कोंबडी आधी की अंड? शेवटी उत्तर सापडलंच!

अनेक शास्त्रज्ञांनी तर्क ही लावले की जगात पहिल्यांदा अंडेच आले असावे. पण.....


जगातला सर्वात जास्त डोकं चक्रावणारा प्रश्न म्हणजे आधी कोंबडी आली का तिचं अंड ? अगदी बुध्दीजीवी लोकांसह लहान मोठया साऱ्यांनाच हा प्रश्न कायम छळत राहिला. अगदी आजही तुम्ही कोणालाही हा प्रश्न विचारा.. नेमकं असं उत्तर कोणालाच देता येत नाही हो. बरं उत्तर मिळत नाही तर त्याच्या मुळाशी जाऊन शोध घ्यायचा हेच तर आपल्या माणसांचे वैशिष्ट्य नाही का? त्यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी शोध लावण्याचा प्रयत्नही केला.

अनेक शास्त्रज्ञांनी तर्क ही लावले की जगात पहिल्यांदा अंडेच आले असावे. कारण जेव्हा जीवसृष्टी निर्माण झाली तेव्हा सस्तन प्राणी नव्हतेच. डायनासॉरसारख्या अजस्त्र प्राण्यांचा जन्मही अंड्यातूनच झाला.

शास्त्रज्ञांच्या मते ५०० ​​दशलक्ष वर्षांपूर्वी कॅम्ब्रिअन कालखंडात उबदार उथळ समुद्रात पोहणारी विचित्र अशा राक्षसरुपी जीव अस्तित्वात होते. हे जीवही अंडीच घालत असे. तर एकूणच हे दाखले पाहता अंडेच आधी आले असावे असा तर्क लावला जात होता. पण तरिही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो की या अंड्याची उत्पत्ती कशी झाली असावी?

तुम्ही हॅरी पॉटर पाहिलाच असेल त्यामध्येही हॅरी पॉटरमधल्या लुना लव्हगुडला चेटकीणीने हेच कोडे विचारले असता तिने उत्तर दिले होते की, कोणत्याही वर्तुळाची सुरुवात होत नाही वा त्याला अंत नसतो. त्यामुळे वास्तवात असे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे होय. तर  सांगायचा मुद्दा हाच आहे की एकूणच काहीजण हे असे उत्तर देऊन कोंबडी आधी की अंड या प्रश्नाला बगल देतात.  पण सगळेच लोक असे करत नाही बऱ्याच लोकांना कायम हा प्रश्न भेडसावत राहतो.

Source : thehappychickencoop.com

प्रश्न पडणं हा मानवी स्वभाव आणि त्याची उत्तरं शोधणं ही त्याची वृत्ती. याच कारणाने अखेर या प्रश्नाचे उत्तर शास्त्रज्ञांना सापडलेच. काय म्हणता तुमचा अजूनही या गोष्टीवर विश्वास नाही बसत? अहो खरंच ही काही गंमत नाही.. खरंच कोंबडी आधी आली की अंड याचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.

उत्तर ब्रिटनच्या, शेफील्ड आणि वारनिक विद्यापीठाच्या प्राध्यपकांच्या महत् प्रयत्नांनी हे उत्तर गवसले आणि यक्ष प्रश्न ठरलेल्या या प्रश्नाचे उत्तर सापडले. कोंबडी आधी की अंडे या प्रश्नाचे उत्तर शोधणे तसे कठीण होते त्यासाठी अनेक वर्षे संशोधन केलं गेलं. संशोधना अंती शास्त्रज्ञांना समजले की आधी कोंबडीच या जगात अवतरली. त्यामागचे शास्त्रीय स्पष्टीकरणही या संशोधकांनी सांगितले आहे.

या संशोधनानुसार कोंबडीशिवाय अंड्यांची निर्मिती होऊच शकत नाही. कारण अंड्यांच्या कवचामध्ये ओवोक्लाईडिन नावाचं प्रोटिन असतं. त्या प्रोटिन शिवाय अंड तयार होऊच शकत नाही. मुख्य म्हणजे हे प्रोटिन फक्त आणि फक्त कोंबडीच्या गर्भाशयातच तयार होतंय. त्यामुळेच कोंबडीच्या गर्भाशयातील प्रोटिनशिवाय अंडे तयार होऊच शकत नाही आणि म्हणूनच जगात कोंबडी आधी आली आणि मग नंतर अंडे आले हे स्पष्ट झाले.

“‘जगात आधी कोंबडी आली. त्यानंतर तिच्या गर्भाशयात ओवोक्लाईडिन तयार झालं. हे प्रोटिन नंतर अंड्याच्या कवचात पोहोचलं. जगात आधी कोंबडी आली की अंड या प्रश्नाचे उत्तर कोट्यावधी लोकांना पडला होता. आम्ही केलेल्या संशोधनात या प्रश्नाचे उत्तर मिळालं आणि त्यामागील शास्त्रीय कारण शोधण्यात आम्हाला यश मिळालं” असं संशोधनातल्या शास्त्रज्ञांपैकी प्रमुख शास्त्रर् डॉ.कॉलिन फ्रिमॅन यांनी सांगितलं.  

चला तर मग या संशोधनामुळे जगभरातील लोकांना पडलेला एका मोठ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर….!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *