प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येथे जेव्हा डोळ्यांची दृष्टी कमी होते. कधी काळी अगदी स्पष्ट दिसणारं दूरचं वा जवळचं दृश्य अंधुक दिसू लागतं आणि अशावेळी मदत घ्यावी लागते डोळ्यांच्या डॉक्टरांची! एव्हाना आपण ज्यांना ज्यांना आपल्या या समस्येबद्दल सांगितलेलं असतं ते सगळे एकच म्हणत असतात की, “तुझ्या डोळ्यांचा नंबर वाढला आहे, आता तुला चष्मा लावावा लागणार.” मग आपण डॉक्टर कडे जातो. डॉक्टर काही बेसिक चेकअप करतात आणि मग सांगतात, “तुझा नंबर अमुक-अमुक आहे. तुला नेहमी चष्मा लावणं भाग आहे, नाहीतर नंबर जास्त वाढेल.”
पण डोळ्यांचा व चष्म्याचा नंबर म्हणजे नेमका काय प्रकार आहे? हे तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही म्हणताय, चला तर आज ही थोडीशी सायन्टीफिक पण रंजक माहिती जाणून घेऊया.
जेव्हा आपल्याला डॉक्टर चेकअप झाल्यावर प्रिस्क्रिप्शन देतात तेव्हा त्यात OD, OS, OU, SPH आणि CYL हे शब्द असतात. ह्या सांकेतिक शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित असतील तर तुम्ही स्वत: सुद्धा ह्या प्रिस्क्रिप्शनचा अर्थ उलगडू शकता.
तर OD म्हणजे ऑक्यूलस डेक्सटर, OS म्हणजे ऑक्यूलस सिनिस्टर आणि OU म्हणजे ऑक्युलस युटरक्यू होय. हे शब्द लॅटीन भाषेतील असून ऑक्यूलस डेक्सटरचा अर्थ आहे उजवा डोळा, ऑक्यूलस सिनिस्टरचा अर्थ आहे डावा डोळा आणि ऑक्युलस युटरक्यूचा अर्थ आहे दोन्ही डोळे!
पण अनेक प्रिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला RE आणि LE हे शब्द सुद्धा दिसू शकतात. हे शब्द म्हणजे OD आणि OS साठी पर्यायी असून RE म्हणजे राईट आय अर्थात उजवा डोळा आणि LE म्हणजे लेफ्ट आय अर्थात डावा डोळा! काही वर्षांपूर्वी डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना पहिले उजव्या डोळ्याचे द्यायचे आणि मग डाव्या डोळ्याचे द्यायचे. हे यामुळे कारण डॉक्टर डोळा तपासताना नेहमीच पहिला उजवा डोळा तपासतात आणि मग डावा, पण आता एकाचवेळी दोन्ही डोळ्यांचे प्रिस्क्रिप्शन उपलब्ध होतात.
SPH चा फुल फॉर्म आहे स्फियर डायोप्टर्स! यात एक संख्या असते आणि सोबत चिन्हे दिसतात एक म्हणजे + आणि दुसरे – असते. जर तुमच्या प्रिस्क्रिप्शन मध्ये कोणत्याही संख्ये सोबत + हे चिन्ह असेल तर याचा अर्थ तुम्हाला दूरवरचे दिसण्यास समस्या आहे आणि हेच चिन्ह जर – असेल तर तुम्हाला जवळचे दिसण्यास समस्या आहे.
CYL चा फुल फॉर्म आहे सिलेंडरकल एस्टीग्मेटिज्म! जर या कॉलम मध्ये काहीच नसेल तर याचा अर्थ असा की तुम्हाला दृष्टी संदर्भात कोणतीही समस्या नाही आणि तुम्हाला चष्मा लावण्याची गरज नाही. मात्र जर यात SPH म्हणजे कोणत्याही एका संख्येसोबत + किंवा – चिन्ह असेल तर त्यानुसार तुम्हाला चष्मा लावण्याची गरज असते.
याशिवाय p.d. नावाचा अजून एक शब्द प्रिस्क्रिप्शन मध्ये आढळतो. ज्याला प्रीझ्म पावर म्हणतात. चष्मा तयार करताना त्यातून अधिक क्लियर व्हिजन दिसावे म्हणून प्रीझ्म पावर वाढवली जाते.
अजूनही कळलं नसेल तर डोन्ट वरी आपण एक सोप्प्या उदाहरणासह हे जाणून घेऊ. समजा रमेशला काही दिवसांपासून दूरचं पाहण्यास त्रास होऊ लागला होता. त्याला दूरचे शब्द नीट वाचता यायचे नाही. तो डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरांनी चेकअप करून त्याला प्रिस्क्रिप्शन दिले. ते प्रिस्क्रिप्शन पुढील प्रमाणे होते –
OD -2.00 D SPH +2.00 add 0.5 p.d.
OS -1.00 D -0.50 D Cyl x 180 +2.00 add 0.5 p.d.
यात OD म्हणजे उजव्या डोळ्यासाठी डॉक्टरांनी SPH हा -2.00 सांगितला आहे. पण यात CYL नंबर नाही. याचा अर्थ दृष्टीची जास्त समस्या या डोळ्याला नाही. त्यामुळे या डोळ्याच्या सुधारणेची गरज डॉक्टरांना वाटत नाही. OS म्हणजे डाव्या डोळ्यासाठी डॉक्टरांनी SPH हा -1.00 सांगितला आहे व CYL -0.50 पर्यंत निर्धारित केला आहे. याचा अर्थ या डोळ्यासाठी चष्म्याची गरज आहे. म्हणून डॉक्टरांनी चष्म्याचा नंबर दोन्ही डोळ्यांकरता +2.00 दिला असून त्यात 0.5 p.d. वाढवला जाईल. यामुळे जे स्पष्ट दिसत नाहीये ते स्पष्ट दिसू लागेल. तर एकंदर + ए चिन्ह चष्म्याच्या नंबर मध्ये आहे म्हणजे रमेशला दूरचा चष्मा लागला आहे आणि यामुळे त्याला जे लांबचं स्पष्ट दिसत नाही ते दिसण्यास मदत होईल.
बघा आहे की नाही सोप्पं! पण हो हे फक्त स्वत:च्या नॉलेज पुरतंच ठेवा आणि सल्ला मात्र डॉक्टरांचाच घ्या.
0 Comments