रिंटिंग ला Registration Marks or Printers Marker असं म्हणतात.

या प्रकारचं प्रिंटिंग फक्त वर्तमानपत्रातच केलं जात नाही तर अशाप्रकारे पुस्तकही छापतात. पण जेव्हा वर्तमानपत्राची पाने कापली जातात तेव्हा या प्लेट्स काढून टाकल्या जातात.

CMYK प्रिंटिंग प्रक्रियेची वैशिष्ट्ये जाणून घेऊया. चार रंगाची ही प्रिंटिंग प्रक्रिया अतिशय स्वस्त असते आणि मोठ्या प्रमाणावर अशाप्रकारे प्रिंटिंग केले जाऊ शकते. टोनर आधारित प्रिंटिंग किंवा डिजिटल प्रिंटिंग पेक्षा हे खूप स्वस्त प्रिंटिंग आहे.

CMYK प्रिंटर्स ह्याचा आकडाही देऊ शकतात की किती प्रिंटिंग या प्रिंटर्सद्वारे झालं आहे. रोज किती वर्तमानपत्र छापली गेली आहेत हे या प्रकारच्या प्रिंटिंग मधून आपल्याला सहज कळू शकतं. हे चार ठिपके प्रिंटरचे मार्कर्स म्हणून काम करतात. त्यामुळे प्रिंटिंग प्रेस सारख्या ठिकाणी जिथे भरपूर प्रमाणावर काही छापायचं असतं उदाहरणार्थ वर्तमानपत्र, तेव्हा CMYK प्रिंटिंग करणच योग्य आहे.

आता जेव्हा जेव्हा तुम्ही कुठलेही वर्तमानपत्र बघाल तेव्हा तुम्हाला हे चार रंगीत ठिपके दिसतील आणि त्यांचा अर्थही कळेल. CMYK प्रिंटिंग पहिलं १९०६साली ‘Eagle Printing Ink Company’ ने ओले रंग वापरून करून पाहिलं. या प्रिंटिंग द्वारे त्यांना असा शोध लागला की हे चार रंग वापरून ते कुठल्याही प्रकारचे चित्र अगदी तसेच प्रिंट करू शकतात. भारतातील प्रिंटिंग प्रेस म्हणूनच या पद्धतीने प्रिंटिंग करतात आणि मोठ्या प्रमाणावर वर्तमानपत्र छापून आणू शकतात.

Source : timesnows.com

तुम्हाला माहीतच असेल की आपल्याकडल्या प्रिंटिंग प्रेस या रात्री काम करत असतात आणि वर्तमानपत्र छापत असतात. आयत्या वेळेला एखादी गोष्ट छापायची असेल तर प्रिंटिंग थांबवली जाते आणि ती गोष्ट पूर्णपणे लिहून मग छापायला सुरुवात करतात.

वर्तमानपत्रा वरील अशा चार रंगीत ठिपक्यांची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि हा लेख सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *