पॅसेंजर रेल्वे 24 डब्ब्यांची तर मालगाडीला 56 डब्बेच का असतात?

भारतात एकूण ८ हजार रेल्वे स्थानक असून त्यादरम्यान, ४५० सुपरफास्ट एक्सप्रेस, ७००० पॅसेंजर शिवाय अजून ४ हजार रेल्वे धावतात.


जगातलं चौथं मोठं रेल्वेचं जाळ हे भारतात पसरलेलं आहे. अगदी उत्तरेच्या काश्मिरपासून ते थेट दक्षिणेतल्या कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेच्या आगरतळापासून ते पश्चिमेच्या भूज पर्यंत जवळपास १ लाख १५ हजार किलोमिटरचं रुळांचे जाळे संपूर्ण भारतभर पसरलं आहे. भारतात एकूण ८ हजार रेल्वे स्थानक असून त्यादरम्यान, ४५० सुपरफास्ट एक्सप्रेस, ७००० पॅसेंजर शिवाय अजून ४ हजार रेल्वे धावतात. देशातला एकूण ६५ हजार किलोमिटरचा प्रदेश रेल्वेमुळे एकमेकांशी जोडला गेला. त्यामुळेच रेल्वेने भारताला जोडलं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

शिवाय जास्तीत जास्त भारतीय रेल्वे प्रवासच पसंत करतात आणि म्हणूनच सणासुदीला किंवा इतर सिझनच्या दरम्यान आपल्याला रेल्वेचं रिझर्वेशन मिळणं महाकठीण होऊन बसतं. प्रवाश्यांची संख्या इतकी जास्त असते की बऱ्याच जणांचं तिकीट कन्फर्म होत नाही. मग ते बिचारे गर्दीत, वेटिंग तिकीटसह प्रवास करतात. काही खास सणा-वाराला प्रवाशांची संख्या लक्षात घेता स्पेशल ट्रेनही सोडल्या जातात. अशा वेळी मनात विचार येतो की याच रेल्वेला अजून काही डब्बे वाढवून प्रवाश्यांची सोय का बरं केली जात नाही? रेल्वेचे इंजिन इतके शक्तिशाली असते, तर मग प्रवासी गाड्यांना फक्त २४ डब्बेच का जोडले जातात? या बद्दल आपण जाणून घेऊ.

Source : ixigo.com

भारतीय रेल्वेच्या एका कोचची म्हणजेच डब्याची लांबी ही २५ मीटर इतकी असते. लूप लाईनची मानक लांबी अर्थात Standard Length ६५० मीटर इतकी असते.

त्यामुळे रेल्वेची लांबी ही लूप लाईनच्या लांबी पेक्षा जास्त नसावी. त्यामुळेच ६५० मीटर पर्यंतच रेल्वे लांबी ठेवायची झाल्यास, आपल्याला इंजिनाच्या मागे फक्त २४ डबेच जोडता येतात. जास्त डबे जोडल्यास मानक लांबी मर्यांदा ओलांडली जाईल. त्यामुळेच बऱ्याचदा पॅसेंजर ट्रेनला फक्त २४ डबे जोडलेले असतात.

तुम्हाला कधी वाटलं पण नसेल ना की यामागे एवढ टेक्निकल कारण असेल? पण मंडळी आपण अगदी साध्या सध्या समजतो त्या गोष्टींच्या मागे सुद्धा लॉजिक असतं बरं का! हे तर झालं पॅसेंजर ट्रेन बाबत, मालगाडीच्या डब्ब्यांची संख्या सुद्धा ठराविक असण्यामागे हेच कारण आहे का? चला जाणून घेऊ.

Source-www.keralakaumudi.com

मालगाडीला लूप लाईनच बंधन नाही का? तर वाचकांनो, मालगाडीलाही लूप लाईची मर्यादा पाळावीच लागते. मात्र मालगाडीच्या डब्ब्यांचे BOX, BOXN,BOXN-HL असे वेगवेगळे प्रकार आहेत.

Source : abb.com

या डब्ब्यांना वॅगन म्हटले जाते त्यांची लांबी सुमारे ११ ते १५ मीटर म्हणजेच पॅसेंजर रेल्वेपेक्षा कमी असते. त्यामुळे वॅगन बॉक्सच्या लांबीनुसार एका रॅकमध्ये जास्तीत जास्त ४० ते ५८ डबे बसू शकतात. त्यामुळेच एका मालगाडीला जास्तीत जास्त ५८ वॅगन आपण जोडू शकतो, तर आपल्या पॅसेंजर रेल्वेच्या इंजिनाला २४ डबेच जोडता येतात.

आहे की नाही अगदी कामाची रंजक माहिती, सजला तर मग आपल्या मित्रांसोबत सुद्धा हा लेख नक्की शेअर करा!


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *