काही रेल्वे स्टेशनच्या नावामागे जंक्शन तर काहींच्या मागे टर्मिनस व सेंट्रल असते, असे का?

अशा या भारतीय रेल्वेमध्ये कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला सामान्य वाटतात पण त्या मागे रंजक लॉजिक आहे!


रेल्वे हा आपल्या प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय! लाख ट्रान्सपोर्ट पर्याय येतील आणि जातील पण भारतीय रेल्वेचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. आजही ७०% भारतीय माणूस हा कुठेही लांबच्या प्रवासाला जायचे असेल तर सर्वात आधी तिकडे जवळपास रेल्वे स्टेशन आहे का आणि ट्रेन जाते का ते तपासतो. इतकी आपल्याला रेल्वेची सवय जडलेली आहे.

Source : tnhglobal.com

तर अशा या भारतीय रेल्वेमध्ये कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला सामान्य वाटतात पण त्या मागे रंजक लॉजिक आहे! जसे की ट्रेनच्या वर असणारे नंबर्स म्हणा किंवा रेल्वे रुळाच्या बाजूला असलेले दगड म्हणा, प्रत्येक गोष्टी मागे एक लॉजिक लपलेले आहे. तसेच एक लॉजिक आहे रेल्वे स्टेशनच्या नावांमागे!

भारतात विविध प्रकारची रेल्वे स्टेशन्स आपल्याला दिसतात. एक असते रेल्वे स्थानक जिथे सहसा लोकल रेल्वे थांबतात जसे की मुंबईतले कोणतेही लोकल रेल्वेचे स्थान घ्या. पण जेव्हा गोष्ट भारतीय रेल्वेची येते तेव्हा त्यात तीन मुख्य प्रकार पडतात. एक असते जंक्शन दुसरे असते टर्मिनस आणि तिसरे म्हणजे सेंट्रल! आज आपण या तीन प्रकारांमधील नेमका फरक काय ते समजून घेऊया.

सर्वात पहिला प्रकार म्हणजे जंक्शन होय. जंक्शन हे ते स्थानक असते जेथून दोन किंवा दोन पेक्षा जास्त ट्रेन्सचे रूट निघतात. म्हणजे येथून दोन किंवा दोन पेक्षा जास्त ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळे ट्रॅक सुरु होतात. अधिक सोप्प्या भाषेत समजुन घेण्यासाठी अपन दिवा जंक्शनचे उदाहरण घेऊया. दिवा जंक्शन वरून तीन रुट्स निघतात. एक रूट जातो पनवेलच्या दिशेने तेथून पुढे कोकण रेल्वे सुरु होते. दुसरा रूट सुरु होतो वसईच्या दिशेने जाणारा आणि तिसरा रूट तर आहेच जो कल्याणच्या दिशेने जातो.

दुसरा प्रकार म्हणजे टर्मिनस होय. टर्मिनस त्या स्टेशन्सना म्हणतात जेथून पुढे कोणतीही रेल्वे लाईन जात नाही. अगदी साधे सोप्पे उदाहरण घ्यायचे तर मुंबई मधील सर्वात प्रमुख स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होय. हे मुंबईच्या दक्षिणेचे शेवटचे स्टेशन होय. यापुढे एकही रेल्वे जात नाही.

तिसरा प्रकार म्हणजे सेंट्रल होय. सेंट्रल त्या स्टेशनला म्हटले जाते जे स्टेशन शहरामधील सर्वात जुन्या स्टेशन पैकी एक असते आणि रेल्वे लाईन वरचे मुख्य केंद्र असते. या स्टेशन वर सर्वात जास्त सोयी सुविधा असतात. सर्वाधिक रेल्वे सुद्धा या स्टेशनवर थांबतात. देशातील मुख्य राज्यांना जोडणाऱ्या रेल्वे सहसा याच स्टेशन वरून रवाना होतात. असे मुंबईमधील एकमेव स्टेशन म्हणजे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल होय.

भारतीय रेल्वे बाबत अशी अजून रंजक माहिती आम्ही घेऊन येऊ. तोवर ही माहिती इतरांसोबत शेअर करा आणि त्यांनी हुशार बनवा की!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal