अनेकांवर नजर ठेवण्यासाठी मोदींनी सॉफ्टवेअर खरेदी केले? काय आहे खरी कहाणी?

केंद्रातील मोदी सरकारने आपलेच काही मंत्री, विरोधी नेते, उच्च पदस्थ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार एवढेच नाही तर उद्योगपतींचे फोन टॅप केले असा आरोप करण्यात आला.


नरेंद्र मोदी सरकारवर आजवर अनेक आरोप झाले, पण त्या सर्व आरोपांपैकी सर्वात धक्कादायक आरोप होता आपल्याच देशातील काही महत्त्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवल्याचा! Pegasus नावाचे एक Spyware वापरून केंद्रातील मोदी सरकारने आपलेच काही मंत्री, विरोधी नेते, उच्च पदस्थ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वकील, पत्रकार एवढेच नाही तर उद्योगपतींचे फोन टॅप केले असा आरोप करण्यात आला.

Source : ifex.org

हा आरोप भारतीय मीडियाकडून झाला नाही तर जागतिक पातळीवरील प्रतिष्ठीत वॉशिंग्टन पोस्ट मधून पहिल्यांदा ही बातमी समोर आली. त्यामुळे या आरोपाला ग्लोबल कव्हरेज मिळाले. भारताची प्रतिमा सुद्धा यामुळे मलीन झाली हे वेगळ्याने सांगायला नको. ते आरोप किती खरे किती खोटे याचा शोध लावणारे महान लोक या जगात आहेत, त्यामुळे आपण त्यात न पडता हे Pegasus Spyware नावाचं प्रकरण नेमकं काय आहे? ते जाणून घेणार आहोत.

Pegasus Spyware चा जन्मदाता आहे इस्रायलचा NSO ग्रुप!  Pegasus हे नाव दिलं गेलं आहे ग्रीक दंतकथांमधील  Pegasus नावाच्या एका उडणाऱ्या घोड्यावरून!  Pegasus Spyware सुद्धा असंच अदृश्यपणे उडत जाऊन मोबाईल्स मध्ये स्थिरावतं ही त्यामागच्या आयडीयाची कल्पना! बरं तर कंपनीचं असं म्हणणं आहे की दहशतवाद्यांवर पाळत ठेवण्यासाठी त्यांनी हे tool बनवलं. यामुळे दहशतवाद्यांच्या एक पाउल पुढे राहून त्यांचे प्लॅन रोखणे शक्य होईल.

 हे Spyware ज्या फोनमध्ये seed केलं असेल त्या फोनची सगळी माहिती एवढचं नाही तर त्या फोन वरून कोणाला फोन केले गेले, काय बोलणं झाल? किती वेळ बोलणं झालं? काय मेसेज पाठवला? या शिवाय अन्य अॅक्टीव्हीटीज सुद्धा ट्रॅक करता येतात. आता तुम्ही म्हणाल कोणत्याही  Spyware मधून या गोष्टी access होतात त्यात काय नवल? पण मंडळी  Pegasus Spyware चं एक वैशिष्ट्य म्हणजे हे Spyware मायक्रोफोन आणि कॅमेराचा access सुद्धा मिळवतं आणि मायक्रोफोन व कॅमेरा नेहमी active राहतो. यामुळे हॅकर मायक्रोफोनचा वापर करून तुम्ही इतरांशी काय बोलता किंवा कॅमेराचा वापर करून तुम्ही काय करताय याची माहिती सुद्धा मिळवू शकतो.

जरी  कंपनीचं म्हणणं असलं की त्यांनी हे tool दहशतवादा विरोधात लढण्यासाठी बनवलं आहे तरी कोणा चुकीच्या हाती लागलं तर तो त्याचा वापर सामान्य व्यक्तींवर सुद्धा करू शकतो आणि म्हणूनच Pegasus Spyware हे privacy च्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानलं जातं. Pegasus Spyware ची जगाला ओळख अगदी ४ ते ५ वर्षांपूर्वीच झाली आहे. व्हॉट्सअप वरून काही खास मेसेज लिंक सह targeted व्यक्तीला पाठवल्या जातात आणि जेव्हा तो व्यक्ती त्या links ओपन करतो तेव्हा Pegasus Spyware त्याच्या फोनमध्ये seed होतं.

Whatsapp च्या जेव्हा ही गोष्ट लक्षात आली की Pegasus Spyware त्यांचे encrypoted message सुद्धा वाचू शकतं तेव्हा मात्र त्यांनी धोक्याची घंटा दिली. २०१९ मध्ये Whatsapp ने सुद्धा आरोप केला होता की भारतातील अनेक लोकांचे फोन्स Pegasus Spyware ने टॅप केले गेले आहेत. तेव्हा त्यांनी आपल्या ग्राहकांना कोणत्याही unknown link वर क्लिक न करण्याचे आवाहन केले होते.

Pegasus Spyware हे आजवरचे सर्वात बेस्ट पण तितकेच धोकादायक Spyware असल्याचे जाणकार सांगतात कारण हे Spyware Apple फोन्सना सुद्धा हॅक करू शकतं आणि  Pegasus हे फोन मध्ये आहे हे कधीच कळत नाही कारण तशीच त्याची रचना आहे.

आपण यातून एकच धडा घेऊ शकतो की मोबाईल फोनचा मर्यादित वापर करायचा आणि काहीही unknown व संशयास्पद गोष्ट मोबाईल मध्ये दिसली की त्यातून लांबच राहायचं, कारण त्यातच आपलं भलं आहे!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

Shraddha More