या करोनाने मुलांच्या शिक्षणाची अगदी वाट लावली आहे. मुलांनी गेली २ वर्ष शाळेचं तोंडही पाहिलं नाही. ज्या मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक स्क्रिन पासून मुलांना लांब ठेवायला हवं. तिथेच त्यांची शाळा भरु लागली. आपल्या देशात याआधी होम एज्युकेशनची संकल्पना रुजली नव्हती. पण तरीही बाय जू सारख्या कंपनींच्या जाहिराती आपण टीव्हीवर पाहू लागलो होतो. कोरोना महामारी बायजूजच्या पथ्यावरच पडली.
2009 मध्ये बायजू रविंद्रन यांनी CAT परिक्षेसाठी ऑनलाईन वर्ग घेणे सुरू केले. २०११ मध्ये यांचा बिझनेस वाढला आणि त्यांनी ‘थिंक ऍन्ड लर्न’ नावाने कंपनी रजिस्टर्ड केली. बरोबर त्यानंतर चार वर्षांनी २०१५ मध्ये त्यांनी बायजूस लर्निंन ऍप सुरू केले. साधारणतः कोणतेही ऍप सुरू केल्यानंतर मार्केटमध्ये त्याचे युजर्स वाढायला काही कालावधी जातोच. मात्र अवघ्या ३ महिन्यात बायजूजकडे २० लाखांपेक्षा विद्यार्थी होते. आता तुम्हाला वाटेल की ऍपच जबरदस्त असेल म्हणून लोकांनी इतका चांगला प्रतिसाद दिला. तर असं अजिबात नाही. सत्य खुपच विपरित आहे. पण वर वर दिसायला हे भारी वाटत असलं तरी तुम्हाला माहीत आहे का? बायजूज कंपनी म्हणजे मोठ्ठ स्कॅम आहे.
साधारण २०१९ मध्येच या एज्युकेशन टेक्नोलॉजी कंपनीने देशात चौथा क्रमांक पटकावला. फ्लिपकार्ट, पेटीएम आणि ओला या ऍपनंतर बायजूज ही देशातली चौथी मोठी इंटरनेट कंपनी ठरली.
कतार सरकारने बायजूज मध्ये १५ करोड गुंतवले होते. या कंपनीची किंमत ५.२ अब्ज डॉलर इतकी झाली. आजच्या घडीला या कंपनीची किंमत १८ अब्ज डॉलर इतकी आहे. आता प्रश्न असा आहे की तीन वर्षाच्या कालावधीत कंपनीने अशी काय जादू केली की त्यांची मार्केट व्हॅल्यू १८ टक्क्यांनी वाढली?
असं कसं झालं.. बायजूज ही एज्युकेशन टेक्नोलॉजी कंपनीच्या वेशातली मार्केटींग कंपनी आहे. यांचं मार्केटिंग इतकं जबरदस्त आहे त्यांच्या जोरावरच या कंपनीने प्रगतीचे शिखर गाठले आहे. आता तुम्ही विचाराल यात काय वाईट आहे? पण तुम्हीच विचार करा.. खुद्द किंग खान बायजूजचं महत्त्व टिव्हीवर सांगतो. युट्युब किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बायजूजच्या जाहिरातींचा भडीमार असतो. त्यात विद्यार्थीही गुगल बाबांच्या शरणी जाऊन एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधतात, त्यांना गुगलबाबा बायजूजच्याच साईटवर नेऊन सोडतो. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे. सगळ्या ठिकाणी १५ दिवस मोफत ऍप वापरु शकाल हेच आवर्जुन सांगण्यात येतं.
फुकट ते पौष्टीक समजणारी आपली माणसाची जात. पण जगात फुकट काहीही मिळत नाही हे साफ विसरुन जातात आणि यांच्या मार्केटिंगला बळी पडतात. एकदा का तुम्ही हे ऍप फुकटात वापरायला सुरुवात केली, की बायजूजचे एक्झिकेट्युव तुमच्या मुलांवर बारीक लक्ष ठेऊ लागतात. तुमचा मुलगा किती वेळ ऍप वापरतो, त्याला एखादा प्रश्न सोडवायला किती वेळ लागतो? कोणत्या विषयांचा अभ्यास तो जास्त वेळ करतो? ही सगळी माहिती ही मंडळी गोळा करतात. त्यामुलाचं प्रगतीपुस्तक तयार होतं. १५ दिवसांनंतर किंवा दरम्यानच संबंधित मुलाच्या पालकांना फोन जातो.
हे सेल्स एक्झिकेट्युव मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार तीनपैकी एका कॅटेगरीत टाकत असतात. अंडर अचिव्हर, ऍव्हरेज आणि ओव्हर ऍचिव्हर्स या तीन भागात तुमच्या मुलांचे विभाजन होते. जर तुमचा मुलागा अंडर अचिव्हर असेल तर ही मंडळी तुम्हाला अक्षरशः घाबरवतात हो, तेही गोड शब्दात, की तुमचा मुलगा ढ आहे आणि त्याने बायजूजचे क्लासेस घेतले तरच त्याचं भविष्यात काहीतरी होऊ शकतं. नाहीतर काही खरं नाही.
ऍव्हरेज विद्यार्थ्यांच्या पालकांना ओव्हर ऍचिव्हर्सचं पॅकेज ऑफर केलं जातं. तर ओव्हर ऍचिव्हर्स विद्यार्थ्यांसाठी प्रिमिअम कोर्सेस विकतात.
मग काय आपल्या इथल्या पालकांची विचारसरणी जगजाहीर आहे. लोकांनी आपली मुलं शर्यतीतच उतरवलेली असतात. त्यांच्या मुलांकडून अवास्तव अपेक्षा असतात. कोणालाही आपलं मुल नापास झालेलं आवडणार नाही. मुलांनी ऍव्हरेज असणं हा तर गुन्हाच आहे. प्रत्येकालाच आपलं मुल एक्ट्राऑर्डनरी हवं. हीच विचारसरणी बायजूजच्या पथ्यावर पडली. मग या पालकांना जगात वाढणाऱ्या शर्यतीची भीती दाखवत आणि शर्यतीत जिंकायचं असेल तर बायजूज शिवाय काहीच पर्याय नाही हे गळी उतरवत कोर्सेस विकले जातात. ७० टक्के पालक मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई बायजूजला द्यायला तयार होतात. ज्यांची ऐपत नाही त्यांना तर हे सेल्सवाले अजूनच गंडवतात. ते पालकांना इएमआयचे लालूच दाखवतात आणि पालकही मुलांच्या प्रेमापोटी हे कोर्सेस विकत घेतात.
तेव्हा बऱ्याच जणांना माहीतही नसतं की कोर्ससाठी साईन अप करताना त्यांनी लोनसाठी देखील साईनअप केलेले असते. नकळत त्यांनी शिक्षणासाठी कर्ज घेतलं असतं. कारण बायजूजने कॅपीटल फ्लोट, बजाज फायनान्स, बजाज फीनसर्व्ह, कॅश केअर या कंपनींसोबत पार्टनरशीप केली आहे. बायजूजचे सेल्सवाले हे कोर्स विकताना कधीही कर्ज, इनस्टॉलमेंट सारखे शब्द शिताफीने टाळतात. पालकांना फक्त बायजूजने दाखवलेल्या स्वप्नांची भूरळ पडलेली असते. त्यामुळे त्यांना या गोष्टी लक्षातच येत नाहीत.
मुळात बायजूजला त्यांचे कोर्सेस विकून नफा कमविण्यात रस नाहीच. त्यांचा इंटरेस्ट काही वेगळाच आहे. लोकांना त्यांच्या बायजूज वर्ल्डमध्ये सामावून घ्यायचं हाच त्यांचा मुख्य हेतू. आता तुम्ही म्हणाल हे बायजूज वर्ल्ड म्हणजे काय भानगड आहे. हेच बघा अत्तापर्यंत बायजूजने १४ एज्युकेशन कंपनी विकत घेतल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय? खरतर मेख याच्यातच आहे. आता मुलं शालेय शिक्षण संपवून जेव्हा मोठी होतील आणि एखाद्याला जर डॉक्टर व्हायचं असेल तर बायजूज लागलीच त्या विद्यार्थ्याला आकाश मेडीकल इस्टिट्युटमध्ये प्रवेश घ्यायला लावेल. ही संस्था बायजूजच्याच मालकीची आहे. एखाद्याला कोडींग शिकायचे असेल तर लागलीच त्यांच्या मालकीच्या हॅशलर्न किंवा व्हाईट हॅट ज्युनिअरचा पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवला जाईल. मुलांना शिकताना काही अडचणी येत असतील तर लागलीच त्यांच्याच मालकीच्या टॉपर किंवा ग्रेट लर्निंगचा वापर करा. एकूणच काय ते मुल बायजूजच्याच माध्यमात शिकून मोठा होईल. बायजूज पेक्षा वेगळं आणि चांगलं काही असू शकतं याचा विचारही त्याच्यामनात येणार नाही. परिणामी भविष्यात त्याला स्वतःला जेव्हा मुलं होतील तेव्हा तोही आपल्या मुलाला बायजूजच्याच ताब्यात देईल.
गुरुशिष्य परंपरा असलेल्या आपल्या देशातले विद्यार्थी जर या टेक्नोलॉजीच्या मार्गावर गेले तर त्यांच्या बुध्दीमत्तेवर विपरित परिणाम होईल. या ऍपच्या माध्यमातून सगळीच उत्तरं आयती मिळायला लागली तर त्यांची विचार करण्याची क्षमताही कमी होईल. भविष्यात पुढे जायचं असेत तर तुम्ही कंप्युटरमध्ये फक्त स्मार्ट असून उपयोग नाही तर तुमच्यात कौशल्य असणंही तितकेच महत्त्वाचे आहे.
0 Comments