आपल्या सगळ्यांनीच कधी ना कधीतरी रेल्वेचा प्रवास केला असेल. एक्सप्रेस ट्रेन मधून प्रवास करताना खूप मजा येते जी गाडीतून येत नाही. वाटेवरची स्वच्छ स्टेशनं पाहिली की आपल्याला आपल्या देशाबद्दल खूप गर्व वाटतो. हा गर्व भारतीय रेल्वेमुळे वाटतो. अख्ख्या देशात जेवढी म्हणून स्टेशनं आहेत ती सगळी स्टेशनं भारतीय रेल्वे सांभाळते पण तुम्हाला माहित आहे का असं एक स्टेशन आहे जे की एक गाव सांभाळतं.
ह्यामागे एक विशिष्ट कारण आहे. जाणून घेऊया ह्या अलौकिक स्टेशनची कहाणी.
भारताच्या ह्या ऐतिहासिक स्टेशनचं नाव आहे जालसू नानक होल्ट रेल्वे स्टेशन (Jalsu Nanak Halt Railway station).
हे जगावेगळे रेल्वे स्टेशन राजस्थान राज्यात आहे. हे रेल्वे स्थानक नागौर जिल्ह्यापासून ८२ किलोमीटर अंतरावर स्थित असून जालसू गावातली लोकं हे स्टेशन सांभाळतात. ट्रेनचे टिकीट देण्यापासून ते साफ सफाई पर्यंत सगळी कामं गावातली लोकं करतात. या स्टेशनावर दहा गाड्या थांबतात. ह्या स्टेशनाच्या कामकाजातून साधारणतः दरमहा तीस हजार रुपये कमाई होते. इथे रोज पन्नास तिकिटांची विक्री होते म्हणजेच दर महिना इथे १५०० तिकिटांची विक्री होते.
आधी हे रेल्वे स्थानक भारतीय रेल्वेच सांभाळायची, पण इथून खूप पैसे म्हणजेच रेवेन्यू जनरेट होत नसे. म्हणून हे स्टेशन बंद करायचे ठरवले. पण गावकऱ्यांना हे मान्य नव्हतं आणि त्यांनी दहा दिवस ह्या गोष्टी करता आंदोलन केले .२००५ साली भारतीय रेल्वेने हे स्टेशन बंद करण्याचे ठरवले होते. पण जेव्हा गावकरी ऐकत नाहीत असं कळलं तेव्हा भारतीय रेल्वेने हे स्टेशन त्यांच्या हाती सुपूर्त केलं आणि सगळं कामकाज त्यांना बघायला सांगितलं.
गावकऱ्यांनी भारतीय रेल्वेची ही अट मान्य केली आणि सगळं कामकाज बघायला सुरुवात केलं. गावातल्या लोकांनी पैसे गोळा केले आणि त्या पैशातून १५०० तिकीटं विकली. जमलेले पैसे साधारण दीड लाख रुपये होत होते. गावकऱ्यांनी आपल्याच गावातल्या एका माणसाला पाच हजाराच्या नोकरीवर तिकीट विक्रेता म्हणून नोकरी पण लावून दिली. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हे गाव फौजी लोकांचं गाव मानलं जातं. ह्या गावातून २०० जवान आर्मी मध्ये तैनात आहेत तर २५० रिटायर्ड सैन्य अधिकारी या गावात राहायला आहेत.
फौजी लोकांच्या सोयीसाठी खरंतर हे स्टेशन बांधण्यात आलं होतं. पण आता गावकऱ्यांना असं वाटतं की हे स्टेशन परत भारतीय रेल्वेने सांभाळावं.
0 Comments