राकेश झुनझुनवाला म्हणजे भारताचे वॉरेन बफे जणू! भारतीय शेअर मार्केट मधले चाणक्य म्हणून राकेश झुनझुनवाला यांना ओळखले जाते. गेल्या कित्येक वर्षांचा शेअर मार्केट मधील प्रदीर्घ अनुभव आज त्यांच्या फळाला येतो आहे. दिवसाकाठी कधी कधी १०० कोटींचही प्रॉफीट कमवणारा हा मनुष्य मात्र आजही इतका साधा राहतो की त्याची संपत्ती तब्बल ६ बिलियन डॉलर्स आहे यावर विश्वास बसत नाही.
नुकतंच घडलेलं एक उदाहरण घ्या. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्या भेटीचे फोटो सगळीकडे शेअर झाले आणि कोणालाही विश्वास बसत नव्हता की राकेश झुनझुनवाला खुद्द भारताच्या पंतप्रधानांच्या भेटीसाठी असे गेले.
पांढरा आणि अत्यंत चुरगळलेला शर्ट घालून असणारा त्यांचा हा फोटो खूप चर्चेत राहिला. ट्रोल करणाऱ्यांनी त्यांना ट्रोल केले. ज्यांना राकेश झुनझुनवाला यांच्याबद्दल आदर आहे त्यांनी त्यांच्या साधेपणाचे कौतुक सुद्धा केले. तर अनेकांनी हा स्टंट असू शकतो अशी शक्यता सुद्धा वर्तवली.
पण एक सामान्य व्यक्ती म्हणून या फोटोकडे पाहून तुम्ही सुद्धा म्हणाल की हा साधेपणा नाही तर गबाळेपणा आहे. कारण साधा शर्ट आणि चुरगळलेला शर्ट यात खूप मोठा फरक असतो. समजा तुम्हाला भारताच्या पंतप्रधानांची भेट घ्यायची आहे, तर तुम्ही असे जाल का? तर अजिबात नाही. मग असे काय कारण होते की राकेश झुनझुनवाला यांच्यावर चक्क मोदींना भेटताना असा शर्ट घालून जाण्याची पाळी आली?
तुमच्या-आमच्या मनात जसा हा प्रश्न आला आहे तसाच प्रश्न एका पत्रकाराच्या मनी पण आला आणि तिने मुलाखती दरम्यान राकेश झुनझुनवाला यांना हा प्रश्न विचारला. त्यावर राकेश झुनझुनवाला यांनी जे उत्तर दिले ते पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.
राकेश झुनझुनवाला म्हणाले की, “आता व्हाईट शर्ट आहे म्हटल्यावर तो चुरगळणारच ना. मी ६०० रुपये देऊन त्या शर्टला इस्त्री सुद्धा केली होती, पण आता चुरगळायचा तो चुरगळला! मी तर माझ्या ऑफिस मध्ये सुद्धा शॉर्टस घालून बसतो. त्यात लाज कसली? कोणी माझ्याकडे क्लायंट येत नाही ना कोणी कस्टमर येतो. त्यामुळे कपड्यांवर विशेष लक्ष मी देत नाही.”
त्यांच हे उत्तर तुम्ही खालील व्हिडियो मध्ये त्यांच्या तोंडून सुद्धा नक्की ऐका.
तर पाहिलं मंडळी, किती निरागसपणे त्यांनी कबूल केलं की झाली चूक आता काय करणार. त्यांच्या बोलण्यात कुठेच त्यांना या एवढ्या मोठ्या भेटीची लाज व शरम असल्याचे जाणवले नाही. त्यांच्या मते त्यांनी त्यांच्या परीने इस्त्री करूनच शर्ट घातला होता, पण शर्टने त्यांना दगा दिला आणि एवढी मोठी भेट केवळ त्या शर्टमुळे कॅन्सल करणे त्यांना बरोबर वाटले नाही आणि तसेच ते मोदींना भेटले.
यावरून आपण एक गोष्टी शिकू शकतो. ती गोष्ट म्हणजे कपडेच सर्वस्व नाही. राकेश झुनझुनवाला यांच्या मते कपड्यांवरून माणूस ओळखू नये. त्याची ओळख त्याचे ज्ञान आणि टॅलेंट असते. म्हणूनच ती स्वत:च्या ऑफिस मध्ये सुद्धा सुटाबुटात बसत नाहीत, तर नॉर्मल कपड्यांमध्येच असतात.
ही मोठी लोकं अशीच असतात, पैसा खूप असतो, पण तो पैसा योग्य गोष्टींवर खर्च करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. मार्क झुकर्बर्गचे उदाहरण घ्या. टीशर्ट आणि जीन्स या अत्यंत साध्या पेहरावातच तो नेहमी दिसतो. हीच गोष्ट आपण सुद्धा आत्मसात केली आणि योग्य गोष्टींमध्ये गुंतवणूक व खर्च केला तर पैश्याच्या बाबतीत आपण सुद्धा श्रीमंत होऊच शकतो.
0 Comments