भारताचा स्टीलमॅन ज्याच्यापुढे आयर्नमॅन, सुपरमॅन सारखे भलेभले सुपरहिरो लोटांगण घालतील!

नरेंद्र सिंग चौधरी यांनी दहा वर्ष सतत इंडियन आर्मीत राहून देशाची सेवा केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी साधारण २५६ बॉम्ब डिफ्युज केले.


प्रत्येक भारतीयाला आपल्या देशाबद्दल गर्व आणि अभिमान असतो आणि असलाच पाहिजे. तर याच अभिमानाच्या जोरावर काहीजण देशाची सेवा करायला ‘आर्म्ड फोर्सेस’ मध्ये दाखल होतात आणि देशासाठी आयुष्य पणाला लावतात. आपली शूर इंडियन आर्मी देशाकरता सीमेवरती दिवस रात्र तैनात राहून शत्रुशी दोन हात करत असते. नुसतीच इंडियन आर्मी नाही तर इंडियन एअर फॉर्स, इंडियन नेव्ही वेळोवेळी इंडियन आर्मीला मदत करत असते. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एयरफोर्स मध्ये भरती होणारा प्रत्येक सैनिक, प्रत्येक जवान, प्रत्येक ऑफिसर हा आपल्या देशाचा हिरोच आहे. युनिफॉर्ममध्ये तर हे हिरो आणखीन रुबाबदार दिसतात आणि मन भरून येतं – सल्यूट टू देम.

इंडियन आर्मीचा असाच एक हिरो ज्याला अख्खा भारत देश ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखतो. त्यांचे नाव आहे नरेंद्र सिंग चौधरी.

Source : amazonaws.com

नरेंद्र सिंग चौधरीजी मूळचे पाली जिल्हा राजस्थानचे. त्यांनी बॉम्ब डिफ्युज करण्याची कला आधीच शिकून घेतली होती. पण आर्मीत भरती झाल्यावर त्यांनी बॉम्ब डिफ्युज करण्याच्या कलेत जणू मास्टरकी मिळवली.

इंडियन आर्मी मध्ये श्री नरेंद्र सिंग चौधरी हे बॉम्ब डिफ्युज करणारे एक्सपर्ट म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होते. नरेंद्र सिंग चौधरी यांनी दहा वर्ष सतत इंडियन आर्मीत राहून देशाची सेवा केली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी साधारण २५६ बॉम्ब डिफ्युज केले. इंडियन आर्मी मध्ये आल्यानंतर बॉम्ब डिफ्युज करण्याचं जे का प्रशिक्षण मिळालं त्यानंतर ते बॉम्ब डिफ्युज करण्याचे एक्सपर्ट बनले. त्यांचा अभ्यास आणि चिकाटी यामुळे खरतर असते ‘स्टील मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जायचे.

त्यांची प्रतिभाच मुळी अशी होती की बऱ्याचदा त्यांना नक्षलवाद्यांच्या भागामध्ये पोस्टिंग दिलं जायचं. हे नक्षलवादी बऱ्याचदा त्यांच्या भागांमध्ये बॉम्ब माईन्स मांडून ठेवायचे आणि त्या भागात राहणाऱ्या लोकांना म्हणजेच सामान्य नागरिकांना आणि आर्मीतल्या जवानांना टारगेट करून मारायचे.

Source : amazonaws.com

हे नक्षलवादी सामान्य लोकांना त्रास द्यायचे आणि त्यांच्यावर हल्ला करायचे. अशा वेळेला नरेंद्र सिंग चौधरीहे नक्षलवादी भागामध्ये काम करून खूप लोकांचे प्राण वाचवायचे.

नरेंद्र सिंगचे साथीदार बऱ्याचदा असं सांगायचे की नरेंद्र सिंग न खाता-पिता पन्नास किलोमीटर धावायचे ते पण अगदी सहज. ते एक शूर आणि साहसी सैनिक होते. ते अनेकांचे प्रेरणास्थान होते. नरेंद्र सिंग जी भारताच्या दुर्गम भागात सुद्धा आरामात सर्व्हाईव्ह करायचे. बऱ्याचदा नरेंद्र सिंग चौधरी हे आपल्या मृत्यूबद्दल चेष्टा करायचे की ते बॉम्ब डिफ्युज करता करता मरतील किंवा त्यांना बॉम्ब डिफ्युज करता करता मरण येईल. आणि असं बोलून ते हसायला लागायचे. अशा ह्या महान सैनिकाचा २०१६ साली मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूवेळी इंडियन आर्मी तर्फे त्यांना सलामी देण्यात आली आणि श्रद्धांजली वाहण्यात आली. अ

से हे भारताचे स्टील मॅन जरी आपल्यात नसले तरी त्यांनी केलेली कार्य कधीच विसरता येणार नाही. बॉम्ब डिफ्युज करण्याचं एवढे जोखमीचं काम त्यांनी दहा वर्ष सतत केलं. अशा या योद्ध्याला मानाचा मुजरा.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *