भारतातील सर्वात महागडं घर, म्हणजे इतकं महागडं की जगातील काही देशांची अर्थव्यवस्था सुद्धा तेवढ्या किंमतीची नाही इतकं महागडं घर आहे आर्थिक राजधानी मुंबई मध्ये आणि ते घर आहे उद्योगपती मुकेश अंबानी यांच ‘अँटीलिया’!
तब्बल ४ लाख स्केअर फुट क्षेत्रात पसरलेलं हे घर म्हणजे एखाद्या अलिशान हॉटेल पेक्षा कमी नाही. जवळपास ११ हजार कोटी इतका पैसा ओतून मुकेश अंबानी यांनी आपल्या स्वप्नातील हे घर साकारलं. २७ मजले असलेल्या ह्या घराचे पहिले ६ मजले हे केवळ पार्किंग साठी आहेत. शिवाय या घरात स्वतंत्र सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, गार्डन…अहो जे जे एखाद्या श्रीमंत माणसाला हवं ते सगळं आहे.
ह्या घरात हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढीच लोकं राहतात पण गंमत म्हणजे त्यांच्या पेक्षा जास्त संख्या आहे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची! पूर्ण घराची देखभाल करण्यासाठी तब्बल ६०० कर्मचारी अँटीलिया मध्ये तैनात आहेत.
तशा तर तुम्हाला देखील अनेक गोष्ट अँटीलिया बद्दल माहित असतील. पण आज आम्ही जी गोष्ट सांगणार आहोत ती फार म्हणजे फार कमी लोकांना माहित आहे. ही गोष्ट आहे अँटीलिया मधील कचऱ्याची! अँटीलिया मधील कचरा डम्पिंग ग्राउंड मध्ये फेकला जात नाही. त्याचा एका विशिष्ट कारणासाठी वापर केला जातो.
अँटीलिया मध्ये जिम पासून स्पा पर्यंत प्रत्येक सोय आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा एक विशेष सोय आहे ज्याबाबत मुकेश अंबानी यांचे कौतुक करायला हवे. अँटीलिया मध्येच एक छोटा बायो प्लांट आहे. जेथे घरातील कचऱ्यापासून वीज बनवली जाते.
काय? विश्वास बसत नाहीये? अहो पण हे अगदी खरं आहे आणि याच विजेचा वापर अँटीलिया मध्ये केला जातो. हा प्रयोग जगभरात सुद्धा करून पाहिला असून यशस्वी झाला आहे. याला ‘Waste To Energy’ असे म्हणतात. या प्रक्रीये मधून कचऱ्यामधून उष्णता निर्माण केली जाते. ह्या प्रक्रियेचा इतिहास तब्बल १८७४ पासून सुरु होतो. जेव्हा पहिल्यांदा Alfred Fryer नामक व्यक्तीने ही संकल्पना मांडली आणि त्याचे यंत्र सुद्धा बनवून दाखवले.
त्यामुळे ही गोष्ट अशक्य नाही आणि जगभरात खूप ठिकाणी कचऱ्यापासून वीज बनवली जात आहे. ह्या गोष्टी पासून प्रभावित होऊनच मुकेश अंबानी यांनी सुद्धा आपल्या कचऱ्याचा असा वापर होऊ शकतो का याची माहिती घेतली आणि पैसा काय त्यांच्याकडे होताच, त्यामुळे एक छोटा प्लांट घरातच बनवणे त्यांना कठीण झाले नाही.
यावरून काय शिकलो आपण मंडळी? तर एवढा मोठा उद्योगपती, इतका गडगंज पैसा, पण जिथे पैसा वाचवण्याची संधी दिसते ती संधी मुकेश अंबानी सोडत नाहीत. खरा बिझनेसमॅन यालाच म्हणत असावेत!
0 Comments