Titanic आजवर समुद्रातून बाहेर का काढलं नाही? वाचा ही रहस्यमयी गोष्ट!

जवळपास २,२२४ प्रवाशी आणि क्रू मेंबर्स जणू स्वत:ला भाग्यवान समजत होते कारण त्यांना Titanic अनुभवण्याची संधी मिळाली होती. पण त्यांचं हे भाग्य जणू त्या रात्री पुरतंच होतं.


१५ एप्रिल १९१२ चा तो दिवस होता. तेव्हाचं सर्वात महागडं आणि आलिशान जहाज अथांग पसरलेल्या महासागराच्या लाटांवर हेलकावे खात आपला मार्ग कापत होतं. जवळपास २,२२४ प्रवाशी आणि क्रू मेंबर्स जणू स्वत:ला भाग्यवान समजत होते कारण त्यांना Titanic अनुभवण्याची संधी मिळाली होती. पण त्यांचं हे भाग्य जणू त्या रात्री पुरतंच होतं. कारण एका छोट्याश्या हिमनगाला Titanic आदळण्याचं निमित्त ठरलं आणि त्या महासागराने १५०० हून जास्त जीवांचा घोट घेतला. तेव्हाच्या काळातील हा सर्वात मोठा सागरी अपघात होता. Titanic च्या आठवणीने अख्खं जग तेव्हाही सुन्न झालं आणि आजही होतं.

हे जहाज बुडालं होतं कॅनडाच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या अंटार्टीकाच्या भागात! तेथील Newfoundland बेटापासून ६०० किमी दक्षिणेला Titanic ला जलसमाधी मिळाली. पण तुम्हाला माहित आहे का बुडालेलं हे जहाज आजवर कधीच बाहेर काढण्यात आलेलं नाही?

Titanic  चे अवशेष हे समुद्राच्या खोल तळाशी तब्बल ३.८ किमी इतक्या खोल विसावलेले आहेत. Titanic बुडालं १९१२ साली पण त्याच्या अवशेषांचा शोध लागायला उजाडावं लागलं १९८५ साल! संशोधक रोबर्ट बलोर्ड आणि त्यांच्या टीमने अत्यंत मेहनतीने आणि खूप वर्ष शोधाशोध करून, पाण्यासारखा पैसा खर्च करून Titanic चे अवशेष नेमके कुठे आहेत ते शोधले.

हे जहाज ज्या जागी आहे त्या जागी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोहोचणं खूप कठीण आहे. तिथे एवढा काळोख आहे की १ फुटावर काय आहे हे सुद्धा डोळ्यांनी पाहता येत नाही. ह्या जागेचे तापमान तब्बल १ डिग्री सेल्सिअस इतके कमी आहे. अशा गूढ आणि रहस्यमय जागी माणूस जाऊ तर शकतो पण तो सुरक्षित परत येईलच याची शाश्वती नाही. त्यामुळेच खूप इच्छा असून सुद्धा Titanic चे अवशेष बाहेर काढणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे Titanic  पर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण आहे आणि जरी तिथे टीम पोहोचली तरी एवढ्या महाकाय आणि जड जहाजाला बाहेर काढायचे कसे हा एक प्रश्न आहेच. शिवाय या ठिकाणी मनुष्याचे जास्त काळ थांबणे देखील धोकादायक आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेताच आजवर Titanic बाहेर काढता आलेले नाही.

संशोधकांच्या मते Titanic चे हे अवशेष जास्त काळ टिकणार सुद्धा नाही. आज १०० वर्षांनंतर त्या अवशेषांची अवस्था इतकी वाईट आहे की येत्या काही काळात ते पूर्णपणे निरुपयोगी आणि नामशेष होतील. अत्यंत दुर्गम ठिकाणी असल्याने आणी समुद्राच्या पाण्याच्या प्रभावात असल्याने त्या अवशेषांचे विघटन अत्यंत वेगाने होत आहे.

हे अवशेष नामशेष होण्याचे अजून एक कारण म्हणजे समुद्राच्या पाण्यात असे काही विषाणू आढळतात जे लोहाच्या अवशेषांना कुरतडत आहेत. यामुळे लोहावर गंज चढत आहे. हे विषाणू दिवसाला १८० किलो पर्यंत लोहाचे विघटन करू शकतात असे तज्ञांचे म्हणणे आहे.

येणाऱ्या 20-30 वर्षांत Titanic पूर्णपणे नष्ट होईल आणि एका अलिशान जहाजाचा तो दुर्दैवी आणि करूण अंत असेल.


0 Comments

Your email address will not be published. Required fields are marked *

D Vishal