आजच्या जगात कोणाला कोणा करता वेळ नसतो. मुंबई तर अशी परिस्थिती आहे की लोकल ट्रेन मधून उतरताना चढताना समजा एखादा धक्का लागून पडला तरीसुद्धा कोणाला त्याच्याकडे बघायला वेळ नसतो. तर अशा या असंवेदनशील जगात जर का कोणाचा एक्सीडेंट झाला तर ते अधिक जास्त दुर्दैवी असतं.
एक्सीडेंट झाला की पुढची सगळी यंत्रणा कामाला लागते आणि डेड बॉडी पहिले आयडेंटिफिकेशनला जाते. एक्सीडेंट झाला असल्यामुळे एकदा आयडेंटिफिकेशन झालं की डेड बॉडी नातेवाईकांना दिली जात नाही. तर त्या डेड बॉडीचं पोस्टमार्टम होतं. साधे पोस्टमार्टमचं नाव जरी ऐकलं तरी सुद्धा आपल्या अंगावर काटा येतो आणि असे होण साहजिकच आहे कारण आपल्या जवळच्या माणसाच्या शरीराची अशी चिरफाड होणार आहे या नुसत्या कल्पनेनेच पोट ढवळून निघतं.
शरीरात प्राणच नसेल तर ते शरीर काय कामाचं हे जरी सत्य असलं तरी सुद्धा पोस्टमार्टम जितकं टाळता येईल तितकं ते आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की शरीराची जरी चिरफाड होत असेल तरी मृत्यूचे नक्की कारण काय हे जाणून घ्यायला पोस्टमार्टम हे करावंच लागतं.
एकदा का पोस्टमार्टम झालं की डॉक्टर सुद्धा डेथ सर्टिफिकेट इश्यू करायला पुढे मागे बघत नाहीत. मृत्यूचे नक्की कारण कळायला पोस्टमार्टम नक्की करावं. कुणाला नॉर्मल डेथ आली असेल तर बऱ्याचदा कोणी पोस्टमार्टम करत नाही पण कोणाचा एक्सीडेंट झाला असेल किंवा कुणाला जर का मृत्यूची शंका येत असेल तर मात्र त्या शरीरावर पोस्टमार्टम केले जाते. पण एक गोष्ट महत्त्वाची की पोस्टमार्टम करायला बराच वेळ द्यावा लागतो.
मृत्यूचे नक्की कारण जाणून घ्यायचं असेल तर डॉक्टरांना एक एक अवयव नीट तपासून बघायला लागतो. यानंतरच डॉक्टर एका निष्कर्षावर येऊन पोचतात. पण तुम्हाला माहित आहे का पोस्टमार्टम कधीही, कोणत्याही वेळी करत नाहीत, रात्री तर नाहीच नाही. पण असे का?
पोस्टमार्टम रात्री न करण्याची काही कारण आहेत. नक्की कुठली कारण आहेत ती कारणं आपण जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जर का रात्री पोस्टमार्टम केलं, तर हे पोस्टमार्टम नॅचरल लाईट किंवा सूर्यप्रकाशात होत नाही. ट्यूब लाइट्स, सीएफएल आणि एलईडी यामध्ये रात्री रक्ताचा रंग डॉक्टरांना लाल दिसत नाही. डॉक्टरांना हा लाल रंग मांगी रंगाचा दिसतो म्हणूनच रात्री पोस्टमार्टम मला परवानगी नाही. शिवाय फॉरेन्सिक सायन्सच्या दृष्टीने सुद्धा हे अमान्य आहे म्हणूनच पोस्टमार्टम रात्री केलं जात नाही.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पोस्टमार्टम करताना शरीरावरती ज्या जखमा झाल्या आहेत त्यांचा रंग सांगायला लागतो रात्रीच्या वेळेस पक्का रंग दिसत नाही म्हणूनच पोस्टमार्टम रात्री करत नाहीत.
तिसरे कारण हे की शरीरावरती जखम नक्की कधी झाली ती वेळही सांगायची असते. जर का जखम नीट दिसली नाही तर वेळेचं गणित नीट मांडता येणार नाही म्हणून पोस्टमार्टम सकाळीच दिवसभरात करतात. शेवटचे कारण म्हणजे फॉरेन्सिक विभागाकडे पुरेसा स्टाफ अर्थात पोस्टमार्टम करायला लागणारे मदतीचे हात सुद्धा कमी आहेत म्हणून पोस्टमार्टम सकाळीच केलं जातं.
या सगळ्या कारणांमुळे ग्रामीण विभागात बऱ्याचदा अनेक अडचणी येतात. याबद्दलची याचिका सध्या कोर्टातही चालू आहे. त्यामुळे अजूनही सरकारी इस्पितळात पोस्टमार्टम संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच केलं जातं.
0 Comments