‘ह्या’ गोष्टीमुळे Micro USB ऐवजी कंपन्यांनी USB Type C चार्जर देण्यास सुरुवात केली!

तुम्हाला माहित असायला हवी कि जेव्हा तुम्ही नवीन फोन खरेदी कराल तेव्हा त्यात तुम्हाला मिळत असलेला टाईप सी युएसबी हा 2.0 पेक्षा जास्त व्हर्जनचाच असला पाहिजे.


मोबाईलचा ऑक्सिजन म्हणजे चार्जर, हा चार्जर नसेल तर मेलेल्या मोबाईलचे प्राण तुम्ही परत आणू शकत नाही.अनेकदा असं होतं की आपण चार्जर विसरतो किंवा आपल्या जवळ चार्जरच नसतो वा तो चालत नसतो. मग अशावेळी मोबाईलसाठी चार्जरची शोधाशोध सुरु होते. पण खरी पंचाईत तर तेव्हा होते जेव्हा आपल्याला चार्जर मिळतो पण तो आपल्या मोबाईलला लागत नसतो.

म्हणजे तुमचा मोबाईल जर टाईप सी चार्जरचा असेल तर मायक्रो युएसबी चार्जर तुम्हाला कामाचा नाही, तर या उलट जर तुमचा मोबाईल मायक्रो युएसबी चार्जरचा असेल आणि तुम्हाला कोणीसी टाईप चार्जर देऊ केला तर त्याचा तुम्हाला उपयोग नाही.

मग अशावेळी असे दोन दोन चार्जर तयार करणाऱ्याबद्दल चीड येणे साहजिक आहे. पण कधी विचार केलाय कि काय गरज या दोन वेगवेगळ्या प्रकारांची आणि त्यांच्यात फरक आहे तरी काय? चला आज जाणून घेऊया.

अगदी २ वर्षांपूर्वीही बहुतांश मोबाईल हे मायक्रो युएसबी चार्जरचे असायचे आणि त्यामुळे अशी चार्जरची पंचाईत जास्त व्हायची नाही. पण हळूहळू टाईप सी चार्जरचे फोन येऊ लागले आणि आता अशा फोन्सची संख्या जास्त झाली आहे व मायक्रो युएसबी मागे पडत चालला आहे.

या दोन युएसबी मधील फरक असा की मायक्रो युएसबी तुम्ही एकाच बाजूने प्लग करू शकता तर टाईप सी युएसबी तुम्ही दोन्ही बाजूने प्लग करू शकता. विश्वास नसेल बसत तर आताच करून पहा. यामुळेच पहिल्याच वेळेत आपण जसा टाईप सी युएसबी घालू तसा तो प्लग होतो. तुम्ही कोणत्या बाजूने तो प्लग करताय ते पाहण्याची गरज नसते.

हा झाला पहिला फरक आणि फायदा टाईप सी युएसबी असण्याचा! पण यशिवाय सुद्धा खूप फायदे आहेत. जसे कि तुम्ही टाईप सी युएसबी केबलने तुमच्या ऑडियो आणि व्हिडियो दोन्ही डिव्हाईसला कनेक्ट करू शकता. वन प्लस सिक्स मोबाईल कोणाकडे असेल तर तुम्ही त्यात ही गोष्ट पाहू शकता.

आता तर कित्येक लॅपटॉप मध्ये सुद्धा टाईप सी युएसबी येत आहे यामुळे तुम्हाला वेगळ्या एचडीएमआय केबलची गरज नाही. एकच टाईप सी युएसबी केबल तुम्ही सगळीकडे वापरू शकता. आता तुमच्याही लक्षात आले असेल की टाईप सी युएसबीचा मुख्य उद्देश हा आहे की तुम्हाला वेगवगेळ्या केबल्स घेऊन फिरण्याची गरज नाही. एकाच टाईप सी युएसबीचा वापर तुम्ही सगळीकडे करू शकता.

Source : 5.imimg.com

मायक्रो युएसबी केवळ ६० वॅट एवढीच उर्जा सप्लाय करतो पण टाईप सी युएसबी १०० वॅट पर्यंतची उर्जा सप्लाय करू शकतो. साहजिक यामुळे तुमच्या फोनची चार्जिंग अधिक फास्ट होते. फोन चार्जिंग स्पीड शिवाय टाईप सी युएसबी वापरल्याने डेटा ट्रान्स्फर स्पीड सुद्धा खुप जास्त मिळते.

तर मंडळी आता तुम्हालाही वाटायला लागले असेल ना की मायक्रो युएसबी काहीच कामाचा नाही म्हणून! पण थांबा इथे अजून एक गोष्ट तुम्हाला माहित असायला हवी कि जेव्हा तुम्ही नवीन फोन खरेदी कराल तेव्हा त्यात तुम्हाला मिळत असलेला टाईप सी युएसबी हा 2.0 पेक्षा जास्त व्हर्जनचाच असला पाहिजे कारण तो जास्त व्हर्जनचा नसेल तर तुम्हाला स्पीड ही मायक्रो युएसबी एवढीच मिळेल. त्यामुळे आता जेव्हा कधी फोन खरेदी कराल तेव्हा टाईप सी युएसबीचे व्हर्जन 3.0 किंवा 3.2 पर्यंत निवडा.

पुढे काही दिवसांत अजून  टाईप सी अपग्रेड होत राहिलं. त्यामुळे आता टाईप सी युएसबी वापरून त्याचाच वापर करा कारण तेच भविष्य आहे!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal