एका रात्रीत श्रीमंत व्हायला कोणाला आवडणार नाही? प्रत्येकाचे स्वप्न असते की एवढा पैसा मिळावा की कितीही खर्च केला तरी संपू नये. पण तेवढा पैसा मिळवायचा म्हणजे मेहनत सुद्धा आलीच की! पण सध्या झालंय असं की पैसा तर सगळ्यांना कमवायचा आहे पण मेहनत कोणालाच घ्यायची नाही. मग अशावेळी शॉर्टकटने पैसे कमावण्याचा मार्ग निवडला जातो, जिथे झटपट पैसे मिळतील. शॉर्टकटने पैसे कमावण्याचे तसे मार्ग अनेक आहेत आणि त्यातले बरेचसे मार्ग ‘जुगार’ म्हणून ओळखले जातात. असाच एक नवीन आधुनिक जुगार जगापुढे काही वर्षांपूर्वीच आला ज्याचे नाव आहे Cryptocurrnecy!

Cryptocurrnecy म्हणजे डिजिटल करन्सी होय. जी तुम्ही आपल्या सामान्य पैश्यांप्रमाणे हातात पकडू शकत नाही. खिशात ठेवू शकत नाही. ती तुम्हाला केवळ डिजिटली दिसत राहणार! पैश्यांचा हा प्रकार डिजिटल जगासाठी अत्यंत सुरक्षित मानला जातो. कारण ही curreny encrypted आहे. या Cryptocurrnecy बद्दल आपण कधीतरी वेगळ्या लेखात जाणून घेऊ. सध्या आपण Bitcoin हे काय गौडबंगाल आहे हे समजून घेऊ.
Bitcoin ही Cryptocurrnecy मधलीच एक currnecy होय. Cryptocurrnecy मधील सर्वात पावरफुल currnecy म्हणून Bitcoin ओळखले जाते. २००९ साली पहिल्यांदा Bitcoin हे open-source software म्हणून रिलीज करण्यात आले. तेव्हापासून अनेक जणांना ह्या Bitcoin ने आकर्षित केले. डिजिटल जगात Bitcoin ची मागणी वाढू लागली. जशी मागणी वाढू लागली तशी पूर्वी अगदी शून्य किंमत असलेल्या Bitcoin ची किंमत सुद्धा वाढू लागली.
पहिला Bitcoin ने उच्चांक गाठला १ लाखांचा, मग १० लाखांचा आणि अखेर ही किंमत इतकी वाढली की १४ एप्रिल २०२१ रोजी Bitcoin हे तब्बल ४७ लाखांपर्यंत पोहोचले. म्हणजे तुमच्याकडे १ Bitcoin असेल तर तुमच्याकडे डिजिटल जगात ४७ लाख रुपये असतील असा त्याचा अर्थ झाला. या वाढत्या किंमतीमुळे झाले काय की ज्यांच्याकडे खूप Bitcoins होते ते अगदी करोडपती झाले. ही गोष्ट एका रात्रीमध्ये करोडपती आणि अब्जोपती होण्यापेक्षा कमी नाही.

इथूनच लोकांना भुरळ पडायला लागली की आपण सुद्धा Bitcoin खरेदी करून अर्थात Bitcoin मध्ये invest करून श्रीमंत होऊ शकतो. पण थांबा, इथेच लोकं चुकतायत आणि तुम्ही सुद्धा चुकू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Bitcoin ची किंमत जरी लगेच वाढत असली तरी त्यात एक स्थिरपणा नाही. म्हणजे आज जर किंमत ४७ लाख असेल तर उद्या ती किंमत १० लाख काय १० हजार पर्यंत सुद्धा खाली येऊ शकते.
तर मंडळी अशा अस्थिर आर्थिक गुंतवणुकीलाच जुगार असे म्हणतात. म्हणजे उद्या काय होईल हे तुम्हाला सुद्धा माहित नाही. तुम्ही पैसे टाकून मोकळे झालात आणि आता तुम्हाला देवाच्या आणि नशिबाच्या भरवश्यावर राहावं लागेल. एका सोप्प्या वाक्यात सांगायचे झाले तर Bitcoin हे तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत करू शकते तसे तुम्हाला एका रात्रीत गरीब सुद्धा करू शकते. तर ह्या मुख्य प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं.
पण समजा तुम्ही एका रात्रीत श्रीमंत झालात तरी काय? तुम्ही फक्त नावाला श्रीमंत असाल. कारण मुख्य गोष्ट म्हणजे भारतात या Bitcoin ला मान्यता नाही. त्यामुळे तुमच्या Bitcoin चा वापर तुम्ही काहीच खरेदी करण्यासाठी करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे Bitcoin ची किंमार रोज कमी जास्त होत असते. त्यामुळे तुमच्याकडे असणारे Bitcoin हे तुम्हाला कितपत श्रीमंत बनवून ठेवतील हे कोणीच सांगू शकत नाही. तिसरी गोष्ट की आता तुम्ही जर Bitcoin खरेदी करून उद्या तो १०० लाखांपर्यंत जाईल असा विचार करत असाल तर थांबा. हा अत्यंत चुकीचा निर्णय ठरू शकतो.
एकंदर पाहता Bitcoin हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने अत्यंत घातक असून यात गुंतवणूक करण्यापेक्षा आता सध्या उपलब्ध असलेल्या शेअर मार्केट, म्यूच्युअल फंड्स, प्रॉपर्टी यांसारख्या विश्वसनीय पर्यायांमध्ये गुंतवणूक करा.
0 Comments