इंडिया विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट match मध्ये आपल्याला नेहमी एक वेगळीच चुरस दिसून येते. बरं ही चुरस फक्त खेळाडूंमध्येच नाही तर प्रेक्षकांमध्येही असते. Match कुणीही हारो इंटरनेट वर दुसऱ्याच दिवशी memes चा वर्षाव होतो. बरं पण मित्रांनो ही चुरस म्हणजे पण एक उत्फुर्त देशभक्तीचीच भावना आणि त्यातून उफळणार प्रेम, नाही का? या दोन राष्ट्रांमध्ये कितीही वाद असले तरी बंधुत्व मात्र कमी नाही, आखीर पडोसी पडोसी होता है!
कितीही वाद असले तरी अश्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या भारत आणि पाकिस्तान यांना घट्ट जोडून ठेवतात मग ती भाषा असो, संस्कृती असो, वारसा असो किंवा एखादा सण. या सर्वात मात्र एक ठिकाण असं आहे जे दोन्ही राष्ट्रांना घट्ट बांधून आहे आणि ते म्हणजे करतारपूर साहिब गुरुद्वारा हे धार्मिक स्थळ. आज आपण याच्या वैशिष्ट्यांविषयी व इथे कसं पोहोचावं याविषयी माहिती जाणून घेणार आहेत, मग मित्रांनो excited आहात ना? वाचत राहा!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये नेहमीच तेढ निर्माण झाली आहे, मात्र या दोन्ही देशांना जोडण्याचे काम करतारपूर गुरुद्वाराने केले आहे.
तुमच्यापैकी अनेकांनी कर्तारपूर कॉरिडॉरबद्दल ऐकले असेलच. भारत-पाकिस्तान सीमेपासून सुमारे ४.७ किमी अंतरावर असलेल्या करतारपूर येथील गुरुद्वाराला भारतात राहणाऱ्या भाविकांना भेट देता यावी म्हणून हा कॉरिडॉर बांधण्यात आला होता. विशेष बाब म्हणजे तुम्ही व्हिसाशिवाय इथे या गुरुद्वारला भेट देऊ शकता.
त्याआधी कर्तारपूर कॉरिडॉरबद्दल जाणून घ्या. तर १९९९ मध्ये दोन्ही देशांचे तत्कालीन पंतप्रधान आपले दिवंगत अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे नवाझ शरीफ यांनी मिळून या कॉरिडॉरच्या तयारीवर चर्चा केली होती. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी २६ नोव्हेंबर २०१८ रोजी भारताने या कॉरिडॉरची पायाभरणी केली होती, तर दोन दिवसांनंतर २८ नोव्हेंबर रोजी पाकिस्ताननेही या कॉरिडॉरची तयारी सुरू केली.
बरोबर एका वर्षानंतर, १२ नोव्हेंबर २०१९ रोजी, गुरु नानक साहिब यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त, हा कॉरिडॉर प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही करतारपूर गुरुद्वाराला जायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. तर मग थांबलाय कशासाठी, चला जाणून घेऊया व्हिसाशिवाय तुम्ही पाकिस्तानमधील गुरुद्वाराला कसे भेट देऊ शकता.
पाकिस्तानमध्ये असलेल्या या गुरुद्वाराला भेट देण्यासाठी तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. जो या प्रवासातील पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. ज्या यात्रेकरूंचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांना प्रवासाच्या अगोदर माहिती दिली जाते. या नोंदणीसह तुम्ही फक्त करतारपूर साहिबला भेट देऊ शकता, याशिवाय त्यांना बाहेर अन्य कुठल्याही ठिकाणी बाहेर फिरण्यास सक्त मनाई आहे.
करतारपूरला जाण्यासाठी केंद्र सरकारने https://prakashpurb550.mha.gov.in/kpr/ हे एक ऑनलाइन पोर्टल सुरु केले आहे. तुम्ही या पोर्टलद्वारे नोंदणी करू शकता. यानंतर, प्रवासाच्या तारखेच्या ३ किंवा ४ दिवस आधी नोंदणीचा एसएमएस आणि ईमेल प्राप्त होईल. नोंदणीसोबतच इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशनही तयार केले जाईल.
अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. पासपोर्टच्या स्वरूपात नाव, जन्मतारीख यासारखी माहिती अचूक द्यावी लागेल. तुम्हाला OCI (Overseas Citizenship of India) कार्ड धारकाच्या नोंदणी फॉर्ममध्ये OCI कार्डशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल.
नोंदणीसाठी तुमच्याकडे पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राची स्कॅन केलेली प्रत, JPG फॉरमॅटमधील छायाचित्र 300KB पेक्षा जास्त नसावे. तुमच्या कागदपत्रांमध्ये किंवा नोंदणीमध्ये काही विसंगती आढळल्यास, तुमचा अर्ज नाकारला जाईल.
नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला नियोजित तारखेला बाबा डेरा नानक गाठावे लागेल. येथे एक पवित्र गुरुद्वारा देखील बांधला आहे, बाबा डेरा नानक हा भारतीय बाजूचे checkpoint आहे, जिथून तुम्ही पाकिस्तानात प्रवेश कराल. इथे जाण्यासाठी तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या राज्यांमधून प्रथम अमृतसरला यावे लागेल. अमृतसर नंतर, तुम्ही बस टॅक्सी किंवा कारने बाबा डेरा नानक चेक पॉइंटवर पोहोचाल.
इमिग्रेशन चेकपॉईंटवर आल्यावर, तुमच्या प्रवासाशी संबंधित सर्व कागदपत्रे काढा. येथे तुमची सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली जातील, त्यानंतर तुमचे सामान तपासले जाईल. सर्व काही तपासल्यानंतर, तुम्हाला पोलिओचे dose दिले जातील, कारण पाकिस्तान अद्याप पोलिओमुक्त नाही. कस्टम चेकिंगनंतर, इलेक्ट्रिक रिक्षा तुम्हाला भारत-पाक सीमेवर घेऊन जाईल. येथे पुन्हा एकदा तुमची कागदपत्रे तपासली जातील, हे सर्व केल्यानंतर शेवटी तुम्ही रिक्षाच्या मदतीने पाकिस्तान इमिग्रेशन पॉईंटवर जाऊ शकाल.
येथे पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे दाखवावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ट्रिपसाठी $20 आकारले जातील. जर तुम्हाला करतारपूर गुरुद्वाराच्या आसपास खरेदी करायची असेल, तर तुम्ही या चेक पॉइंटवर पैसे exchange देखील करू शकता.
हे सर्व केल्यानंतर तुम्ही इमिग्रेशन इमारतीत प्रवेश कराल. येथे पुन्हा एकदा तुमची कागदपत्रे तपासली जातील आणि तुमच्या बोटांचे ठसे घेतले जातील. प्रदीर्घ प्रक्रियेनंतर, शेवटी तुमची वाट पाहत असलेली बस असेल, जी तुम्हाला थेट पाकिस्तान देशातील करतारपूर गुरुद्वारापर्यंत घेऊन जाईल.
करतारपूर गुरुद्वारामध्ये प्रवेश करताच एक सुंदर परिसर तुमच्या डोळ्यांसमोर येईल. तुम्हाला प्रथम तुमचे बूट काढून लॉकर रूममध्ये ठेवावे लागतील, त्यानंतर तुम्ही संपूर्ण कॉम्प्लेक्समध्ये सहज फिरू शकाल. करतारपूर गुरुद्वाराच्या आवारात पवित्र विहीर, गुरु नानक देवजींची समाधी-दर्गा आणि चित्रकला संग्रहालयासारखी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. दर्शनानंतर तुम्ही खरेदीला परत जाऊ शकता जिथे तुमची सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा तपासली जातील.
तर ही होती करतारपूर गुरुद्वाराच्या दर्शनाशी संबंधित सर्व माहिती, जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. तसेच, प्रवासाशी संबंधित माहितीसाठी आमच्यासोबत कनेक्टेड रहा आणि इथे एक ट्रिप नक्की मारा राव!
0 Comments