कधीही सेट मॅक्स चॅनेल लावा. त्यावर सुर्यवंशम हा चित्रपट सगळ्यात जास्त वेळा दाखवतात. त्यामुळे बॉक्स ऑफीस पेक्षा जास्त तो लोकांच्या नजरेत आला, तो सेट मॅक्स या वाहिनी मुळे. आता त्यांनी जरा स्वत:ला आवर घातलाय म्हणे, पण हा चित्रपट सेट मॅक्सवर इतक्यांदा लागायचा की त्यावर मिम्सचा पाऊस पडू लागला होता.
तस पाहायला गेलं तर चित्रपटाची कथा वाईट अजिबात नव्हती. यामध्ये खुद्द बिग बींनी डबल रोल केले. त्यात एका पात्राचे नाव भानू प्रताप असे होते तर दुसऱ्या पात्राचे नाव हिरा ठाकूर. या व्यतिरिक्त तुम्हाला आठवत असेलच, चित्रपटातील विषारी खीरवाला एक सिन खूपच प्रसिध्द झाला होता.

या सीनमध्ये अमिताभ बच्चन यांच्या सोबत एका लहानग्याने स्क्रिन शेअर केली होती. त्यानेच ती विषारी खीर अमिताभ यांना खाऊ घातली होती. तर आता तो लहान मुलगा नेमका कोण होता आणि सध्या तो काय करतो? असे बरेचसे प्रश्न तुम्हालाही कधी ना कधी पडले असतील, चला तर जाणून घेऊया.
अमिताभच्या नातवाचे पात्र साकारणाऱ्या या लहानग्याचे नाव आहे, पीबीएस आनंद वर्धन. आनंद हा सुप्रसिध्द गायक पी.बी श्रीनिवास यांचा नातू. सुर्यवंशम हा आनंदचा पहिलाच हिंदी चित्रपट होता.
त्याआधी चार वर्षांचा असताना आनंदने पहिल्यांदा रामायणम् या चित्रपटात काम केले होते. त्यात त्याने वाल्मिकी आणि हनुमानाची भुमिका साकारली होती. त्यानंतर त्याने बऱ्याच तेलगू चित्रपटांमध्ये चाईल्ड आर्टिस्ट म्हणून काम केले, मात्र त्याची ओळख सुर्यवंशम या चित्रपटामुळेच निर्माण झाली.

१९९१ साली त्याला बेस्ट चाईल्ड आर्टिस्ट म्हणून नंदी ऍवॉर्डही मिळाले होते. असं असूनही आनंदने वयाच्या १३ व्या शिक्षणासाठी चित्रपटांपासून दूर राहायचे ठरविले.
इंजिनिअरिंचे शिक्षण पूर्ण झाल्यावर आनंद पुन्हा एकदा चित्रपटांकडे वळला आहे. त्याने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. सुर्यवंशममध्ये क्युट आणि निरागस दिसलेला आनंद आता मात्र पुर्ण बदलला आहे. आनंदचे बदलेले रुप पाहून त्याला पटकन ओळखणं जरा कठीण जातंय.

२७ वर्षाचा आनंद आता एकदम हॅन्डसम हंक झाला असून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपले करिअर आजमावतोय. त्याने सुपरस्टार अभिनेत्री श्रुती हसन सोबतही एका चित्रपटात काम केले आहे. आता तो चांगल्या स्क्रिप्टच्या प्रतिज्ञेत आहे.
ह्या हॅन्डसम हंक पीबीएस आनंद वर्धनची जादू चंदेरी पडद्यावर चालेल की नाही हे काळच ठरवेल.
0 Comments